देशातील शेतकरी सध्या पारंपारिक पीक पद्धतीला फाटा दाखवत, मागणी मते असलेल्या नगदी पिकांची लागवड करण्याकडे वळले आहेत. पारंपारिक पिकांसाठी शेतकरी बांधवांना उत्पादन खर्च अधिक करावा लागतो तसेच यापासून अगदी अत्यल्प उत्पन्न प्राप्त होत असल्याने शेतकऱ्यांना उत्पादन खर्च आणि उत्पन्न यामध्ये सांगड घालणं मोठं मुश्किलीचं होऊन बसल आहे. पारंपारिक पिकांची लागवड करून शेतकरी बांधवांना समाधानकारक उत्पन्न प्राप्त होतं नाही परिणामी शेतकरी बांधव कर्जबाजारी होत असतात. त्यामुळे कृषी क्षेत्रातील जाणकार लोक, शेतकरी बांधवांना नगदी पिकांची लागवड करण्याचा सल्ला देत आहेतं.
आज आपण सदैव मागणी मध्ये असलेल्या निलगिरीच्या शेती विषयी जाणून घेणार आहोत. याची लागवड करून शेतकरी बांधव लाखो रुपये अर्जित करू शकतो, चला तर मग मित्रांनो जाणुन घेऊया निलगिरीच्या शेतीविषयी. निलगिरीच्या लाकडाला बाजारात बारामाही मोठी मागणी असते. याच्या लाकडाचा उपयोग फर्निचर, इंधन आणि कागद तयार करण्यासाठी आवश्यक लगदा बनवण्यासाठी केला जातो. मात्र, याची लागवड करताचं शेतकऱ्यांना ताबडतोब उत्पन्न प्राप्त होतं नाही, कारण की निलगिरीचे रोप लावल्यानंतर सुमारे 8 ते 10 वर्षात झाड बनते तेव्हा याचे लाकूड बाजरात विकले जातं असते. निलगिरीचे लाकूड विक्री करून जवळपास 10 ते 12 लाख रुपये कमवले जाऊ शकता. हळूहळू हा नफा 25 ते 30 लाख रुपयापर्यंत वाढू शकतो. मात्र, शेतकऱ्यांनी शेतात याच्या रोपांची सखोल लागवड केली तर याचे लाकूड चौथ्या वर्षापासून विकता येईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
निलगिरीच्या झाडाची लागवड अशा ठिकाणी करण्याचा सल्ला दिला जातो ज्या ठिकाणी तापमान 30 ते 35 अंशांच्या आसपास असते. अशा हवामानात याची लागवड केल्यास त्यापासून दर्जेदार उत्पादन प्राप्त होत असल्याचा दावा केला जातो. याव्यतिरिक्त ज्या शेतात निलगिरीची रोपे लावली जातात त्या शेतात पावसाळ्याचे पाणी साचणार नाही याची विशेष काळजी घ्यावी. याची लागवड ज्या जमिनीत पाण्याचा चांगला निचरा होतो त्या जमिनीत करण्याचा सल्ला दिला जातो. या वनस्पतींच्या चांगल्या वाढीसाठी, चिकणमाती असलेल्या जमिनीत याची लागवड करावी असे सांगितले जाते.
निलगिरीची रोपे लावण्यासाठी सर्वप्रथम शेताची पूर्वमशागत करणे अनिवार्य असते सर्व्यात आधी जमीन नांगरावी लागते. नांगरणीनंतर जमीन चांगली समतल करणे आवश्यक असते. शेत समतल झाल्यानंतर 5 फूट अंतरावर एक फूट रुंदीचे व 1 फूट खोल खड्डे तयार करावे लागणार आहे. प्रत्येक रांगेत 5 ते 6 फूट अंतर ठेवावे लागणार आहे. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की या वनस्पतींमध्ये आपण इतर पीक आंतरपीक म्हणून घेऊ शकता आणि चांगला नफा कमवू शकता.
हेही वाचा:-
बदक पालन शेतकऱ्यांसाठी ठरणार वरदान! पण ‘या’ गोष्टी नेहमी ठेवा ध्यानात
Published on: 11 March 2022, 05:51 IST