Agripedia

जर तुम्हाला ताजे टोमॅटो सॉस आवडत असेल तर तुमच्या बागेत रोमा टोमॅटो वाढवा.जर तुम्ही रोमा टोमॅटोची रोपे वाढवली आणि त्यांची काळजी घेतली तर तुमच्याकडे स्वादिष्ट स्वास बनवण्यासाठी योग्य टोमॅटो असेल.या लेखामध्ये आपण रोमा टोमॅटो वाढविण्यासाठी ज्या काही महत्त्वपूर्ण टिप्स पाहू.

Updated on 15 June, 2022 10:06 PM IST

जर तुम्हाला ताजे टोमॅटो सॉस आवडत असेल तर तुमच्या बागेत रोमा टोमॅटो वाढवा.जर तुम्ही रोमा टोमॅटोची रोपे वाढवली आणि त्यांची काळजी घेतली तर तुमच्याकडे स्वादिष्ट स्वास बनवण्यासाठी योग्य टोमॅटो असेल.या लेखामध्ये आपण रोमा टोमॅटो वाढविण्यासाठी ज्या काही महत्त्वपूर्ण टिप्स पाहू.

 रोमा टोमॅटो वाढवण्यासाठीच्या टिप्स

 रोमा टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन ए आणि सी जास्त प्रमाणात असते. हा टोमॅटो  केवळ स्वादिष्टच नाही तर आरोग्यासाठी देखील महत्त्वपूर्ण आहे. रोमा टोमॅटो याला रोमा प्लम टोमॅटो म्हणून देखील ओळखले जाते. रोमा टोमॅटो हे नॉन रोमा टोमॅटो किंवा पेस्ट टोमॅटो पेक्षा अधिक मजबूत असतात.

इटालियन टोमॅटो किंवा इटालियन पल्म टोमॅटो म्हणून देखील ओळखले जातातअनेक देशातील स्टोअर मधून सहजपणे खरेदी केले जाऊ शकतात.

 रोमा टोमॅटोचे व्यवस्थापन कसे करायचे?

1- तुम्ही बियाण्यांपासून रोमा टोमॅटो सुरू करू शकता किंवा त्यांच्या वाढीसाठी तुमच्या स्थानिक नर्सरी मधुन रोपे घेऊ शकतात.

2- रोमा टोमॅटोच्या रोपांना चांगल्या उत्पादनासाठी दीर्घकाळ वाढण्याची गरज असते. या टोमॅटोच्या चांगल्या उत्पादनासाठी ओलसर, पाण्याचा चांगला निचरा झालेल्या जमिनीत सुमारे दीड इंच खोल लागवड करावी.

3- कृत्रिम दिवे वापरा किंवा रोपे दक्षिणाभिमुख खिडकी जवळ ठेवा.  पुरेसा प्रकाश न दिल्यास रोपांची देठ ताणून वाकतात.

नक्की वाचा:बाटलीबंद नारळ पाण्याची निर्यात अन नारळापासून इतर उत्पादने देत आहेत नारळ शेतीतून चांगले उत्पन्न

4- रोमा टोमॅटो रोपांची काळजी घेणे नियमित टोमॅटोची काळजी घेण्यासारखेच आहे. बहुतेक टोमॅटोला पुरेसे पाणी आणि सेंद्रिय समृद्ध मातीटोमॅटो उगवण्यासाठी आवश्यक असते.

5- या टोमॅटोची लागवड करताना संपूर्ण हंगामात आपण कंपोस्ट किंवा इतर खत देखील देऊ शकतात. वैकल्पिकरित्या दर दोन किंवा तीन आठवड्यांनी द्रव खत वापरावे.  तथापि उच्च नायट्रोजनखतांचा याला वापर करू नका. कारण यामुळे पाने जास्त वाढतात परंतु टोमॅटो गुणवत्तेवर नकारात्मक परिणाम होतो.

6- रोमा टोमॅटोची रोपे लागवड केल्यानंतर त्यांना आठवड्यातून किमान एकदा पाणी द्यावे.  जेव्हा तुमची रोमा टोमॅटोची रोपे 6 ते 12 इंच उंच होतात तेव्हा त्यांना जमिनीपासून(15-30.5 सेंटीमीटर)काढणे सुरू करा.

7- रोपांची छाटणी- रोमा टोमॅटोला छाटणीची गरज नाही कारण ते बुश प्रकार म्हणजे झुडुपवजा आहेत. त्यामुळे छाटणी ची एवढी आवश्यकता नसते परंतु जास्त प्रमाणात छाटणी केली तर उत्पादन कमी होऊ शकते.

नक्की वाचा:महत्वाचे!जर पडला पावसाचा खंड तर अशा पद्धतीने करा सोयाबीन पिकाचे व्यवस्थापन, होईल नक्कीच फायदा

8- तणनियंत्रण- तनाचे समस्या निर्माण होण्याआधी त्यांची मशागत करण्यासाठी बागेची कुदळ वापरावी. जमिनीच्या पृष्ठभागाच्या खाली असलेल्या तण काढण्यासाठी तुम्ही पुरेसे कुदळीने खोल खोदून घ्यावे.

परंतु टोमॅटोच्या मुळाना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.

9-लागवडीनंतर सुमारे 70 ते 80 दिवसात तुमच्या टोमॅटो काढणीसाठी तयार होतील.रोमा टोमॅटो हे एक निश्चित वनस्पती असून त्याचे सर्व फळे एकाच वेळी पक्व होतात. आहे त्यांचा महत्त्वपूर्ण फायदा आहे.

नक्की वाचा:Soyabien Crop:बऱ्याच प्रमाणात सोयाबीनची पाने पिवळी पडतात कारण…..

English Summary: the cultivation process of roma tomato variety thats use for making tomato sauce
Published on: 15 June 2022, 10:06 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)