Animal Husbandry

तुम्ही कधी गाढव फार्म या संकल्पनेबद्दल ऐकले आहे का? सध्या जगभरात या गाढव फार्मची चर्चा फारच रंगली आहे. 42 वर्षीय एका व्यक्तीने गाढव फार्मची सुरुवात करून इतिहासाच रचला आहे.

Updated on 13 June, 2022 3:16 PM IST

आजपर्यंत आपण डेअरी फार्म बद्दल ऐकले असेल ज्यामध्ये गायी, म्हशी पाळून मोठ्या प्रमाणावर दुग्ध व्यवसाय केला ज़ातो. पण तुम्ही कधी गाढव फार्म या संकल्पनेबद्दल ऐकले आहे का? सध्या जगभरात या गाढव फार्मची चर्चा फारच रंगली आहे. 42 वर्षीय एका व्यक्तीने गाढव फार्मची सुरुवात करून इतिहासाच रचला आहे.

दक्षिण कर्नाटक जिल्ह्यातील श्रीनिवास गौडा यांनी ८ जून रोजी फार्मची सुरुवात केली आहे. कर्नाटक राज्यातील हे पहिले गाढव फार्म आहे. मात्र याआधी केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यांत गाढव फार्म ची सुरुवात करण्यात आली होती. मात्र गाढव फार्मचे काम सुरु करताना त्यांना लोकांकडून चांगल्या प्रतिक्रिया आल्या नाहीत. या कामासाठी अनेकांनी नकार घंटा वाजवली तर काहींनी त्यांना कमी लेखले.

सॉफ्टवेअर कंपनीत होते कामाला
श्रीनिवास गौडा हे बीए पदवीधर असून ते सॉफ्टवेअर कंपनीत कामाला होते. त्यांनी नंतर ही नोकरी सोडून देऊन 2020 मध्ये इरा गावात त्यांनी 2.3 एकर जागेत एकात्मिक कृषी आणि पशुसंवर्धन, पशुवैद्यकीय सेवा, प्रशिक्षण आणि चारा विकास केंद्रांची सुरुवात केली. शेळीपालन, तसेच ससे आणि कडकनाथ कोंबड्याचे पालन केले. आता मात्र गाढव पालन करून लोकांना पॅकेटमधून गाढव दुधाची विक्री करण्याचा श्रीनिवास गौडा यांनी ठरवले आहे.

धक्कादायक: विजेची तार अंगावर पडून 11 जनावरे जीवाला मुकली

गाढव फार्म मध्ये साधारण 20 गाढवे असतील. असे गौडा म्हणाले गौडा पुढे असेही म्हणाले, की सध्या गाढवांच्या प्रजातींची संख्या कमी होत चालली आहे. शिवाय वॉशिंग मशिन, तसेच कपडे धुण्यासाठी वापरात आलेले इतर नवनवीन तंत्रज्ञान यामुळे गाढवांचा वापर कमी कमी होत गेला. गाढवाचे दूध किंवा गाढव फार्म ची कल्पना जेव्हा लोकांना समजली तेंव्हा मात्र त्यांची खिल्लीच उडवण्यात अली होती. काहींनी हा व्यवसाय चालणार नसल्याचेही सांगितले.

खरंतर गाढवाचे दूध हे चवदार, खूप महाग सोबतच औषधी गुणांनी युक्त आहे. पॅकेटमधून दुधाची विक्री करणार असल्याचे गौडा यांनी सांगितले आहे. गाढवाच्या 30 मिली दुधाच्या पॅकेटची किंमत ही 150 रुपये इतकी आहे. मॉल्स, दुकाने तसेच सुपरमार्केटमधून पुरवठा केला जाणार आहे. पुढे गौडा यांनी सौंदर्य उत्पादनांमध्ये वापरले जाणारे गाढवाचे दूध विकण्याची तयारी दर्शवली आहे. विशेष म्हणजे आधीच 17 लाख रुपयांच्या ऑर्डर मिळाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या:
बाप रे! बैलाने तोंडात डबा पकडला आणि नंतर आख्ये शहर घेतले डोक्यावर, जाणून घ्या 'अजब गजब' प्रकार...
शेतकऱ्यांची मेहनत 'पाण्यात'; पावसामुळे भाजीपाल्यांचे नुकसान,शेतकरी संकटात

English Summary: Left a job at a software company and started a donkey farm
Published on: 13 June 2022, 03:16 IST