Agripedia

रब्बी हंगामामध्ये शेतकरी विविध प्रकारची पिके घेतात. परंतु यामध्ये प्रामुख्याने गहू आणि हरभरा यासारखी पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. परंतु काही शेतकरी कमी कालावधीत येणाऱ्या पिकांची लागवड करून जास्तीचा आर्थिक फायदा कसा होईल या दृष्टिकोनातून पिकांची लागवड करतात. त्यासाठी आपण कडधान्यवर्गीय पिकांमधील मूग पिकाचा विचार करू शकतो. अवघ्या चार ते पाच पाण्याच्या पाळ्यामध्ये 60 ते 65 दिवसात हे पीक काढणीस तयार होऊ शकते.

Updated on 26 September, 2022 1:38 PM IST

रब्बी हंगामामध्ये शेतकरी विविध प्रकारची पिके घेतात. परंतु यामध्ये प्रामुख्याने गहू आणि हरभरा यासारखी पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. परंतु काही शेतकरी कमी कालावधीत येणाऱ्या पिकांची लागवड करून जास्तीचा आर्थिक फायदा कसा होईल या दृष्टिकोनातून पिकांची लागवड करतात. त्यासाठी आपण कडधान्यवर्गीय पिकांमधील मूग पिकाचा विचार करू शकतो. अवघ्या चार ते पाच पाण्याच्या पाळ्यामध्ये 60 ते 65 दिवसात हे पीक काढणीस तयार होऊ शकते.

उन्हाळ्यामध्ये प्रखर सूर्यप्रकाश व उष्ण हवामानात हे पीक चांगले येते उत्पादन चांगले मिळते. त्यामुळे उन्हाळी हंगामासाठी मुगाच्या शिफारशीत वाणांची लागवड करणे खूप गरजेचे आहे. या लेखामध्ये आपण उन्हाळी मुगाच्या भरघोस उत्पादनासाठी महत्त्वाच्या असलेल्या तंत्राची माहिती घेऊ.

नक्की वाचा:ठिबक वरील वांग्याची शेती आणि भरघोस उत्पन्न वाचा फायद्याची यशोगाथा

उन्हाळी मूगाचे तंत्र

1- यामध्ये वैभव आणि बी.पी.एम.आर.145 या जाती रोगप्रतिकारक व जास्त उत्पादन देणारा असून पेरणी करताना दोन ओळींमध्ये 30 सेंटीमीटर आणि दोन रोपात दहा सेंटिमीटर अंतर ठेवून पाभरीने मुग पेरावा.

एका एकर मध्ये पाच ते सहा किलो बियाणे लागते. पेरणी केल्यानंतर पाण्याचे व्यवस्थापन करता यावे यासाठी चार ते पाच मीटर रुंदीच्या सऱ्या पाडून घ्याव्यात.

2- मुळकुजव्या रोगाच्या नियंत्रणासाठी प्रति किलो बियाण्याला पाच ग्रॅम ट्रायकोडर्मा+ 25 ग्रॅम रायझोबियम जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी.

मुग पिकासाठी चवळी गटाचे रायझोबियम जिवाणू संवर्धक वापरावे. ट्रायकोडर्मा मुळे बुरशीजन्य रोगांचे नियंत्रण होते व रायझोबियममुळे मूग पिकाच्या मुळावरील गाठी वाढतात व नत्राची उपलब्धता वाढते.

2- जर आपण मुगाच्या वानांचा विचार केला यामध्ये विविध प्रकारचे वाण असून यामध्ये वैभव आणि बी.पी.एम.आर. 145 या जाती रोगप्रतिकारक व अधिक उत्पादन देणारे आहेत.

त्याचप्रमाणे कोपरगाव एक याच पारंपरिक पद्धतीपेक्षा अधिक उत्पादन देणारे असून कोपरगाव एक ही जुनी जात असून त्यावर भुरी रोगाचा मोठा प्रादुर्भाव होतो त्यामुळे याची लागवड टाळावी.

नक्की वाचा:Crop Cultivation: 'या' पिकाच्या लागवडीतून 80 ते 100 दिवसात मिळेल भक्कम उत्पादन आणि बक्कळ नफा

3- लागवड करण्याआधी कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. या खतामुळे हवेतील ओलावा शोषून मुळाभोवती गारवा निर्माण होतो.

या पिकासाठी 20 किलो नत्र आणि 40 किलो स्फुरद म्हणजेच 100 किलो डीएपी प्रति हेक्‍टरी द्यावे. रासायनिक खते चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये मिसळून बियाणे लगत व्यवस्थित टाकून द्यावीत म्हणजे त्याचा चांगला वापर होतो.

4- मुगाचे पीक अगदी सुरुवातीपासून तणविरहित ठेवणे खूप गरजेचे आहे. पिक जेव्हा 21 ते 22 दिवसांचे होईल तेव्हा पहिली आणि 30 ते 35 दिवसांचे असताना दुसरी कोळपणी करावी.

कोळपणी नंतर दोन रोपांतील तण काढण्यासाठी लगेच खुरपणी करावी. हे पिक 30 ते 45 दिवस तणविरहित ठेवणे हे उत्पादन वाढण्याच्या दृष्टीने खूप आवश्यक आहे.

5- पीक फुलोरा अवस्थेत असताना आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये ओलाव्याची कमतरता भासू देऊ नये. अशा परिस्थितीत पिकास पाणी देणे आवश्‍यक आहे. दोन टक्के युरियाची फवारणी करणे देखील महत्त्वाची ठरते.

नक्की वाचा:Date Farming: खजुराची शेती आहे शेतकऱ्यांसाठी वरदान, देऊ शकते भक्कम आर्थिक समृद्धी

English Summary: this is technology is so useful for growth production of green gram crop
Published on: 26 September 2022, 01:38 IST