1. कृषीपीडिया

उन्हाळी भुईमूग लागवड तंत्रज्ञान

उन्हाळी भुईमुगाची पेरणी १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करावी. पेरणीच्या ८ ते १० दिवस अगोदर शेंगा फोडून बियाणे पेरणीसाठी तयार करावे. पेरणीसाठी चांगल्या प्रतीचे बियाणे निवडावे. महाराष्ट्रात तेलबियांची पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड होते. त्यापैकी भुईमूग हे अत्यंत महत्त्वाचे तेलबिया म्हणून ओळखले जाते. खरीप हंगामापेक्षा उन्हाळी हंगामातील भुईमुगाची उत्पादकता जास्त असते.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
Summer Groundnut Cultivation

Summer Groundnut Cultivation

उन्हाळी भुईमुगाची पेरणी १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करावी. पेरणीच्या ८ ते १० दिवस अगोदर शेंगा फोडून बियाणे पेरणीसाठी तयार करावे. पेरणीसाठी चांगल्या प्रतीचे बियाणे निवडावे. महाराष्ट्रात तेलबियांची पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड होते. त्यापैकी भुईमूग हे अत्यंत महत्त्वाचे तेलबिया म्हणून ओळखले जाते. खरीप हंगामापेक्षा उन्हाळी हंगामातील भुईमुगाची उत्पादकता जास्त असते. जमिनीत पुरेसा ओलावा भरपूर सूर्यप्रकाश, कोरडे हवामान या बाबी पिकाच्या वाढीस पोषक ठरतात.

जमीन :
मध्यम, पाण्याचा चांगला निचरा होणारी, वाळू, सेंद्रिय पदार्थ मिश्रित जमीन लागवडीस योग्य असते. या प्रकारची जमीन नेहमी भुसभुशीत राहत असल्यामुळे हवा कायम खेळती राहते. त्यामुळे मुळांची वाढ चांगली होऊन आऱ्या सहजतेने जमिनीत जाण्यासाठी आणि शेंगा पोसण्यासाठी मदत होते.

पूर्वमशागत :
जमिनीची खोल नांगरट करून कुळवाच्या २-३ पाळ्या द्याव्यात. शेवटच्या कुळवणी अगोदर हेक्टरी १० टन शेणखत जमिनीत मिसळावे.

गणेश जाधव यांनी फुलवली अंजीराची बाग, खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून कौतुकाची थाप

बीजप्रक्रिया :
पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाणांस थायरम ५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम २ ग्रॅम किंवा मॅन्कोझेब ३ ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम चोळावे. बुरशीनाशकांच्या बीजप्रक्रियेनंतर रायझोबियम २५ ग्रॅम आणि स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धक २५ ग्रॅम याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. प्रक्रिया केलेले बियाणे सावलीत वाळवावे आणि नंतर पेरणीसाठी वापरावे.

पेरणी :
पेरणी १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करावी. पेरणीस उशीर होईल तशी उत्पादनात घट येते.

प्रजासत्ताक दिनानिमित्त बीकेटी टायर्सची ‘मुस्कुरायेगा इंडिया’ या प्रेरणादायी गीताने भारताच्या शेतकरी आणि जवानांना मानवंदना

बियाणे प्रमाण :
पेरणीच्या ८-१० दिवस अगोदर शेंगा फोडून पेरणीसाठी बियाणे तयार करावे. पेरणीसाठी चांगल्या प्रतीचे बियाणे निवडावे फुटके, कीडके, साल निघालेले, आकाराने लहान बी काढून टाकावे. पेरणीसाठी शिफारशीत वाणांचे खालीलप्रमाणे बियाणे वापरावे.
◆टी.जी.२६, एस.बी.११, जे.एल.५०१, टी.ए.जी.२४, हेक्टरी १०० किलो बियाणे,
◆फुले उन्नती, फुले उनप (जे.एल.२८६), फुले भारती (जे.एल.७७६) हेक्टरी १२०-१२५ किलो

पेरणी अंतर, पद्धत :
भुईमूग लागवड ही पेरणी आणि टोकण पद्धतीने करता येते. पेरणी दोन ओळींतील अंतर ३० सेंमी आणि दोन रोपांतील अंतर १० सेंमी ठेवून करावी. उगवण झाल्यानंतर लगेच नांग्या भराव्यात.

महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो उन्हाळी सूर्यफूल लागवडीचे नियोजन जाणून घ्या..
जळगावमध्ये कापसाअभावी जिनिंग मिल्स बंद होण्याच्या मार्गावर
कलिंगड, खरबुज लागवड आणि व्यवस्थापन

English Summary: Summer Groundnut Cultivation Technology Published on: 27 January 2023, 04:57 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters