Animal Husbandry

कोल्हापुरातील मेरी वेदर ग्राऊंडवर भीमा कृषी प्रदर्शन सुरू आहे. कृषी प्रदर्शनात वेगवेगळ्या भागातील प्राण्यांनी सर्वांच लक्ष वेधून घेतलं. याठिकाणी मुऱ्हा जातीचा 12 कोटी रुपयांचा बादशहा रेडा पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे. त्याचीच बहीण 31 लिटर दूध देणारी बिजली नावाची म्हैसही या ठिकाणी पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे.

Updated on 31 January, 2023 12:21 PM IST

कोल्हापुरातील मेरी वेदर ग्राऊंडवर भीमा कृषी प्रदर्शन सुरू आहे. कृषी प्रदर्शनात वेगवेगळ्या भागातील प्राण्यांनी सर्वांच लक्ष वेधून घेतलं. याठिकाणी मुऱ्हा जातीचा 12 कोटी रुपयांचा रेडा पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे. त्याचीच बहीण 31 लिटर दूध देणारी बिजली नावाची म्हैसही या ठिकाणी पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे.

हरियाणा येथील प्रदीपसिंग चौधरी यांच्या मालकीचा हा रेडा आहे. त्यांच्या घरी 25 जनावरांचा मोठा गोठा आहे. ज्यामध्ये अनेक रेडे आणि म्हशी आहेत. प्रदीप यांचे वडील कुवरसिंग आणि आई इंद्रावती या जनावरांची देखभाल करतात. प्रदिपच्या वडिलांना जनावरं पालनाची आवड होती. या जनावरांसाठी त्यांनी विशेष गोठ्याची देखील सोय केली आहे.

या प्रदर्शनात 12 कोटींच्या रेड्याची सर्वात जास्त हवा होती. कृषी प्रदर्शनात आलेला प्रत्येक जण हा रेडा पाहून थक्क होत होता. या रेड्याची 12 कोटी इतकी किंमत त्याच्या वीर्यामुळे ठरवली जाते. त्याच्या सरकारी नियमानुसार दहा वर्षात या रेड्याकडून 12 कोटी रुपयांपर्यंतची वीर्य विक्री होऊ शकते.

शेतकऱ्यांनो उन्हाळी सूर्यफूल लागवडीचे नियोजन जाणून घ्या..

बादशाह रेडा हा तीन वेळा नॅशनल चॅम्पियन मिळविणारा जगातील सर्वात मोठा रेडा आहे. त्याची उंची 6 फूट आहे. हा चार वर्षांचा रेडा असून त्याचे वजन 1100 किलो आहे. पहाटे त्याला खाद्य दिले जाते. त्यानंतर त्याला अंघोळ घातली जाते. त्याचबरोबर दर महिन्याला त्याच्या अंगावरचे केस काढले जातात.

शेतकऱ्यांनो उन्हाळी भुईमूग लागवड तंत्रज्ञान

या बादशाह रेड्याला कॉटन सीड, चना, गव्हाचा कोंडा, दूध, हिरवा चारा, मका, ड्रायफ्रूट्स त्याच बरोबर मोसमी फळे असे खाद्य दिले जाते. त्याची तब्येत तंदरुस्त राहावी यासाठी त्याला रोज एक कॅल्शियमची बॉटल देखील देण्यात येते. यामुळे त्याची देशात चर्चा आहे.

महत्वाच्या बातम्या;
कृषी क्षेत्राला अर्थसंकल्पातून मोठ्या बदलांची अपेक्षा, मोदी सरकाराने शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे
काळे मनुके आहेत खूपच फायदेशीर, उपाशी पोटी काळे मनुके खा, ह्रदयविकार टाळा
शेतकऱ्यांनो शेतीमध्ये जिवामृत तंत्रज्ञान महत्वाचे

English Summary: 12 crore reda high, farmers were stunned to see reda
Published on: 31 January 2023, 12:21 IST