शेतकरी शेतीसोबत जोडव्यवसाय म्हणून कुक्कुटपालन (poultry farming) करतात. यातून चांगले उत्पादन घेतले जाते. आता सरकारही शेतकऱ्यांना मदत करीत आहे. पशुसंवर्धन (animal husbandry) विभागाकडून 1 हजार कुक्कुटपालन मांसल पक्षाचे संगोपन करण्याची योजना राबविली जात आहे.
माहितीनुसार यावर्षी राज्यातील २ हजार २७८ लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे. यावर अनुदानापोटी ३३ कोटी ४३ लाखाचे अनुदान दिले आहे. जिल्हानिहाय उद्दिष्ट निश्चित करण्यात आले.
सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना ५० टक्के, तर अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील शेतकऱ्याला (farmers) ७५ टक्के अनुदान दिले जाते. अनुदान (subsidy) देण्यासाठी यंदा मागील वर्षापेक्षा अधिक तरतूद केली आहे. मागील काही वर्षाच्या तुलनेत यावर्षीची लाभार्थी संख्या अधिक आहे.
या योजनेतून अनुदान मिळावे, यासाठी मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. गेल्यावर्षीपासून ऑनलाइन अर्ज करण्याला सुरुवात झाली आहे.या योजनेतून सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना १ लाख १२ हजार ५००, अनुसूचित जाती-जमातीच्या शेतकऱ्यांना (farmers) १ लाख ६८ हजार ७५० रुपये अनुदान दिले जात आहे.
शेतकरी मित्रांनो 'या' जातीच्या देशी कोंबड्या पाळून मिळवा बंपर नफा; जाणून घ्या
मर्यादा वाढविण्याची गरज
ही कुक्कुटपालन योजना अन्य विभागामार्फतही राबवली जात होती. त्यात पक्ष्यांची संख्या आणि अनुदान अधिक होते. आता ते कमी केले आहे. मात्र शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करता मर्यादा, तसेच लाभार्थी वाढावेत म्हणून अनुदान वाढवण्याची गरज असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे.
Mineral Mixture: दुधाळ जनावरांना द्या खनिज मिश्रण; दुधाच्या उत्पादनात होईल वाढ
जिल्हानिहाय लाभार्थी
ठाणे - २८ लोक लाभार्थी आणि ३८ लाख २७ हजार अनुदान
पालघर - २५ लोक लाभार्थी आणि २९ लाख ७७ हजार अनुदान
रायगड - ३६ लोक लाभार्थी आणि ४७ लाख १३ हजार अनुदान
रत्नागिरी - ३० लोक लाभार्थी आणि ३९ लाख ९१ हजार अनुदान
सिंधुदुर्ग - ३० लोक लाभार्थी आणि २७ लाख २८ हजार अनुदान
पुणे - १२० लोक लाभार्थी आणि कोटी ८२ लाख ८० हजार अनुदान
सातारा - ८१ लोक लाभार्थी आणि १ कोटी १६ लाख ९६ हजार अनुदान
सांगली - ७७ लोक लाभार्थी आणि १ कोटी १३ लाख ४ हजार अनुदान
सोलापुर - ११२ लोक लाभार्थी आणि १ कोटी ८५ लाख ९७ हजार अनुदान
कोल्हापुर - १०४ लोक लाभार्थी आणि १ कोटी ५४ लाख १६ हजार अनुदान
नाशिक - ९४ लोक लाभार्थी आणि १ कोटी २९ लाख ३३ हजार अनुदान
धुळे - ३६ लोक लाभार्थी आणि ४९ लाख ७३ हजार अनुदान
नंदुरबार - २६ लोक लाभार्थी आणि ३१ लाख ८३ हजार अनुदान
जळगाव - ९२ लोक लाभार्थी आणि १ कोटी ३० लाख ९२ अनुदान
नगर - १३४ लोक लाभार्थी आणि १ कोटी ९७ लाख ६० अनुदान
अमरावती - ९१ लोक लाभार्थी आणि १ कोटी ३८ लाख २७ हजार अनुदान
बुलडाणा - १०२ लोक लाभार्थी आणि १ कोटी ५६ लाख ६७ हजार अनुदान
यवतमाळ - ७७ लोक लाभार्थी आणि १ कोटी १३ लाख ४७ हजार अनुदान
अकोला - ६३ लोक लाभार्थी आणि ९७ लाख १० हजार अनुदान
वाशीम - ५१ लोक लाभार्थी आणि ७८ लाख ६० हजार अनुदान
नागपूर - ६६ लोक लाभार्थी आणि ९७ लाख १५ हजार अनुदान
भंडारा - ४३ लोक लाभार्थी आणि ६४ लाख १९ हजार अनुदान
वर्धा - ३४ लोक लाभार्थी आणि ५० लाख १४ हजार
गोंदिया - ३७ लोक लाभार्थी आणि ६० लाख १५ हजार अनुदान
चंद्रपूर - ५६ लोक आणि ८० लाख १ हजार अनुदान
गडचिरोली - ३३ लोक लाभार्थी आणि ४३ लाख ३५ हजार अनुदान
औरंगाबाद - ७६ लोक लाभार्थी आणि १ कोटी १० लाख ९१ हजार अनुदान
जालना - ६५ लोक लाभार्थी आणि ९६ लाख ४५ हजार अनुदान
परभणी - ५० लोक लाभार्थी आणि ७६ लाख ५६ हजार अनुदान
बीड - ८२ लोक लाभार्थी आणि १ कोटी २० लाख ८२ हजार अनुदान
लातुर - ९४ लोक लाभार्थी आणि १ कोटी ४५ लाख ३० हजार अनुदान
उस्मानाबाद - ६१ लोक लाभार्थी आणि ९१ लाख ६० हजार अनुदान
नांदेड - १२३ लोक लाभार्थी आणि १ कोटी ८७ लाख ६२ हजार अनुदान
महत्वाच्या बातम्या
PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेसंदर्भात अडचणी येत आहेत? करा फक्त एकच काम..
Heavy Rain: शेतकऱ्यांनो पावसापासून पिकांना वाचवण्यासाठी 'या' महत्त्वाच्या गोष्टी करा; होईल फायदा
शेतकऱ्यांनो आता आपला शेतमाल दुसऱ्या राज्यातही विका! वाहतुकीसाठी मिळणार 3 लाखांचे अनुदान
Published on: 19 August 2022, 03:06 IST