दूध उत्पादक, कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे. दिवाळीसाठी वारणा सहकारी दूध संघामार्फत पगार व बोनसचे (Milk Bonus) तब्बल ५४ कोटी ६३ लाख रुपये देणार देण्यात येणार आहेत. अशी माहिती वारणा दूध संघाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे व कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी दिली.
विशेष म्हणजे दूध संघाच्या (Milk Union) इतिहासात प्रथमच दिवाळीमुळे दूध उत्पादकांना म्हैस दुधासाठी प्रतिलिटर २ रुपये ३० पैसे, तर गाय दुधासाठी १ रुपये १० पैसे इतके उच्चांकी फरकबिल देण्याचा निर्णय संघाच्या संचालक मंडळाने घेतला आहे. उत्पादकांच्या खात्यावर फरकबिल, दूधबिल, कामगारांचा बोनस जमा करण्यात येत आहे.
दिलासादायक! सोयाबीन, कांद्याच्या भावात सुधारणा; जाणून घ्या बाजारभाव
आपण पाहिले तर बाजारात वारणाच्या दूध व दुग्ध पदार्थांना (Dairy products) मागणी चांगली वाढली आहे.दिलासादायक बातमी म्हणजे राज्य तसेच राज्याबाहेरील ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे व विक्रीत वाढ झाल्याचे अध्यक्ष डॉ. कोरे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! 'मागेल त्याला विहीर' योजनेअंतर्गत मिळणार 3 लाख 25 हजार रुपयांचे अनुदान
याशिवाय दिवाळीसाठी संघ कर्मचाऱ्यांना ११ टक्के इतका बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. दूध संघाशी संलग्न तात्यासाहेब कोरे दूध-साखर वाहतूक संस्था, सावित्री महिला औद्योगिक संस्था, अमृत सेवक पतसंस्था व डॉ. आर. ए. पाटील पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांना एकाचवेळी बोनस देण्यात येणार आहे. ही माहिती कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
पोस्ट ऑफिसमधील FD वर बँकेपेक्षा मिळणार जास्त व्याजदर; जाणून घ्या
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! फळबाग लागवडीसाठी सरकार देतंय 100 टक्के अनुदान
कान साफ करण्यासाठी इअरबड्स वापरताय? तर सावधान, पोहचू शकतो धोखा
Published on: 17 October 2022, 03:27 IST