Agripedia

शेतकरी मित्रांनो सध्या सर्वत्र रब्बी हंगामातील पिके (Rabbi Crop) अंतिम टप्प्यात आली आहेत. रब्बी हंगामातील पिके मार्च ते एप्रिल महिन्याच्या दरम्यान काढणीसाठी तयार होत असतात. या कालावधीपर्यंत रब्बी हंगामातील (Rabbi Season) जवळपास सर्वच पिकांची काढणी आपटली जाते. रब्बी हंगामानंतर उन्हाळी हंगामात (summer season) कोणत्या पिकांची लागवड शेतकरी बांधवांसाठी विशेष फायदेशीर ठरू शकते याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. आज आपण उन्हाळी हंगामात अल्प कालावधीत काढणीसाठी तयार होणाऱ्या पिकांची माहिती जाणून घेणार आहोत जेणेकरून शेतकरी बांधवांना अल्प कालावधीत अधिक नफा कमवता येऊ शकतो.

Updated on 15 March, 2022 2:27 PM IST

शेतकरी मित्रांनो सध्या सर्वत्र रब्बी हंगामातील पिके (Rabbi Crop) अंतिम टप्प्यात आली आहेत. रब्बी हंगामातील पिके मार्च ते एप्रिल महिन्याच्या दरम्यान काढणीसाठी तयार होत असतात. या कालावधीपर्यंत रब्बी हंगामातील (Rabbi Season) जवळपास सर्वच पिकांची काढणी आपटली जाते. रब्बी हंगामानंतर उन्हाळी हंगामात (summer season) कोणत्या पिकांची लागवड शेतकरी बांधवांसाठी विशेष फायदेशीर ठरू शकते याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. आज आपण उन्हाळी हंगामात अल्प कालावधीत काढणीसाठी तयार होणाऱ्या पिकांची माहिती जाणून घेणार आहोत जेणेकरून शेतकरी बांधवांना अल्प कालावधीत अधिक नफा कमवता येऊ शकतो.

जसं की आपणास ठाऊकच आहे की, उन्हाळी हंगामात आपल्याकडे पाण्याची मोठी टंचाई भासत असते. सर्वत्र उन्हाळी हंगामात पाणी अल्प प्रमाणात उपलब्ध असते. मराठवाड्यात तर दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्यामुळे उन्हाळ्यात पिण्याचे पाण्याचे देखील हाल होत असतात. त्यामुळे आज आपण कमी पाण्यात आणि अल्पकालावधीत या हंगामात कोणत्या पिकांची लागवड केली तर शेतकरी बांधवांना अधिक नफा मिळू शकतो याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत.

हेही वाचा:-Aloe Vera Cultivation: कमी पैशात करा कोरफडची शेती आणि कमवा लाखों रुपये

दाळवर्गीय पिकांची लागवड करण्याचा सल्ला (Advice to cultivate pulses)

कृषी वैज्ञानिकांच्या मते, उन्हाळी हंगामात पाण्याची कमतरता असल्याने शेतकरी बांधव या हंगामात मुंग तसेच उडीद (Mung bean and urad) या दाल वर्गीय पिकांची लागवड करू शकतात. या पिकांची लागवड केली तर शेतकरी बांधवांना चांगले उत्पन्न देखील मिळेल शिवाय यामुळे जमिनीची सुपीकता देखील वाढण्यास मदत होत असल्याचे वैज्ञानिकांनी या वेळी स्पष्ट केले. या दोन डाळवर्गीय पिकांसमवेतच शेतकरी बांधव उन्हाळी हंगामात भाजीपाला पिकांची देखील लागवड करू शकतात. भाजीपाला वर्गीय पिके अल्पकालावधीत काढण्यासाठी तयार होत असल्याने या पिकांना अधिक पाण्याची आवश्‍यकता नसते त्यामुळे कमी पाण्यात आणि अल्पकालावधीत या पिकांपासून चांगले उत्पन्न मिळत असल्याचा दावा केला जातो.

हेही वाचा:-…. असं झालं तर कांद्याचे बाजारभाव पार करतील पाच हजरांचा टप्पा; जाणुन घ्या याविषयी

भाजीपालावर्गीय पिकांची लागवड करण्याचा सल्ला (Advice to cultivate vegetable crops)

कृषी वैज्ञानिकांच्या मते, शेतकरी बांधव उन्हाळी हंगामात दुधी भोपळा, टोमॅटो अर्थात टमाटर, वांगी, पुदिना, दोडके इत्यादी भाजीपाला वर्गीय पिकांची लागवड करून चांगला मोठा नफा कमवू शकतात.

जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी या पिकाची लागवड करण्याचा सल्ला (Advise to cultivate this crop to increase soil fertility)

उन्हाळी हंगामात शेतकरी बांधवांनी मुंग या डाळी वर्गीय पिकांची लागवड करण्याचा सल्ला कृषी वैज्ञानिक देत असतात. कृषी वैज्ञानिकांच्या मते, या हंगामात मुंग पिकाची लागवड केल्यास यामुळे जमिनीची सुपीकता वाढते तसेच शेतकर्‍यांना चांगले उत्पन्न देखील मिळत असते. शिवाय मुंग हे डाळवर्गीय पीक केवळ 65 दिवसात उत्पादन देण्यास तयार होत असते. हे अल्प कालावधीत काढणीसाठी तयार होणारे पीक प्रती बिघा दोन क्विंटलपर्यंत उत्पादन देऊ शकते. या पिकाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे यासाठी लागणारा उत्पादन खर्च खूपच नगण्य असतो. मुंग प्रमाणेच उडीद देखील एक प्रमुख डाळवर्गीय पीक आहे याची लागवड देखील जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी मदत करत असल्याचा दावा केला जातो. तसेच हे पीक देखील 65 दिवसात उत्पादन देण्यासाठी तयार होत असते. याच्या पिकातून प्रति बिघा 1 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळत असते. 

हे वाचा :-‘या’ फळाची लागवड करा आणि कमवा लाखो! बाजारात सदैव मागणी म्हणून कमाई होणार बम्पर; जाणुन घ्या याविषयी सविस्तर

काय सांगता मका देखील लावता येईल (Maize can also be planted)

शेतकरी बांधवांनो उन्हाळी हंगामात मक्याचे देखील उत्पादन घेतले जाऊ शकते. यासाठी आपण पायनियर 1844 या जातीची पेरणी करू शकता. कृषी वैज्ञानिक मक्याच्या या वाणाची शिफारस करतात कारण की, हे वाण अल्प कालावधीत उत्पादन देण्यासाठी तयार होत असते. शिवाय मक्याचे हे वाण उन्हाळी हंगामात देखील दर्जेदार उत्पादन देण्यास सक्षम असते.

हे वाचा:-Mushroom Farming! फक्त 6×6 मध्ये करा मशरूमची शेती आणि मिळवा बक्कळ नफा

English Summary: start these crops farming in summer season to make more profit scientist advice
Published on: 15 March 2022, 02:27 IST