Animal Husbandry

शेतकरी शेतीसोबत जोडव्यवसाय म्हणून शेळी पालन व्यवसाय (Goat rearing business) करत असतात. यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना शेळीपालन व्यवसाय सुरू करताना कोणत्या शेळयांची निवड करावी हे माहीत नसते.

Updated on 19 August, 2022 12:54 PM IST

शेतकरी शेतीसोबत जोडव्यवसाय म्हणून शेळी पालन व्यवसाय (Goat rearing business) करत असतात. यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना शेळीपालन व्यवसाय सुरू करताना कोणत्या शेळयांची निवड करावी हे माहीत नसते.

शेळी पालन व्यवसाय सुरू करत असताना योग्य शेळयांची निवड (Selection of goats) केली तर शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळू शकते. संगमनेरी शेळी संशोधन योजना, महात्मा फुले कृषी विद्यापीठाने शेळयांची निवड कशी करावी? याविषयी माहिती दिली आहे.

शेतकरी मित्रांनो 'या' जातीच्या देशी कोंबड्या पाळून मिळवा बंपर नफा; जाणून घ्या

शेळ्या विकत घेताना अशी काळजी घ्या

1) शेळ्या विकत घेताना शक्य असल्यास पशुतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार खरेदी करा. एकदा वेत झालेली शेळी विकत घेणे चांगले असते.
2) जुळी करडे देणारी शेळी मिळत असेल, तर अशा शेळीची पैदास विकत घेणे शेतकऱ्यांसाठी चांगले ठरेल. दुभती शेळी निवडताना तिचे वय, करडांची संख्या, दुधाचे प्रमाण इत्यादी गोष्टींकडे लक्ष द्या.
3) शेळीपालनाचे यश पैदाशीसाठी वापरलेली शेळी (goat) व बोकड यांवर अवलंबून आहे. म्हणून उत्पादनाच्या उद्दिष्टांसाठी योग्य शेळी व बोकडांची निवड करा.
4) शेळी आकाराने मोठी व तिची मान लांब असावी. तोंडापासून शेपटीपर्यंत असणारा लांबपणा, हेही महत्वाचा आहे.
6) केस मऊ व चमकदार आणि बांधा मोठा असावा. जेणेकरून दोन किंवा अधिक करडांना शेळी आपल्या गर्भाशयात जोपासू शकेल.

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेसंदर्भात अडचणी येत आहेत? करा फक्त एकच काम..

शेतकऱ्यांनो शक्‍यतो एक ते दोन वर्षे वयाचीच (दोन ते चार दाती) शेळी विकत घ्या. पाय सरळ, पिळदार व खूर (टाचा) उंच असावे, कारण चरताना अंतर पार करण्यासाठी मजबूत पायांचा उपयोग होतो. शेळी विकत घेताना तिची कास नीट पारखून घ्यावी. तिला कासदाह रोग नाही ना, याची तपासणी करा.

दुभत्या शेळीची (goat) धार काढून पाहावी. दुधाचे प्रमाण, दुधाचा रंग, कासेवर सूज या गोष्टी पारखून घ्या. निरोगी व भरपूर दूध देणाऱ्या शेळीचे करडू खरेदी करा. करडे रोगमुक्त, तसेच परोपजिवी कीटकांपासून मुक्त असणे महत्वाचे आहे. या गोष्टींची काळजी घेतल्यास शेतकरी चांगले उत्पन्न घेऊ शकतील. 

महत्वाच्या बातम्या 
शेतकऱ्यांनो आता आपला शेतमाल दुसऱ्या राज्यातही विका! वाहतुकीसाठी मिळणार 3 लाखांचे अनुदान
✨ ई-पीक पाहणीच्या नवीन अ‍ॅपवरुन वेळीच प्रक्रिया करा; अन्यथा होईल मोठे नुकसान
💁🏻‍♂️ Mushroom Farming: धिंगरी मशरूम लागवडीतून फक्त 2 महिन्यात कमवा बक्कळ पैसा; अशी करा लागवड

English Summary: Farmers millionaires goat rearing
Published on: 19 August 2022, 12:48 IST