Animal Husbandry

शेतकरी (farmers) शेतीसोबत अनेक जोडव्यवसाय करीत चांगले उत्पादन घेत असतात. यामधील प्रमुख व्यवसाय म्हणून शेतकरी दुग्धव्यवसायावर (Dairying) जास्त भर देत आहेत. दुग्धव्यवसाय करत असताना शेतकऱ्यांनी जनावरांमधील आजारांकडे दुर्लक्ष करू नये.

Updated on 31 August, 2022 1:15 PM IST

शेतकरी (farmers) शेतीसोबत अनेक जोडव्यवसाय करीत चांगले उत्पादन घेत असतात. यामधील प्रमुख व्यवसाय म्हणून शेतकरी दुग्धव्यवसायावर (Dairying) जास्त भर देत आहेत. दुग्धव्यवसाय करत असताना शेतकऱ्यांनी जनावरांमधील आजारांकडे दुर्लक्ष करू नये.

कारण याचा परिणाम दुध उत्पादनावर (milk production) होत असतो. परिणामी अशा जनावरांचे बाजारमुल्यही कमी होते. त्यासाठी आजाराची लक्षणे ओळखून त्वरित उपचार करणे गरजेचे असते.

गुजरात येथील नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट (National Dairy Development) बोर्डाने कासदाह आजारावर नैसर्गीक उपचारांची शिफारस केली आहे. ही औषधे घरात सहज उपलब्ध होणारे आहे. शेतकरी कमी खर्चात तयार करू शकतात.

शेतकऱ्यांचे अच्छे दिन; सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात तुरीचे दर वाढणार 3 हजार रुपयांनी

कासदाह आजार होण्याची कारणे

1) मोठी कास असणाऱ्या तसेच संकरित जनावरांमध्ये कास दाह होण्याचे प्रमाण जास्त असते.
2) वाढत्या वयाची जनावरे म्हणजे तिसऱ्या- चौथ्या वेतातील जनावरांमध्येही कासदाहाचे प्रमाण जास्त असते.
3) जनावरे बसण्याची आणि सभोवतालच्या जागेची अस्वच्छता.
4) धार काढणाऱ्या व्यक्तीची अस्वच्छता.
5) दूध पूर्ण न काढले गेल्यामुळे कासेला जखम झालेली होणे इ.

घरीच तयार करा औषध

कोरफड, हळद, चुना आणि लिंबू वापरुन हे औषध तयार होते. यामध्ये २५० ग्रॅम कोरफड, ५० ग्रॅम हळद, १५ ग्रॅम चुना एकत्र मिक्सरमध्ये वाटून पेस्ट तयार करा.

ढगाळ हवामानामुळे पिकांवर रोगराई वाढण्याची शक्यता; असे करा नियंत्रण

वापरण्याची पद्धत

1) मुठभर पेस्टमध्ये १५० ते २०० मिली पाणी घालून पातळ मिश्रण तयार करा.

2) जनावराची कास स्वच्छ धुऊन तयार केलेले मिश्रण पूर्ण सडावर लावा. हे मिश्रण दिवसातून १० वेळा सलग पाच दिवस लावा.

3) २ लिंबाचे काप दिवसातून दोन वेळा सलग तीन दिवस चारा.

4) दुधामध्ये रक्त किंवा लालसरपणा असेल तर वरील मिश्रणामध्ये दोन मुठी कडीपत्ता व गुळ याची पेस्ट दिवसातून दोनवेळा चारा.

महत्वाच्या बातम्या 
शेतकरी मित्रांनो आता घराच्या छतावरच तयार करा वीज; सरकार देतंय 50 हजारांपर्यंत अनुदान
शेतकऱ्यांनो सावधान! उसावरील विषारी अळी जीवाला पोहचवतेय हानी
गणपतीत 'या' लोकांचे सोनेरी दिवस सुरू होणार; कारण बाप्पाची असते विशेष कृपा

English Summary: Animal Husbandry milk production Kasadah disease animals
Published on: 31 August 2022, 01:07 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)