सध्या शेळीपालन व्यवसाय हा मोठ्या प्रमाणावर केला जात असून सुशिक्षित बेरोजगारांसाठी एक आर्थिक सुसंधी आहे. कमी खर्चात व कमी जागेत चांगला नफा या व्यवसायाच्या माध्यमातून मिळणे शक्य आहे. फक्त गरज आहे ती व्यवस्थित नियोजनाची आणि शेळीपालनासाठी योग्य जातींची निवड या गोष्टींची होय. शेळ्यांच्या विविध प्रकारच्या प्रजाती भारतात आहेत व प्रजातीनुरूप वेगवेगळे गुणधर्म प्रत्येक शेळीचे आहेत.
परंतु शेळीपालनासाठी आपल्याला फायदा देऊ शकेल आणि उपयुक्त अशा जातीची निवड करणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपण या लेखात शेळीच्या एका महत्त्वपूर्ण जाती विषयी थोडक्यात माहिती घेऊ.
नक्की वाचा:सावधान! शेळ्या-मेंढ्यांमध्ये वाढतोय न्यूमोनिया आजार; करा वेळीच उपाय
कोकण कन्याळची सर्वसाधारण माहिती
जर आपण या जातीच्या शेळीचा विचार केला तर ही कोकण किनारपट्टीलगत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, दोडामार्ग आणि कुडाळ या भागातील असून विदर्भात देखील काही प्रमाणात आढळते. प्रामुख्याने मांस उत्पादनासाठी ही शेळी उपयुक्त असून दर दोन वर्षात तीनदा करडांना जन्म देते.
प्रथम माजावर येण्याचे वय 11 महिन्याचे असून वयाच्या 17 व्या महिन्यात पहिल्यांदा विते. जर आपण दोन वेतातील अंतराचा विचार केला तर ते आठ महिन्याच्या असते. या शेळीचा सरासरी दूध उत्पादन काळ 97 दिवसाचा असून या कालावधीत 60 लिटर दूध देते.
त्यासोबत या शेळीचा भाकड काळ 84 दिवसांचा असतो. कोकण कन्याळ जातीच्या नराचे वजन हे 25 किलो तर मादी शेळीचे वजन 21 किलोपर्यंत भरते. एक ते दीड वर्षाच्या बोकडाच्या मटणाचा उतारा 53% इतका असतो.
नक्की वाचा:Buffalo Farming: महाराष्ट्रातील ही म्हशीची जात देतेय 1005 लिटर दूध; जाणून घ्या खासियत
शेळीचे शारीरिक गुणधर्म
1- या जातीच्या शेळीच्या वरच्या जबड्यावर पांढऱ्या व तांबूस रंगाचे पट्टे असतात.
2- या जातीच्या शेळीचे पाय लांब असून पायावर काळा पांढरा रंग असतो. पाय लांब व मजबूत असल्यामुळे या शेळ्या डोंगराळ भागात सहज जुळवून घेतात.
3- शिंगे टोकदार असतात व कपाळ चपटे व रुंद असते. शिंगे हे सरळ व मागे वळलेली असतात. नाक रुंद असते व स्वच्छ असते.
4- कोकण कन्याळ शेळ्यांची कातडी मुलायम व गुळगुळीत असतो.
5- या शेळ्यांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या नियमित आणि वर्षभर माजावर येतात.
6- महत्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे या शेळ्यांमध्ये जुळ्या करडांचे प्रमाण 65 टक्क्यांपर्यंत असून उन्हाळ्यात विणाऱ्या शेळ्यामध्ये जुळी करडे अधिक प्रमाणात झाल्याचे दिसते.
Published on: 01 October 2022, 12:39 IST