Animal Husbandry

सध्या पावसाने राज्यात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असताना पाहायला मिळत आहे. पावसामुळे फक्त शेतीचेच नुकसान होते, असे नाही तर पशूंच्याही जीवाला धोका निर्माण होत असतो. सध्या पावसाळी वातावरण आहे आणि अशात जनावरांना सर्पदंशापासून सुरक्षित ठेवणे गरजेचे असते.

Updated on 15 July, 2022 5:20 PM IST

सध्या पावसाने राज्यात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असताना पाहायला मिळत आहे. पावसामुळे फक्त शेतीचेच नुकसान होते, असे नाही तर पशूंच्याही जीवाला धोका निर्माण होत असतो. सध्या पावसाळी वातावरण आहे आणि अशात जनावरांना सर्पदंशापासून सुरक्षित ठेवणे गरजेचे असते.

पावसाळ्यात विशेषतः जुलै ते सप्टेंबर आणि पावसाळ्यानंतर ऑक्टोबर - नोव्हेंबरमध्ये अधिक सर्पदंश आढळतो. नाग, कवड्या किंवा घोणस, फुरसे आणि मण्यार हे विषारी साप आहेत.

सर्पदंशाची लक्षणे कोणती ?
सर्पदंशात चाव्याच्या ठिकाणी म्हणजे तोडांवर, पुढच्या किंवा मागच्या पायावर सर्वसामान्यपणे खालील बाजूस सुजेस सुरवात होते. ती हळूहळू वर वाढत जाते. सूज आलेल्या पायाने जनावर लंगडते. तोडांवर सूज असेल तर श्‍वसनास त्रास होतो. सुजेतून रक्तस्राव होतो. नाकातून लघवी, शेणातून रक्त पडते.

जनावर आडवे पडून दगावते. नागदंशात जनावर थरथरते, दात खाते, पापण्याची उघडझाप बंद होते. श्‍वसनास त्रास होतो. तोंडातून लाळ गळणे, उलटी होते. जनावर आडवे पडून झटके देते. ही लक्षणे आढळून येतात.

सर्पदंश झाल्यावर तातडीचा उपचार -
जनावरास पूर्ण आराम द्यावा. त्यांची हालचाल टाळावी. सर्पदंश झालेल्या दोन इंच वरच्या बाजूस पट्टीने बांधावे. दर वीस मिनिटांनी अर्ध्या मिनिटासाठी पट्टी सोडणे गरजेचे आहे. सर्पदंश झाल्यावर काय करू नये?

१) जनावरास चालवत, पळवत दवाखान्यात न नेता, व्यवस्थित न्यावे. ज्यामुळे विष लवकर पसरणार नाही. जनावरास पूर्ण आराम मिळण्याकडे लक्ष द्यावे.

२) सुजेवर घासून पुसू नये, त्यामुळे विष पसरते.

३) जखमेवर डाग देणे, कोंबड्याचे गुदद्वार लावणे, जखम करणे, चिरा देणे, जखमेवर शेंदूर लावणे, जागेवर तोंड लावून विष बाहेर काढणे असे अघोरी प्रकार करू नयेत.

Organic Farming : सेंद्रिय शेतीतून 'या' शेतकऱ्याने वर्षाला घेतले 1 कोटींचे उत्पन्न ; पहा नियोजन पध्दती

सर्पदंश टाळण्यासाठी उपाययोजना -
जनावरांना सुरक्षित निवारा द्यावा. गोठा, परिसरात अडगळ नसावी. स्वच्छता ठेवावी. जनावरांना दाट (Snake Bite) कुरणात चरावयास शक्यतो टाळावे. जनावरांना अंधारात चरावयास सोडू नये. सुरक्षित व आरामदायी ठिकाणी त्यांचे संगोपण करावे.

महत्वाच्या बातम्या:
मोठी बातमी : ‘या’ योजनेचे 26 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा; तब्बल ‘इतक्या’ शेतकऱ्यांची केली निवड
'थोडा गृहपाठ करून मुख्यमंत्र्यांना भेटायला जायला हवे होते' पीककर्जावरून राजू शेट्टी यांनी लगावला टोला

English Summary: Farmer friends; Animals have snakebite? So do 'this' solution immediately, otherwise...
Published on: 15 July 2022, 05:20 IST