Animal Husbandry

Atal Pension Yojana: केंद्र सरकारकडून दिवसेंदिवस वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. त्यामुळे देशातील लाखो नागरिकांना त्याचा फायदा होत आहे. पीएम किसान या केंद्र सरकारच्या योजनेतून शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० हजार रुपये दिले जातात. तसेच केंद्र सरकराने अटल पेन्शन योजना देशात राबवली आहे. ज्यामधून ६० वर्षानंतर दरमहा ५००० रुपये दिले जातात.

Updated on 26 July, 2022 10:15 AM IST

भारतात दूधउत्पादन (Milk production) मोठ्या प्रमाणात घेतले जाते. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी काही पशुपालन योजना (Animal husbandry scheme) देखील आणल्या आहेत. ज्यामधून शेतकरी (Farmers) पशुपालन व्यवसाय करत आहेत. पशुपालन व्यवसाय करत असताना जनावरांच्या खाद्याकडे लक्ष देणे खूप गरजेचे असते. कारण जनावरांना योग्य प्रकारे चार मिळाला तर दुधाचे (Milk) उत्पादन वाढते.

पशुसंवर्धन व्यवसाय (Animal husbandry business) तेव्हाच यशस्वी होतो जेव्हा जनावरांच्या चांगल्या आरोग्यासोबत चांगल्या दर्जाचे दूध उत्पादन मिळते. त्यासाठी जनावरांना पोषक हिरवा चारा (green fodder) देणे गरजेचे आहे. बहुतेक पशुपालकांसाठी पशुखाद्य वाढवणे सोपे आहे, कारण ते पशुपालनासोबत शेती करतात. अशा परिस्थितीत दुभत्या जनावरांच्या चांगल्या आरोग्यासाठी हे पशुपालक त्यांच्या शेतात किंवा शेताच्या बांधावर तीन प्रकारचा हिरवा चारा वाढवू शकतात.

कृषी तज्ज्ञांच्या मते, सर्वोत्कृष्ट जनावरांच्या चाऱ्याच्या श्रेणीत तीन प्रकारच्या हिरव्या चाऱ्याचा समावेश करण्यात आला असून त्यात बारसीम गवत, जिरका गवत आणि नेपियर गवत यांचा समावेश आहे. या ३ गवतांमुळे दूधउत्पादनात भरघोस वाढ होत आहे.

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! पगारात होणार बंपर वाढ, DA ही ४ टक्क्यांनी वाढणार

नेपियर घास (Napier grass)

उसासारख्या दिसणार्‍या नेपियर गवताला सामान्य भाषेत हत्ती गवत असेही म्हणतात. कमी वेळात वाढल्याने व जनावरांची दुध क्षमता वाढल्याने त्याला सर्वोत्तम पशुखाद्याचा विक्रम मिळाला आहे. अवघ्या 2 महिन्यात तयार होणारे नेपियर गवत जनावराचे आरोग्य आणि चपळता वाढवते. त्यामुळे या गवताचा जनावरांच्या खाद्यामध्ये समावेश करावा.

बरसीम घास (Berseem grass)

कॅल्शियम आणि फॉस्फरस सारख्या पोषक तत्वांनी समृद्ध बरसीम गवत वाढवणे अत्यंत सोपे आहे. त्यामुळे जनावरांची पचनशक्तीही चांगली होते आणि जनावरांची दूध देण्याची क्षमताही वाढते. त्यामुळेच हा हिरवा चारा मोठ्या प्रमाणात जनावरांना खायला दिला जात आहे.

शेतकऱ्यांनो सावधान! पाऊस पडल्यानंतर तूर पिकात करा हे काम; अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

जिरका घास

कमी पाणी असलेल्या भागात जिरका गवत हा पशुधनासाठी उत्तम पर्याय आहे. विशेषत: गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील कमी पाण्याच्या भागात ते सहज पिकवता येते. हे गवत ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान पेरले जाते. त्यामुळे जनावरांची दूध उत्पादन क्षमता वाढते आणि जनावरांची पचनशक्तीही चांगली राहते. त्यामुळे या गवताचा जनावरांच्या चाऱ्यात समावेश नक्की करावा.

महत्वाच्या बातम्या :
भावांनो नोकरीला करा रामराम! मोदी सरकार देत आहे व्यवसाय करण्याची संधी, व्हाल मालामाल
महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार! आठ लाख हेक्टरमधील उभी पिके उद्ध्वस्त

English Summary: give this green fodder to cows and buffaloes
Published on: 26 July 2022, 10:15 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)