भारतामध्ये पशुपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. पशुपालना मध्ये दूध उत्पादन हा प्रमुख आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत आहे. परंतु आपल्याला माहीत आहेस की, जनावरांपासून चांगले दूध उत्पादन हवे असेल तर त्यांच्यासाठी खायला पौष्टिक खाद्याची अथवा चाऱ्याची व्यवस्था करणे खूप गरजेचे असते. परंतु यामध्ये खर्चामध्ये वाढ न होता दूध उत्पादन वाढवणे हे देखील एक किमया आहे.
कारण पशुपालकांचा बराचसा खर्च हा पशुखाद्य वर खूप मोठ्या प्रमाणावर होतोपण त्यामुळे खर्चात वाढ होते व मिळणारा नफा कमी होतो. त्यामुळे पशुपालकांनी जर घरच्या घरी अगदी कमी खर्चामध्ये चांगला वनस्पतीजन्य खुराक तयार केला व तो जनावरांना खायला दिला तर खर्च कमी होईलच,
परंतु दूध उत्पादन देखील वाढेल. यासाठी जनावरांच्या चाऱ्यामध्ये घरच्या घरी कमी खर्चात आणि पौष्टिक घटकांनी समृद्ध अझोला हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. या लेखामध्ये आपण अझोलाचे उत्पादन कसे घ्यावे याबद्दल जाणून घेऊ.
अशा पद्धतीने घ्या ऍझोलाचे उत्पादन आणि मिळवा पौष्टिक चारा
1- तुम्हाला अझोलाचे उत्पादन घ्यायचे असेल तर त्यासाठी झाडाची सावली किंवा एखादी भरपूर सूर्यप्रकाश असणारी जागा निवडावी. 50 टक्के शेडनेटचा वापर केला तरी चालते.
अशा ठिकाणी जमिनीवर दोन मीटर लांबी बाय दोन मीटर रुंद आणि 12 इंच खोल खड्डा खोदावा. त्यानंतर खड्ड्याचा पृष्ठभाग आहे तो सारख्या प्रमाणात करून घ्यावा.
त्यामुळे खड्ड्यामध्ये जे पाणी राहील त्याची पातळी सगळीकडे सारखी राहील. हे झाल्यानंतर खड्ड्यामध्ये सिल्पोलीन प्लास्टिक कागद अंथरूण घ्यावा.
नक्की वाचा:खर की काय! गाई- म्हशींना मीठ दिल्यास वाढती दुधाची क्षमता? वाचा तज्ञांची प्रतिक्रिया
प्लास्टिक कागद सगळीकडे व्यवस्थित पॅक राहील याची काळजी घ्यावी व सर्व बाजूंनी विटांचा थर कागदावर लावावा.
2- आता तुमच्या खड्डा अजोला साठी व्यवस्थित तयार करण्यासाठी खड्ड्यामध्ये 10 ते 15 किलो सुपिक व गाळलेली माती व्यवस्थित पसरवून घ्यावी.
त्यानंतर त्यामध्ये पाच किलो चांगले कुजलेले शेण आणि 30 ग्रॅम सुपर फॉस्फेट पाण्यात चांगले मिसळून एकजीव करून खड्ड्यांमध्ये पसरलेल्या मातीच्या थरावर पसरवून ओतावे. ही प्रक्रिया झाल्यानंतर खड्ड्यामध्ये दहा सेंटिमीटर एवढे पाणी भरून घ्यावे.
त्यानंतर एक दिवस ते असेच ठेवावे व दुसऱ्या दिवशी या खड्ड्यामध्ये एक किलो ताजे आणि शुद्ध स्वरूपाचे अजोला कल्चर सोडावे. आठ ते दहा दिवसांमध्ये अझोलाची पूर्ण वाढ होते व खड्डा पूर्ण भरून जातो. अशा रीतीने कमी खर्चात घरच्याघरी पौष्टिक चारा जनावरांना उपलब्ध करता येतो.
नक्की वाचा:शेतीतून लाखों रुपये कमवायचे आहेत? तर 'या' जोडव्यवसायातून लाखोंमध्ये घ्या कमाई
Published on: 22 July 2022, 11:51 IST