Agripedia

देशातील अनेक राज्यांमध्ये खरीप आणि रब्बी हंगामात मका पिकची पेरणी मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र आता मका पिकावर कीड आणि तणाचा मोठा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. तण आणि किडीमुळे मका पिकची वाढ खुंटते. तसेच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील होत असते.

Updated on 21 October, 2022 4:44 PM IST

देशातील अनेक राज्यांमध्ये खरीप (Kharip Season) आणि रब्बी हंगामात (Rabi Season) मका (Maize) पिकची पेरणी मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र आता मका पिकावर कीड आणि तणाचा मोठा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. तण आणि किडीमुळे मका पिकची वाढ खुंटते. तसेच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील होत असते.

मका पिकाची (Maize Crop) पेरणी राज्यात मोठ्या प्रमाणात केली जाते. तसेच मका लागवड ही दुग्धव्यवसायिकांसाठी गरजेचे पीक मानले जाते. परंतु गेल्या काही वर्षांपासून मका पिकावर किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊ लागला आहे.

तसेच मका पिकमध्ये तणही (weed) जास्त उगवते. या तणाचा परिणाम मका पिकावर होत असतो. शेतकऱ्यांना मक्यातील तण खुरपून काढणे परवडणारे नाही. त्यामुळे अनेकदा शेतकरी तणावर औषध मारत असतात.

चार दिवसानंतरही पीएम किसानचे पैसे आले नाहीत? त्वरित येथे करा कॉल, मिळतील पैसे

पण काही वेळा औषध मारूनही तण जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दोन वेळा तणनाशकांची फवारणी करावी लागते. त्यामुळे शेतकऱ्यांचा पैसाही वाया जातो आणि वेळही. तसेच तणामुळे मका पिकाच्या उत्पादनावरही मोठा परिणाम होत असतो.

तणांच्या बिया मिसळल्याने पिकाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो, ज्यामुळे शेवटी पिकाचे मूल्य कमी होते. पिकाचा कस कमी होतो तसेच शेतकऱ्यांना अपेक्षित असलेले उत्पन्न मिळत नाही.

मानलं भावा! जर्मनीतील लाखोंची नोकरी सोडून पिकवतोय वाटाणा; शेतीतून करतोय करोडोंची उलाढाल

पोषक, प्रकाश आणि पाण्यासाठी प्राथमिक पीक वनस्पतीशी स्पर्धा करण्याव्यतिरिक्त, ते कधीकधी संलग्न पिकासाठी विषारी म्हणून ओळखली जाणारी रसायने देखील तयार करते, ज्याचा पीक उत्पादकतेवर परिणाम होतो. परिणामी, मका उत्पादनात तणांना अजूनही गंभीर आर्थिक समस्या म्हणून पाहिले जाते.

बाजारात मका पिकातील तणनाशकासाठी नवीन औषध आले आहे. इफको (IFFCO) एमसीने 'युटोरी' (Utori) नावाचे औषध शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिले आहे. हे औषध मक्यातील तणाला रामबाण उपाय ठरत आहे.

महत्वाच्या बातम्या:
मुसळधार पावसाचा राज्यातील व्यापाऱ्यांनाही फटका! साठवलेला कांदा गेला वाहून; 3 ते 4 कोटींचे नुकसान
Supriya Sule: शेतकऱ्यांकडं ना झाडी, ना हॉटेल ना 50 खोके; सुप्रिया सुळेंचा सरकारला टोला

English Summary: Weeds in the corn crop will be destroyed! This new herbicide is proving to be a panacea
Published on: 21 October 2022, 04:38 IST