Animal Husbandry

शेतकरी शेतीसोबत जोडव्यवसाय म्हणून दुग्धव्यवसाय करत असतात. यातून चांगले उत्पादन घेण्याचा प्रयत्न करतात. मात्र चांगले उत्पादन घेण्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे असते.

Updated on 16 August, 2022 10:43 AM IST

शेतकरी शेतीसोबत जोडव्यवसाय म्हणून दुग्धव्यवसाय (Dairying) करत असतात. यातून चांगले उत्पादन घेण्याचा प्रयत्न करतात. मात्र चांगले उत्पादन (product) घेण्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे असते.

जनावरांमध्ये कॅल्शिअमची (calcium) कमतरता असते, वेळीच लक्ष नाही दिले तर उत्पादनात घट होण्याची डाट शक्यता असते. विशेष म्हणजे जनावरांमध्ये कॅल्शिअमची कमतरता (Calcium deficiency) असेल तर जनावरांची वाढ खुंटते, दूध उत्पादन कमी होते, शरीरातील रक्त गोठण्यास वेळ लागतो. हाडे ठिसूळ होतात.

लहान जनावरात मुडदूस आणि प्रौढ जनावरांत उरमोडीची लक्षणे दिसतात. चारा खाण्याचे प्रमाण कमी होते. गाई आणि म्हशीमध्ये प्रजोत्पादनासंबंधी समस्या दिसतात. त्यामुळे वेळीच याकडे लाख देणे गरजेचे आहे.

Government Scheme: 'या' योजनेत फक्त एकदा गुंतवणूक करा आणि मिळवा दुप्पट नफा

पशुपालकांनो तुम्हाला हे माहिती असणे गरजेचे आहे की, जनावरांच्या शरीरातील अनेक शारीरिक आणि जैवरासायनिक प्रक्रियांमध्ये कॅल्शिअमचा मोठ्या प्रमाणावर सहभाग करतो.

यामध्ये रक्त जमा करणे, स्नायूंच्या उत्तेजना आणि आकुंचन यांचे जोडणे, मज्जातंतूंच्या उत्तेजिततेचे नियमन, शुक्राणूंची गतिशीलता, ओव्याचे फलन, पेशींचे पुनरुत्पादन यांचा समावेश होतो. कॅल्शिअम हे संदेशवाहकामध्ये महत्त्वाचे काम करते.

जनावरांच्या शरीरातील कॅल्शिअमचे प्रमाण

जनावरांच्या शरीरात कॅल्शिअमचे प्रमाण (Calcium content) जवळ जवळ एक टक्के एवढे असते. शरीरातील ९९ टक्के कॅल्शिअम हाड (Calcium bone) व दातांमध्ये असते. कॅल्शिअम मऊ पेशीत व रक्तात साठवलेले असते. जनावरांच्या उत्पादन आणि आरोग्याच्या व्यवस्थापनात कॅल्शिअम हे महत्त्वाचे घटक आहे.

Weather Update: विदर्भात विजांच्या कडकडाटासह धो-धो बरसणार पाऊस; 'या' भागांना यलो अलर्ट जारी

उपचार

जनावराला नियमित खाद्यातून कॅल्शियमयुक्त क्षार मिश्रणे द्यावीत. मोठ्या जनावरांत ५० ते १०० ग्रॅम तर लहान जनावरांत १५ ग्रॅम द्यावे. जनावराला द्विदल पिकाचा पालेदार चारा द्या. दुग्धज्वर आजारावर पशुतज्ज्ञाच्या सल्याने उपचार करा.

कॅल्शिअमची कमतरता होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय

रवंथ करणाऱ्या जनावरांमध्ये विशेषतः दुधाळ गाई, म्हशींमध्ये २५ ग्रॅम ते ५० ग्रॅम क्षार मिश्रण द्या. पशू आहारात लुसर्न किंवा डाळ वर्गीय चाऱ्याचा समावेश करा.

गाई, म्हशीच्या गाभण काळाच्या शेवटच्या १ ते २ आठवड्यात कमी कॅल्शियमयुक्त आहार द्या. जनावराची नियमित व्यायाम होईल याची काळजी घ्यावी लागेल. पशू तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार जीवनसत्वे "ड " चे इंजेक्शन गाय,म्हैस विण्याअगोदर एक आठवडा आधी द्या.

महत्वाच्या बातम्या 
Castor Farming: एरंडेल शेतीतून लाखोंची कमाई घेण्यासाठी 'या' खास पद्धतीचा अवलंब करा; जाणून घ्या
Diabetes Solution: मधुमेह नियंत्रणात राहण्यासाठी गुळवेलसह या पानांचा वापर करा; होईल फायदा
Planting Bananas: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता रोहयोअंतर्गत होणार 'या' पिकाची लागवड; अनुदानाचा मिळणार लाभ

English Summary: Animal Husbandry Calcium Deficiency Animals recognize tsymptoms
Published on: 16 August 2022, 10:29 IST