Agripedia

अनेक शेतकरी बांधव गव्हाचे चांगले उत्पादन मिळत नसल्याची तक्रार करतात. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी गव्हाच्या विविध जातींची लागवड करावी जेणेकरून त्यांना मोठा नफा मिळू शकतो.

Updated on 23 June, 2022 3:17 PM IST

 अनेक शेतकरी बांधव गव्हाचे चांगले उत्पादन मिळत नसल्याची तक्रार करतात. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी गव्हाच्या विविध जातींची लागवड करावी जेणेकरून त्यांना मोठा नफा मिळू शकतो.

आज आपण ज्या गहू च्या जाती बद्दल माहिती घेणार आहोत तो केवळ दिसायलाच नाहीतर खाण्यातही खूप पौष्टिक आणि शेतकर्‍यांना भरघोस नफा देणारा आहे. या गव्हाचे नाव आहे शरबती गहू हे होय.

 शरबती गव्हाची वैशिष्ट्ये

1- ''शरबती'' हा देशात उपलब्ध गव्हाचा सर्वात प्रीमियम प्रकार आहे.

2- सीहोर भागात शरबती गव्हाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

3- सीहोर प्रदेशात काळी आणि गाळाची सुपीक जमीन आहे जी शरबती गव्हाच्या उत्पादनासाठी योग्य आहे.

4- शरबती गव्हाला सोनेरी दाणे असेही म्हणतात. कारण त्याच्या रंग सोनेरी आहे.

5- जर आपण तळहातावर त्याच्या गव्हाच्या दाण्याला ठेवले तर जड वाटतो आणि चवीला गोड असतो म्हणुन त्याचे नाव शरबती पडले.

नक्की वाचा:रोप जोमदार,कांद्याचे उत्पादन जोमदार! 'अशा' पद्धतीने करा खरीप कांद्याचा रोपवाटिकेचे व्यवस्थापन

6- सीहोर जिल्ह्यात 40 हजार 390 हेक्टर क्षेत्रात शरबती गहू पेरला जातो आणि वार्षिक उत्पादन 109053 दशलक्ष टन आहे.

 7- शरबती हा मध्य प्रदेशात ओळखला जाणारा उत्तम दर्जाचा गहू आहे.

8- या गव्हाचे पीठ चवीला गोड आणि पोत इतरांपेक्षा चांगला असतो.

9- मध्यप्रदेशात काळी आणि गाळाची सुपीक माती आहे जी या गव्हाच्या लागवडीसाठी योग्य आहे.

10- शरबती गव्हाला सुवर्ण धान्य असेदेखील म्हटले जाते.

11- हा गहू मध्यप्रदेश राज्यातील सिहोर,नरसिंगपूर,होशंगाबाद,हरदा,अशोक नगर,भोपाळ आणि माळवा जिल्ह्यांमध्ये घेतला जातो.

12- त्याच्या सरासरी पेरणी चा प्रमाण एकरी 30 ते 35 किलो आहे.

13- त्याचे उत्पादन हेक्‍टरी 40 ते 45 क्विंटल येते.

14- शरबती गहू 135 ते 140 दिवसांमध्ये काढणीस येतो.

15- चांगल्या पिकासाठी कमीत कमी दोन सिंचनाच्या सुविधा आवश्यक आहे.

नक्की वाचा:'हे' लसणाचे वाण देतील भरपूर उत्पादन, जाणून घेऊ लसणाची लागवड पद्धत

 त्याची आणखी वैशिष्ट्य

 मध्यप्रदेशात पावसाच्या पाण्याने सिंचन होत असल्याने शरबती गव्हाच्या जमिनीत पोटॅशचे प्रमाण जास्त आणि आद्रता कमी असते.

परिणामी सामान्य गव्हाच्या पिठाच्या तुलनेत या गव्हातील प्रथिनांचे प्रमाण सुमारे दोन टक्के वाढते.त्यामुळे शरबती गहू पिकामध्ये कीटकनाशकांच्या वापराची गरज कमी होते आणि हेच कारण आहे की,शरबती गव्हाचे पीठ इतर गव्हाच्या पीठा पेक्षा पौष्टिक दृष्टीने चांगले ठरते.

शरबती गव्हामध्ये आरोग्यदायी घटक

 यात अत्यंत पौष्टिक घटक आहे आणि त्यात सुमारे 113 कॅलरीज, चरबी एक ग्रॅम, कार्बोहायड्रेट( आहारातील फायबरसह 21 ग्रॅम), प्रथिने पाच ग्रॅम, कॅल्शियम 40 मिलिग्रॅम,

  लोह 0.9 मिलीग्राम प्रति 30 ग्रॅम असते. याशिवाय यामध्ये मॅग्नेशियम, सेलेनियम, कॅल्शियम, झिंक आणि मल्टिव्हिटॅमिन यासारख्या पोषक तत्त्वांचा समावेश आहे.

 महत्वाचे

 शरबती गव्हाची ''C-306 जात'' संपूर्ण भारतभर घेतली जाऊ शकते.

नक्की वाचा:भेंडीवरील व्हायरसमुळे शेतकऱ्यांच्या खिशाला लागती कात्री

English Summary: sharbati wheat give more production and profit to farmer
Published on: 23 June 2022, 03:17 IST