Animal Husbandry

सध्या अनेक गोष्टींवर वेगवेगळे प्रयोग केले जातात. यामध्ये चीन आघाडीवर आहे. चीनकडून (China) माणसांसोबतच प्राणी आणि पक्ष्यांवरही विविध वैज्ञानिक प्रयोग (Scientific Experiment) सुरु आहेत.

Updated on 06 February, 2023 10:03 AM IST

सध्या अनेक गोष्टींवर वेगवेगळे प्रयोग केले जातात. यामध्ये चीन आघाडीवर आहे. चीनकडून (China) माणसांसोबतच प्राणी आणि पक्ष्यांवरही विविध वैज्ञानिक प्रयोग (Scientific Experiment) सुरु आहेत.

आता चीनमधील शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की, त्यांनी क्लोनिंगच्या (Cloning) मदतीने 'सुपर काऊ' (Super Cow) म्हणजे सुपर गाय तयार केली आहे. या गायी सामान्य गायींपेक्षा अनेक पटीने जास्त दूध देऊ शकतात, असाही दावा चिनी शास्त्रज्ञांकडून करण्यात येत आहे. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

शास्त्रज्ञांच्या मते, सुपर गाय एका दिवसात 140 लीटर दूध देऊ शकते. यामुळे हा आकडा खूपच मोठा आहे. क्लोन गाय म्हणजे सुपर गाय तिच्या संपूर्ण आयुष्यात 100 टन म्हणजेच 2 लाख 83 हजार लिटर दूध देऊ शकेल. 

घरकुल योजनेचे पैसे घेऊन घर बांधले नाही तर होणार गुन्हा दाखल, 6952 लाभार्थ्यांना न्यायालयाची नोटीस

चीनमधील शास्त्रज्ञांकडून पुढील दोन वर्षात अशा 1000 गायींचे उत्पादन करण्यावर लक्ष आहे. असे झाल्यास दूध उत्पादनात मोठी वाढ होईल. शास्त्रज्ञांनी 23 जानेवारी रोजी सुपर गायीच्या तीन बछड्यांना यशस्वीरित्या क्लोन केल्याचा दावा केला आहे.

शेतकऱ्यांनो ऊसाला तुरा येण्याची कारणे आणि ऊसातील तुरा टाळण्यासाठी उपाययोजना

दरम्यान, चीनच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी शास्त्रज्ञांची ही कामगिरी देशाच्या डेअरी उद्योगासाठी क्रांतिकारक असल्याचे म्हटले आहे. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या;
पशुधन मिल्किंग मशीन : दुग्धव्यवसायीक शेतकऱ्यांची पहिली पसंद
शेतकऱ्यांनो स्वच्छ दूध उत्पादनाची 'ही' आहेत सुत्र
डिजीटल इंडियाच्या नावाखाली विकासाचा डांगोरा पिटला गेला, त्यात जनतेच्या पदरात काय पडले?

English Summary: cow will give 140 liters of milk per day, new experiment on cows...
Published on: 06 February 2023, 10:03 IST