Animal Husbandry

भारतात शेती सोबतच जोड व्यवसाय म्हणून पशुपालन मोठ्या प्रमाणात केले जाते. पशुपालन करणारे शेतकरी यातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न देखील प्राप्त करीत आहेत. पशुपालक शेतकरी डेअरी चा व्यवसाय करून महिन्याला लाखो रुपयांची कमाई करत आहेत. असे असले तरी अनेक पशुपालक शेतकरी आपल्या डेअरी व्यवसायात अयशस्वी होताना देखील दिसत आहेत. अनेक पशुपालक शेतकऱ्यांनी तर आपला डेअरीचा व्यवसायच बंद केलाय. आज आम्ही खास पशुपालन करणारे विशेषता डेअरी व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी काही महत्त्वाच्या टिप्स घेऊन आलो आहोत, या टिप्सचे अनुकरण करून आपण नक्कीच आपल्या व्यवसायात यशस्वी व्हाल अशी आम्हाला आशा आहे. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया पशुपालन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बाबी.

Updated on 24 December, 2021 3:24 PM IST

पशुपालन करताना घ्यावयाची काळजी

  • भारतात हिवाळा सुरू झाला आणि आता चांगली कडाक्याची थंडी देखील पडताना दिसत आहे त्यामुळे थंडीपासून जाणवरांचे संरक्षण करणे देखील अनिवार्य आहे. थंडीचे दिवस प्राण्यांसाठी खुपच हालाकीचे असतात. थंडीच्या दिवसात जनावरांमध्ये अनेक प्रकारचे आजार उद्भवतात. अशावेळी जनावरांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे नाहीतर मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे हिवाळयात जनावरे सूर्य प्रकाश पडत असलेल्या ठिकाणी, कोरड्या जागी बांधून ठेवायला पाहिजे. रात्रीच्या वेळी पशुना सुरक्षित खोलीत बांधून ठेवा.
  • जनावरांचे वेळेवर लसीकरण केले गेले पाहिजे नाहीतर पशुधनाचे मोठे नुकसान होऊ शकते. जनावरांना होणारे आजार टाळण्यासाठी त्यांना वेळेवर लसीकरण करणे आवश्यक आहे. याशिवाय वासरांना थंडीच्या काळात खोकला, निमोनिया, असे आजार असल्यास पशुवैद्यकाचा सल्ला घेऊनच औषध द्यावे. दुभत्या जनावरांना रोगापासून वाचवण्यासाठी दूध काढल्यानंतर जंतुनाशक द्रावणाने धुवावे.
  • हेही वाचा:- Agri Business: शेतकरी मित्रांनो या पद्धतीने करा शेळीपालन; होईल लाखोंची कमाई, जाणुन घ्या सविस्तर
English Summary: some important tips for farmers who are doing animal husbandry
Published on: 24 December 2021, 03:24 IST