सध्या संपूर्ण देशामध्ये जनावरांमध्ये लंम्पी रोगाने थैमान घातले असून संपूर्ण देशभरात भरपूर प्रमाणात गाईंचा मृत्यू झालेला आहे. हा एक जनावरांमधील त्वचारोग असून मोठ्या प्रमाणात गाईंमध्ये याचा प्रसार होत आहे. त्यामुळे बऱ्याच लोकांच्या मनामध्ये या आजाराबद्दल भीती आहे.
त्यामुळे गाईचे दूध प्यावे की नाही याबाबत संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. याबाबत या क्षेत्रातील आरोग्य तज्ज्ञांनी काय मत मांडले ते आपण पाहू.
नक्की वाचा:लम्पी रोगावर स्वदेशी लस विकसीत, या वेळी होणार लसीकरणाला होणार सुरुवात,मोदींची घोषणा
यासंबंधी आरोग्यतज्ञांचे मत
त्यासंबंधी पशुवैद्यक तज्ञानी सांगितले आहे की, घरी आलेले दूध चांगले उकळून जर तुम्ही पिले तर या आजाराचा कुठलाही धोका संभवत नाही. या आजाराचा लोकांनी कुठल्याही प्रकारचा बाऊ करू नये. सावधगिरी बाळगावी असे तज्ञांचे म्हणणे आहे.
याबाबतीत आपण पॅकबंद दुधाचा विचार केला तर ते पाश्चराईज्ड असते. ते संबंधित डेअरीमध्ये एका विशिष्ट उच्च तापमानावर तापवलेले असते. त्यामुळे अशा दुधामध्ये कुठलाही विषाणू असण्याचा धोका संभवत नाही.
नक्की वाचा:शेतकरी मित्रांनो जनावरांचे पालन 'अशा' पद्धतीने करा; अनेक आजारांपासून राहतील दूर
परंतु बऱ्याचदा दूध हे गोठ्यामधून घरी आणले जाते. असे दूध घरी आल्यानंतर मोठ्या प्रमाणात उकळुन घ्यावे. अशा उकळलेल्या दुधाच्या माध्यमातून कोणताही धोका संभवत नाही. एवढेच नाही तर हा आजार जनावरामधून मनुष्यामध्ये संक्रमित झालेला नाही हे अजून आढळून आलेले नाही, असे देखील तज्ञांनी म्हटले.
ज्या जनावराला लंपी आजाराचा प्रादुर्भाव झालेला आहे अशा जनावराचे दूध काढताना मास्क आणि हातमोजे वापरणे गरजेचे असून जनावरांचे दूध चांगले उकळून घ्यावे असा सल्ला देखील तज्ञांनी दिला आहे.
Published on: 14 September 2022, 10:14 IST