शेळी पालन व्यवसाय हा बरेच शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसायाच्या बरोबरीने आता करत आहेत.
आपल्याला माहित आहेच की शेळीपालन व्यवसाय अगदी कमीत कमी खर्चात व कमी जागेत करता येण्यासारखा व्यवसाय आहे.
आता पण ग्रामीण भागांमध्ये पाहतो की बऱ्याच शेतकऱ्यांकडे एक ते दोन शेळ्या या हमखास असतातच. परंतु हाच शेळीपालन व्यवसाय जर व्यावसायिक दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात करायचा असेल तर यासाठी तुम्हाला आर्थिक मदत ही विविध प्रकारच्या शासकीय योजना तसेच बँकांमार्फत केले जाते.
जर आपण आत्ताच या कालावधीचा विचार केला तर शेळी पालन व्यवसाय हा सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी एक सुवर्णसंधी म्हणून पुढे येत आहे. उत्तम नियोजन व मार्केट व्यवस्थापन यांचा विचार करून जर हा व्यवसाय केला तर यश तुमच्या पायाशी लोळण घालेल यात मुळीच शंका नाही.
फक्त गरज आहे ती उत्तम नियोजन आणि सातत्य ठेवण्याची. अशा या महत्त्वपूर्ण व्यवसायाला विविध प्रकारच्या बँकांकडून देखील मदत केली जाते. या लेखामध्ये आपण शेळीपालनासाठी कुठल्या बँक कर्ज देऊ शकतात आणि या कर्जासाठी करावयाच्या अर्जाची प्रक्रिया जाणून घेणार आहोत.
नक्की वाचा:शेतकऱ्यांनो 'शेळी आणि कोंबडी'च्या आहाराची अशी घ्या काळजी; होईल बक्कळ नफा
शेळीपालनासाठी देतात या बँक कर्ज
आयडीबीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, प्रादेशिक ग्रामीण बँक, राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँक, स्टेट बँक सहकारी आणि नागरी बँक इत्यादी बँकांच्या माध्यमातून तुम्ही शेळीपालनासाठी कर्ज घेऊ शकतात.
या गोष्टींसाठी शेळीपालनासाठी मिळते कर्ज
तुम्हाला शेळीपालनासाठी शेळी खरेदी करण्यासाठी, शेळ्यांना आवश्यक चारा खरेदीसाठी, तसेच शेळ्यांच्या शेड बांधणी साठी तुम्हाला कर्ज मिळते. यामध्ये सरकारी कर्ज आणि व्यावसायिक कर्जाचा समावेश होतो.
यामध्ये बँक दोन प्रकारचे कर्ज देते एक म्हणजे जर तुम्हाला शेळीपालन व्यवसाय सुरू करायचा असेल जी नवीन सुरुवात असेल तर यासाठी व्यवसाय कर्ज दिले जाते व या मधील दुसरा प्रकार म्हणजे तुमचा शेळी पालन व्यवसाय आहे
परंतु या व्यवसायासाठी लागणारे खेळते भांडवल हवे असेल तर यासाठी तुम्हाला खेळते भांडवल म्हणून कर्ज दिले जाते. शेळी पालनासाठी कर्ज महिन्याची मर्यादाही त्या बँकांच्या विहीत नियमांच्या आधारे ठरते.
यामध्ये तुम्ही आयडीबीआय बँकेचा विचार केला तर पन्नास हजार ते पन्नास लाख रुपयांपर्यंत ही बँक कर्ज देते. इतर बँका या त्यांच्या त्यांच्या ठरवून दिलेल्या मर्यादेपर्यंत कर्ज देतात.
नक्की वाचा:शेतकऱ्यांनो शेळीपालनातून लाखोंची कमाई करा, कर्ज आणि सबसिडी जाणून घ्या
कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
1-तुमच्या सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट
2- तुमचा पत्त्याचा पुरावा असणे आवश्यक आहे.
3-उत्पन्नाचा दाखला असावा.
4- आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
4- बीपीएल कार्ड( तुमच्याकडे असल्यास )
5- जात प्रमाणपत्र( एसी/ एसटी / ओबीसी असल्यास)
6- वय अधिवास प्रमाणपत्र
7- तुमचा शेळीपालन व्यवसाय चा प्रोजेक्ट रिपोर्ट
8- जमीन नोंदणी दस्तऐवज व चार पासपोर्ट आकाराचे फोटो
अर्ज करण्याची पद्धत
जर तुम्हाला शेळीपालनासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या ग्रामपंचायत किंवा ब्लॉक ऑफिसला भेट देऊन अर्ज मिळवावा लागतो व त्यानंतर तुम्हाला अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरून त्यानंतर आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स अर्जासोबत जोडावे लागतात.
त्यानंतर ब्लॉकेड आहे किंवा ग्रामपंचायतीला सादर केल्या जाऊ शकतात. जर तुम्ही शेळीपालन योजनेअंतर्गत कर्ज घेण्यास पात्र असेल तर तुम्हाला खर्च आणि अनुदानाचा लाभ दिला जातो.
नक्की वाचा:ठाकरे सरकारची पशुपालन योजना; शेतकऱ्यांना मिळतायेत गायी आणि म्हशी
Published on: 14 June 2022, 09:24 IST