Animal Husbandry

आजच्या या महागाईच्या काळात केवळ शेती क्षेत्रावर अवलंबून राहून उदरनिर्वाह भागवणे मोठे मुश्कील काम आहे. यामुळे बदलत्या काळानुसार शेती समवेतच शेतीपूरक व्यवसाय करणे आता अत्यावश्यक बनले आहे. यामुळे आज आपण एका भन्नाट शेती पूरक व्यवसायाची माहिती जाणुन घेणार आहोत. मित्रांनो आज आपण कुकूटपालन व्यवसायाविषयी जाणून घेणार आहोत.

Updated on 11 May, 2022 3:27 PM IST

आजच्या या महागाईच्या काळात केवळ शेती क्षेत्रावर अवलंबून राहून उदरनिर्वाह भागवणे मोठे मुश्कील काम आहे. यामुळे बदलत्या काळानुसार शेती समवेतच शेतीपूरक व्यवसाय करणे आता अत्यावश्यक बनले आहे. यामुळे आज आपण एका भन्नाट शेती पूरक व्यवसायाची माहिती जाणुन घेणार आहोत. मित्रांनो आज आपण कुकूटपालन व्यवसायाविषयी जाणून घेणार आहोत.

भारतात फार पूर्वीपासून पशु पालन केले जात आहे. पशुपालनात कुक्कुटपालन हा एक प्रमुख व्यवसाय आहे. विशेष म्हणजे आजच्या काळात पशुपालक शेतकरी बांधव कुक्कुटपालनातून भरघोस नफा कमावीत आहेत. हा व्यवसाय अतिशय कमी गुंतवणुकीत सुरू करता येतो आणि चांगली बक्कळ कमाई केली जाऊ शकते.

खरं पाहता गावात राहणाऱ्या लोकांसाठी कुक्कुटपालन हा व्यवसाय खूपच फायदेशीर ठरणार आहे. मित्रांनो पूर्वीच्या काळी लोकांचा असा विश्वास होता की कुक्कुटपालन व्यवसाय हा केवळ आतबट्ट्याचा व्यवसाय आहे. मात्र बदलत्या काळानुसार आधुनिक पद्धतींचा अवलंब करून या शेतीपूरक व्यवसायातून आता चांगली मोठी कमाई होऊ लागली आहे. यामुळे या व्यवसायाची व्याप्ती देखील वाढली आहे.

कमी खर्चात सुरु करता येतो हा व्यवसाय

कुक्कुटपालन व्यवसायाचा सर्वात मोठा फायदा हा आहे की इतर व्यवसायांप्रमाणे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे गुंतवावे लागत नाहीत. अत्यल्प गुंतवणूक करून हा व्यवसाय सहज सुरू केला जाऊ शकतो. 

विशेष म्हणजे हा व्यवसाय छोट्या स्तरावर सुरू केला असता यासाठी जास्त जागेची देखील आवश्यकता भासत नाही. तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरात किंवा घराशेजारी कोणत्याही मोकळ्या जागेत कुक्कुटपालन सहज सुरु करू शकता. जर तुम्ही 1500 कोंबड्याचे पालन करणार असाल तर यातून तुम्हाला 50 हजार ते 1 लाख रुपयांचा नफा मिळू शकतो.

कुक्कुटपालन करताना या गोष्टीची काळजी घ्या 

कुक्कुटपालनाला जास्त खर्च येत नाही. म्हणून हा सहज सुरु करता येणारा व्यवसाय आहे. मात्र, कुक्कुटपालन करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. कोंबड्या कोणत्याही रोगाला बळी पडणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल. याशिवाय त्या कोंबड्यांना साप, विंचू, कुत्रे, मांजर इत्यादींपासूनही दूर ठेवावे लागते.

अशा प्रकारे कोंबडीची काळजी घ्या

कुक्कुटपालन व्यवसायात चांगली कमाई करण्यासाठी आपल्या कोंबड्यांचे आरोग्य चांगले असणे आवश्यक आहे. त्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी, जीवनसत्त्वे, प्रथिने इत्यादींची गरज असते. बाजारात कोंबड्यांना खान्यासाठी अनेक पशुआहार उपलब्ध आहेत, जे तुम्ही विकत घेऊन कोंबडीना देऊ शकता. त्याच वेळी, कोंबड्याच्या पिल्लाना पहिला डोस 48 तासांनंतरच द्यावा. याशिवाय पिण्याच्या स्वच्छ पाण्याची व्यवस्थाही नेहमी ठेवावी.

कुक्कुटपालनासाठी बँकेकडून कर्ज मिळू शकते

कुक्कुटपालनासाठी तुम्ही विविध बँकेकडून कर्ज देखील मिळवू शकता. पोल्ट्री फार्मसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाकडूनही कर्ज घेता येते. यासाठी तुम्हाला मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड, पासपोर्ट, आधार कार्ड यासह इतर अनेक कागदपत्रांची आवश्यकता भासणार आहे.

English Summary: Farming Business Idea: Start a farming business and earn Rs 1 lakh per month; Read detailed
Published on: 11 May 2022, 03:27 IST