Animal Husbandry

आपल्या देशात ग्रामीण भागात शेतीसोबतच अनेक शेतकरी पशुपालनाचा व्यवसायही मोठ्या प्रमाणावर करू लागले आहेत. यामध्ये प्रामुख्याने शेळीपालन मोठ्याप्रमाणात केले जात आहे. अशा परिस्थितीत शेळीपालनाचा रोजगार ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी तसेच भूमिहीन मजुरांसाठी मोठा लाभप्रद सिद्ध होत आहे.

Updated on 02 May, 2022 12:38 PM IST

आपल्या देशात ग्रामीण भागात शेतीसोबतच अनेक शेतकरी पशुपालनाचा व्यवसायही मोठ्या प्रमाणावर करू लागले आहेत. यामध्ये प्रामुख्याने शेळीपालन मोठ्याप्रमाणात केले जात आहे. अशा परिस्थितीत शेळीपालनाचा रोजगार ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी तसेच भूमिहीन मजुरांसाठी मोठा लाभप्रद सिद्ध होत आहे.

या व्यवसायाचे दोन फायदे आहेत, एक म्हणजे शेळीपालनात खर्च आणि काळजी नगण्य आहे, तर शेळीच्या मांसाला मागणी देखील खुप अधिक आहे. यामुळे हा व्यवसाय आजच्या काळात देखील फायदेशीर व्यवहार ठरत आहे.

शेळीपालन हा व्यवसाय अल्पभूधारक शेतकरी तसेच भूमिहीन शेतमजुरांसाठी विशेष लाभप्रद सिद्ध होणारा आहे.  याचे मुख्य कारण म्हणजे अल्प व अल्पभूधारक शेतकरी ज्यांना शेतीसोबतच गायी-म्हशींचे पालन करणे शक्य नाही, ते शेळीपालन करून चांगला नफा कमावत आहेत. त्याचबरोबर या रोजगाराला चालना देतानाच गरजू शेतकऱ्यांना शेळीपालनासाठी शासन अनुदानही देत ​​आहे.

या सर्व सुविधा असूनही, शेतकऱ्यांना शेळीपालना संदर्भात आवश्यक ती शास्त्रीय माहिती वेळेत कळत नाही ही एक मोठी समस्या शेतकऱ्यांना भेडसावत असते. अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांना शेळीपालन व्यवसाय सुरु करुन चांगला नफा कमवायचा आहे त्यांच्यासाठी आजची ही बातमी विशेष आहे.

कारण की आज आम्ही अशा शेतकऱ्यांसाठी काही भन्नाट अँप्लिकेशन विषयी माहिती सांगणार आहोत. ज्याद्वारे शेळीपालनाशी संबंधित सर्व माहिती शेळीपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळवता येणे शक्य होणार आहे. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या महत्वपूर्ण माहिती विषयी.

संबंधित बातम्या:

राजू शेट्टीचा हुंकार!! भोंगे उतरवण्याचे राहुद्या आधी शेतकऱ्याची झाडाला लटकलेली बॉडी उतरवा

Farmer Award : नाशिक मध्ये बळीराजाचा होणार सन्मान; राज्यपाल,मुख्यमंत्रीसमवेतच या मान्यवरांची असणार उपस्थिती

गोट फार्मिंग मोबाईल अँप

मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, केंद्रीय शेळी संशोधन संस्थेने हे ॲप्लिकेशन तयार केले आहे. हे मोबाईल अँप चार वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध आहे: शेळीपालन व्यवसाय यशस्वी करण्यासाठी आणि अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी हिंदी, तामिळ, कन्नड आणि इंग्रजी या भाषेत या ॲप्लिकेशनची निर्मिती करण्यात आली आहे. या मोबाईल अँप्लिकेशनवर पशुपालक शेतकरी भारतीय शेळीच्या सुधारीत जाती, त्यांचे प्रजनन व्यवस्थापन, शेळीच्या वयानुसार शेळीचे डोस आणि इतर महत्त्वाची माहिती जाणून घेऊ शकणार आहेत.

बकरीमित्र अँप्लिकेशन 

बकरी मित्र अँप हे देखील भारतीय कृषी संशोधन केंद्रीय शेळी संशोधन संस्था आणि आंतरराष्ट्रीय पशुधन संशोधन संस्था नैरोबी केनिया यांनी विकसित केले आहे. हे अँप विशेषतः उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यातील शेतकऱ्यांना लक्षात घेऊन विकसित करण्यात आले आहे.

असे असले तरी याचा उपयोग देशातील इतर शेळी पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील होऊ शकतो. या मोबाईल अँपवर शेळीशी संबंधित सर्व माहिती जसे की शेळीच्या सुधारित जातींची माहिती, प्रजननाशी संबंधित माहिती आणि इतर माहिती देण्यात आली आहे. कारण की हे अँप ICAR-CIRG ने विकसित केले आहे, त्यामुळे ही सर्व माहिती शेतकर्‍यांना विशेष फायदेशीर ठरणारी आहे.

गोट ब्रीड अँप्लिकेशन 

गोट ब्रीड मोबाईल अँप हे प्रत्यक्षात शेळ्यांच्या जातीची माहिती देते. याच्या नावावरूनच आपणास याचा अंदाज येतो. कोणत्याही शेतकऱ्याला शेळीच्या सुधारित जातींबद्दल जाणून घ्यायचे असेल तर तो हे अँप डाऊनलोड करून सर्व माहिती मिळवू शकतो. हे मोबाईल अँप हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये उपलब्ध आहे. निश्चितच या एप्लीकेशनचा उपयोग करून शेळी पालन करणारे शेतकरी वेगवेगळ्या सुधारित जातींची माहिती जाणून घेऊ शकतात आणि त्यानुसार शेळी पालन व्यवसायाला सुरुवात करू शकतात.

English Summary: Goat Farming: Do they raise goats? Then use this application and be successful
Published on: 02 May 2022, 12:38 IST