Agripedia

महाराष्ट्रामध्ये टोमॅटोची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. नाशिक जिल्ह्यात फार मोठ्या प्रमाणात टोमॅटोची लागवड होते.

Updated on 25 April, 2022 1:44 PM IST

महाराष्ट्रामध्ये टोमॅटोची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. नाशिक जिल्ह्यात फार मोठ्या प्रमाणात टोमॅटोची लागवड होते.

इतर पिकांप्रमाणे टोमॅटोवर देखील किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे उत्पादनात घट येते, परंतु वेळीच योग्य व्यवस्थापन आणि नियंत्रण ठेवले तर येणाऱ्या संबंधित रोगांवर नियंत्रण मिळवता येते व उत्पादनात नुकसान न होता चांगले उत्पन्न मिळते. टोमॅटो वर येणाऱ्या रोगांपैकी बोकड्या  किंवा पिवळा पर्णगुच्छ हा रोग खूप नुकसान कारक असूनयोग्य वेळी नियंत्रण करणे फार गरजेचे आहे.या लेखात आपण या विषयी माहिती घेऊ.

 टोमॅटो वरील बोकड्या किंवा पिवळा पर्णगुच्छ रोग

 पावसाळ्यानंतर किंवा उन्हाळ्यातील टोमॅटो पिकावर येणारा हा महत्त्वाचा रोग आहे. हा रोग येण्याचे सर्वात प्रमुख कारण म्हणजे टोमॅटो पिकावर असणारी पांढरी माशी ही होय. टोमॅटोची लागवड केल्यानंतर 40 ते 50 दिवसांमध्ये पिकावर पांढरा माशा दिसू लागतात व पिकाच्या शेवटपर्यंत राहतात. पांढरा माशांमुळे होणाऱ्या या रोगाची लक्षणे आपण आता बघू.

 पिवळा पर्णगुच्छ रोगाची लक्षणे

 या रोगाचा प्रादुर्भाव टोमॅटो पिकावर झाल्यास रोपाची वाढ खुंटते आणि पाने खालच्या बाजूने गुंडाळी होऊन सुरकुतलेली दिसतात.झाडाला जी नवीन पाने तयार होतात त्यावर पांढरे चट्टे दिसून येतात.

जुनी प्रादुर्भावित पाने गुंडाळी झालेली पाने खरबरीत आणि ठिसूळ बनतात.यामध्ये रोपांची शाकीय वाढ कमी झाल्याने वाढ खुंटते. रोगाने प्रादुर्भावित रोपे मलुल दिसतात आणि आडव्या फांद्या अधिक आल्यामुळे झाड अगदी झुडूपा सारखे दिसते.एवढेच नाही तर पानाच्या कडा आतल्या बाजूने वळतात.पाने जाड बनतात व खरबरीत होतात आणि खालची बाजू जांभळ्या रंगाची बनते. टॉमेटोचे रोप अगदीझुडूप सारखे दिसते.

 पिवळा पर्णगुच्छ  रोगावर उपाययोजना

 टोमॅटो वर झालेल्या पांढऱ्या माशीच्या प्रादुर्भावास साठी आणि टोमॅटो वरील पिवळा पर्णगुच्छ रोगाच्या नियंत्रणासाठी सर्वात प्रभावी उपाय म्हणजे एकात्मिक कीड नियंत्रण हे होय व त्यासोबत कीडनाशकांचा वापर, रोगप्रतिकारक शक्ती असणारे वाण ची निवड तसेच जैविक उपाय योजना यांचा समावेश करणे फार महत्वाचे आहे. वाढ झालेली कीटक आणि पिल्ले या दोन्हींवर  पेगासस 50 डब्ल्यू पी चा वापर करून टोमॅटो वरील पांढरी माशी वर नियंत्रण ठेवता येते.

हे संपर्क, स्थानीय आंतरप्रवाही आणि गॅस द्वारे कृती करते आणि त्याच्यामुळे कीटकांच्या प्रतिकारशक्ती निर्माण व्हायच्या शक्ती कमी होते.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:ऊसातील हुमणी: मे ते ऑगस्ट या काळातील सातत्यपूर्ण प्रयत्न ठरतील ऊस पिकातील हुमणीच्या नियंत्रणासाठी फायदेशीर

नक्की वाचा:स्मार्ट व्यवस्थापन देईल स्मार्ट उत्पादन! या पद्धतीने तुरीचे हेक्टरी 40 क्विंटल उत्पादन शक्य

नक्की वाचा:पशुपालक मित्रांनो! जनावरांच्या चारा व्यवस्थापनात डॉ. शरद कठाळे सरांचे अनमोल मार्गदर्शन

English Summary: yellow leaf curl disease is so harful in tommato crop and decrese production of tommato
Published on: 25 April 2022, 11:18 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)