Animal Husbandry

भारत हा कृषिप्रधान देश असून भारतीय शेतकरी शेती सोबतच विविध प्रकारचे जोड धंदे करतात. यामध्ये पशूपालन, कुकुट पालन आणि शेळीपालन यांना खूप प्रकारचे महत्त्व आहे. या तीनही जोडधंदा पैकीशेळी पालन हा व्यवसाय अगदी कमीत कमी गुंतवणुकीत आणि कमी जागेत जास्त नफा देणारा व्यवसाय आहे.

Updated on 28 June, 2022 12:50 PM IST

 भारत हा कृषिप्रधान देश असून भारतीय शेतकरी शेती सोबतच विविध प्रकारचे जोड धंदे करतात. यामध्ये पशूपालन, कुकुट पालन आणि शेळीपालन यांना खूप प्रकारचे महत्त्व आहे. या तीनही जोडधंदा पैकीशेळी पालन हा व्यवसाय अगदी कमीत कमी गुंतवणुकीत आणि कमी जागेत जास्त नफा देणारा व्यवसाय आहे.

त्यामुळे बरेच शेतकरी शेळी पालन हा व्यवसाय करतात. आत्ताच्या काळात  बर्‍याच सुशिक्षीत बेरोजगार तरुण शेळीपालन व्यवसाय कडे मोठ्या प्रमाणात वळत असून त्यांच्यासाठी एक आर्थिक उत्पन्नाचा एक चांगला स्त्रोत म्हणून शेळीपालन व्यवसाय नावारुपास येत आहे.

अशा युवकांना विविध शेळ्यांच्या जातींची माहिती व्हावी म्हणून आपण कृषी जागरणच्या माध्यमातून शेळ्यांच्या जातीची माहिती देत आहोत. या लेखामध्ये आपण अशाच एका तीन शेळ्यांच्या जातींची माहिती घेणार आहोत.

नक्की वाचा:दुग्ध व्यवसाय सुरू करायचा आहे तर या'4'म्हशिंचे पालन देईल आर्थिक भरभराट, जाणून घेऊ सविस्तर माहिती

 या आहेत शेळ्यांच्या चांगल्या उत्पादनक्षम जाती

1- नंदीदुर्गा शेळी- या शेळीची जात कर्नाटक राज्यात आढळते. या शेळीचा चेहरा, खूर आणि पापणी काळ्या रंगाचे आहे. या शेळ्या प्रामुख्याने मांस मिळवण्यासाठी पाळल्या जातात.

शेळ्या जुळ्या करडांना जन्म देतात. त्यामुळे सहाजिकच दुप्पट नफा होतो.मादी शेळीचे वजन 25 ते 42 किलो असते तर नराचे वजन 56 किलोपर्यंत असते. त्यामुळे ऊस उत्पादन जास्त मिळते.

2- बिद्री शेळी-शेळी कर्नाटकच्या उत्तर पूर्व भागात आढळते.तिचा रंग सामान्यतः काळा असतो. तिचे कान खाली वाकलेल्या आहेत. हे प्रामुख्याने मांसासाठी देखील पाळली जाते.

एका वर्षात सरासरीएक ते दोन करडांना जन्म देते.मादीचे वजन 45 किलो असते आणि नराचे वजन 50 किलो पर्यंत असते. या जातीची शेळी जुळ्या करडांना जन्म देते.

नक्की वाचा:Goat Species: रोहीलखंडी,सुमी,कहामी, सालेम काळी 'या शेळ्यांच्या जाती' शेळीपालनात देतील बक्कळ नफा

3- भाखरवाली शेळी- ही शेळी जम्मू काश्मीर राज्यात आढळते. या शेळी चा रंग पांढरा आणि काळा अशा दोन्ही प्रकारचा असतो. तिचे शिंगे खाली वाकलेले असतात.

या जातीची शेळी दूध आणि मांस दोन्हीसाठी पाळली जाते. या शेळी पासून दररोज सरासरी 900 मिली दूध मिळते. या जातीच्या मादी शेळीचे वजन 50 किलो आणि नराचे वजन 60 किलो पर्यंत असते. या शेळीपालनातून भरपूर नफा मिळू शकतो.

English Summary: nandidurga,Bidri and bhakharwali goat is so profitable in goat rearing
Published on: 28 June 2022, 12:50 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)