आपल्या देशात मागील काही वर्षांपासून पावसाच्या अनिश्चित प्रमाणामुळे चाराटंचाई निर्माण झाली आहे. या दुष्काळी परिस्थितीत चारा छावण्यांची उभारणी करण्यात आली. परंतु अशा प्रकारच्या छावण्या हा काही कायमस्वरूपी उपाय होऊ शकत नाही. त्यासाठी हिरवा चारा वर्षभर साठविण्याचे नियोजन म्हणजेच मुरघास निर्मिती हा एकमेव पर्याय आहे.
दूध उत्पादक शेतकरी वर्षभर पौष्टिक हिरवा चारा जनावरांना उपलब्ध करून देऊ शकत नाही. म्हणून पाऊस पडल्यावर जे पहिले पीक तयार होते, म्हणजेच ज्या वेळी मुबलक प्रमाणात हिरवा चारा उपलब्ध असतो, त्याच वेळी त्याचा मुरघास बनवून दीर्घ काळ साठवुनिकीची सोय करणे फायदेशीर असते. आणि हे काम अतिशय कमी खर्चात करता येऊ शकते.
आधुनिक पद्धतीच्या गोठ्याला जर आधुनिक पद्धतीचं चारा नियोजन म्हणजे मुरघास निर्मितीची जोड दिली तर, सोने पे सुहागा म्हणत तुमचा दूध व्यवसाय वाऱ्याच्या वेगाने नफा कमविण्याकडे वाटचाल करू लागेल. आणि हे कमीत कमी कष्टात जास्त नफा देणारे तंत्रज्ञान आहे.
शेतकऱ्यांनो ऊसाला तुरा येण्याची कारणे आणि ऊसातील तुरा टाळण्यासाठी उपाययोजना
मुरघास बनविण्यासाठी मका, ज्वारी, बाजरी, व काही गवती चारा पिके वापरली जातात. यामध्ये मका या पिकाचा सर्वात जास्त वापर जगभरात केला जातो. मक्याचा मुरघास अतिशय चांगला होतो असा अनुभव आहे. मुरघासासाठी चिकातील मका व फुलोऱ्यातील ज्वारीचा वापर हमखास केला जातो. याबरोबरच ल्युसर्न (lucern) सारखे पीकही एकत्र करून मुरघास बनविता येतो.
मुरघासामुळे वर्षभराच्या हिरव्या चाऱ्याचे नियोजन आगाऊ, पावसाळा असतानाच करता येते. उन्हाळ्यातही जनावरांना हिरवा आणि पौष्टिक उपलब्ध करून देण्याची कमाल साधता येते. रोज शेतात जाऊन वैरण कापून आणण्याचे कष्ट वाचत तोच वेळ शेतकरी इतर नफेशीर गोष्टींसाठी देऊ शकत. वर्षभर चांगल्या प्रतीचा एकसारखा चारा मिळत राहिल्याने जनावरांमधील पोटाचे आजार कमी हो आरोग्य वाढते.
चाऱ्याच्या प्रतीमध्ये पारंपरिक पद्ध पावसाळा आला कि हिरवागार आणि उन्हाळ्यात कडबा, सुकलेले गवत यामुळे जनावरांचे आरोग्य बिघडते आणि दूध उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होतो. कमी जमीन असणारा दूध उत्पादक शेतकरीसुद्धा मुरघास केल्यावर जास्त गाईंचा आरामशीर सांभाळ शकतो, तेदेखील चाऱ्यावरील खर्चाची पर्वा न करता.
डिजीटल इंडियाच्या नावाखाली विकासाचा डांगोरा पिटला गेला, त्यात जनतेच्या पदरात काय पडले?
मका व ज्वारी सारखी चारापिके ७५-८० दिवसात कापणीला येतात. चारापिके त्यांच्या चिकाच्या किंवा फुलोऱ्याच्या अवस्थेत आली की कापावीत.
मुरघास बनविताना चारा पिकातील पाण्याचे प्रमाण ६० ते ६५ टक्के असावे. त्यापॆक्षा जास्त पाणी झाल्यास नुकसान होऊ नये म्हणून पीक कापणी नंतर थोड्यावेळ साठी चारा सुकू द्यावा.
त्यानंतर कुट्टी मशीन च्या साह्याने चाऱ्याचे एक-दोन इंच लांबीचे तुकडे करावेत. कुट्टी केल्यानंतर शक्यतो ती एका जागेवर साठवून ना ठेवता त्वरित बॅगेत, खड्ड्यात किंवा बांधकाम केलेल्या जागी आणून टाकावी.
कुट्टी टाकल्यानंतर ती पसरवावी. धुमश्याने किंवा पायाने अथवा ट्रॅक्टरने तुडवावी. यामुळे त्यातील हवा बाहेर निघून जाते. व कुट्टी दाबून बसते. कडांवरची कुट्टी विशेषतः चांगली दाबून घ्यावी.
महत्वाच्या बातम्या;
काय सांगताय! आता 'या' गाई देणार दररोज 140 लिटर दुध, गायींवर नवा प्रयोग...
पशुधन मिल्किंग मशीन : दुग्धव्यवसायीक शेतकऱ्यांची पहिली पसंद
शेतकऱ्यांनो स्वच्छ दूध उत्पादनाची 'ही' आहेत सुत्र
Published on: 06 February 2023, 10:28 IST