आपण जेव्हा पिकांची किंवा फळबागेची लागवड करतो, त्या वेळेला अगदी सुरुवातीपासून पिकांची तंत्रशुद्ध व्यवस्थापन करणे खूप गरजेचे असते. कारण कुठल्याही गोष्टीची सुरुवात जर परफेक्ट असेल तर ती गोष्ट त्याच परिपूर्णतेने पूर्णत्वास जाते. आपण म्हणतो ना की घरबांधणीसाठी घराचा पाया हा खूप मजबूत असावा लागतो. हीच बाब फळबागेचे आणि पिकांच्या बाबतीत देखील आहे.
जर तुमचे लहानपणापासून पिकांच्या किंवा फळबागांच्या बाबतीत सगळ्यात प्रकारचे व्यवस्थापन तंतोतंत असेल तर पुढे भविष्यात येणारे उत्पादन हे देखील बंपर स्वरूपात तुम्हाला मिळते. त्यामुळे आपण या लेखांमध्ये पिकांच्या सुदृढ वाढीसाठी आणि योग्य फुलधारणा आणि परिणामी फळधारणा होण्यासाठी कोणत्या प्रकारची खते पिकांना आणि फळझाडांना उपयुक्त ठरतील ते पाहू.
नक्की वाचा:Management: हिवाळ्यात भरघोस उत्पादन हवे असेल तर वापरा 'या' टिप्स,मिळेल आर्थिक नफा
पिकांच्या सुदृढ वाढीसाठी महत्वाची खते
कुठलाही पिकाच्या आणि फळबागेच्या लागवडीआधी शेणखत, कोंबडी खत, हिरवळीची खते जमिनीत गाडणे यासारखे प्रयोग किंवा या खतांचा पुरवठा जर जमीनीत केला तर जमिनीचा पोत सुधारतो आणि त्याचा परिणाम पिकांच्या सदृढ वाढ होण्यावर होतो.
नत्र, स्फुरद आणि पालाश तीनही मुख्य अन्नद्रव्य पिकांच्या आणि फळांच्या फूल व फळधारणेवर खूप परिणाम करतात. नत्र पिकाच्या कायिक वाढीसोबत पानांचा आकार, नवीन फुटवे वाढवतात. झाडाच्या पानांची वाढ चांगली झाल्यास झाडांना अन्नपुरवठा चांगल्या पद्धतीने होतो.
यामुळे या अन्नद्रव्यांच्या पुरवठ्यासाठी युरिया, अमोनियम सल्फेट, कॅल्शियम- अमोनियम नायट्रेट ही खते खूप उपयुक्त आहेत. या खतामुळे पिकास नत्र उपलब्ध होतो व त्यानंतर फूल व फळ धारणा चांगल्या पद्धतीने होते.
2-फळ व फुलधारणेसाठी पालाशचे महत्व- पालाश मुळे प्रामुख्याने पिष्टमय पदार्थांची निर्मिती आणि त्यांचे साखरेत रूपांतर होणे ही क्रिया जी आहे ती गतिशील होते.
त्यामुळे ऊस, कलिंगड, रताळी आणि विविध प्रकारची फळे या शर्करायुक्त पिकांना पालाशची गरज खूप जास्त असते. याच्या पुरवठ्यामुळे साखरेचे प्रमाण वाढते व फळांना व फुलांना चांगला रंग आणि आकार येतो.
एवढेच नाही तर भाजीपाला पिकामध्ये आणि फळ आणि फुल पिकांमध्ये जास्तीत वापर राहिला तर या त्यांचा साठवणूक कालावधी देखील वाढतो व कृषी मालाचा दर्जा सुधारतो व चांगला भाव मिळण्यास मदत होते.
Published on: 04 August 2022, 04:38 IST