Animal Husbandry

मत्स्यपालन व्यवसाय जगातील खूप जुना व्यवसाय असून तंत्रज्ञान वापरून या माध्यमातून उत्पन्न मिळवणे शक्य आहे. जर तुम्हीसुद्धा मत्स्यपालन व्यवसाय करीत असाल तूम्हाला सुद्धा या नव नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून स्वतःला अपडेट ठेवणे गरजेचे आहे.

Updated on 25 May, 2022 2:53 PM IST

 मत्स्यपालन व्यवसाय जगातील खूप जुना व्यवसाय असून तंत्रज्ञान वापरून या माध्यमातून उत्पन्न मिळवणे शक्य आहे. जर तुम्हीसुद्धा मत्स्यपालन व्यवसाय करीत असाल तूम्हाला सुद्धा या नव नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून स्वतःला अपडेट ठेवणे गरजेचे आहे.

मत्स्यपालन व्यवसायामध्ये आता नवनवीन तंत्रज्ञान येऊ लागल्यानेया तंत्रज्ञानाचा वापर करून चांगला नफा मिळवता येणे शक्य आहे.मत्स्य पालना साठी आता मोठे मोठे तलाव किंवा जास्त पाण्याची आवश्यकता नाही. यासाठी तुम्ही अगदी कमी जागेत रीसर्क्युलेटिंग एक्वा कल्चर सिस्टम अर्थात आर ए एस तंत्रज्ञानाचा वापर करून अगदी सिमेंटच्या टाक्या बनवून यामध्ये मत्स्य पालन व्यवसाय करून आठ ते दहाआठ पट जास्त मत्स्य उत्पादन करू शकता.

 एका मत्स्य पालकाने या तंत्रज्ञानाबद्दल दिलेली माहिती

नीरज चौधरी हे सुलतान फिश फार्म चालवतात. त्यांचे शिक्षण मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेली असूनतुझा परिवार जवळजवळ 35 वर्षांपासून मत्स्य उत्पादनात आहे.पुढे अगदी सुरुवातीपासून यायाबद्दल त्यांच्या मनात आवड होती.म्हणून मत्स्यपालनाचा ची निवड केली.

त्यांनी मत्स्यपालन यामध्येपूर्णतः आधुनिक पद्धतीचा वापर केला.एवढेच नाही तर अमेरिका येथून त्यांनी हायटेक फिश फार्मिंग चे प्रशिक्षण घेतले.बाबत बोलताना त्यांनी म्हटले कीतंत्रज्ञानामध्ये टेंपरेचर कंट्रोलर लागते.ते स्वतः तापमान नियंत्रित करते.

त्यामुळे हिवाळा असो की उन्हाळा याचा परिणाम माशांवर होत नाही. बऱ्याचदा उघड्यावर मत्स्यपालन  उडणारे पक्षी देखील मासेखातात त्यामुळे मत्स्य पालकांना बरेच नुकसान सोसावे लागते.या तंत्रज्ञानामध्ये मत्स्यपालन हे एका शेडमध्ये केले जात असल्यामुळे ही समस्या उद्भवत नाही.

नीरज यांच्या म्हणण्यानुसार, तंत्रज्ञानात अँटिबायोटिक्स आणि थेरपिस्ट वरचे अवलंबित्व कमी झाल्यामुळे उच्च दर्जाचे मत्स्य उत्पादन होते. खाद्यामध्ये घट, उपजीविका कीटकांचा नियंत्रण, कमी ऑपरेटिंग खर्च, आणि परोपजीवी कीटकांचा कमी प्रभाव आणि हवामान घटक आहेत.

प्रतिकूल हवामानात देखील मासे सहज पाळता येतात.कुठल्याही प्रकारच्या बाहेरील प्रदूषणाला ते बळी पडत नाहीत तंत्रज्ञानामध्ये अनेक फिल्टर डिझाईन वापरल्या जातात. गाळण्याचे सर्व काम पाण्यातून टाकाऊ पदार्थ, रिक्त  पोषक आणि घनपदार्थ काढून टाकने आहे.

 या तंत्रज्ञानाचा फायदा

 आतापर्यंत आपण खुल्या तलावांमध्ये मत्स्यपालनाचे तंत्रे पाहिली आहेत. यामध्ये इनडोअर नवीन तंत्राच्या आधारे कमी जागेत मत्स्य शेती करून आठ ते दहा पट अधिक मासे तयार केले जाऊ शकतात.

त्याचा अंदाज लावला तर केवळ बाराशे यार्ड जमिनीत 60 टन मासे तयार होऊ शकतात.

नक्की वाचा:Murah Buffalo: पशुपालकांनो! मुऱ्हा जातीची म्हैस इतर जातींच्या म्हशीपेक्षा कशी आहे वेगळी?मुऱ्हाम्हैस पालनातून होईल बंपर कमाई

नक्की वाचा:दुकानदारांनो शेतकऱ्यांना फसवत असाल तर सावधान; मंत्री सुनील केदार यांची मोठी घोषणा

नक्की वाचा:खजूर शेती: खजुराचे एक झाड देते 50 हजार रुपयांचे उत्पन्न, होऊ शकता काही वर्षात करोडपती

English Summary: ras technology give modern shape and gate more profit through fish farming
Published on: 25 May 2022, 02:53 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)