Agripedia

शेतकरी शेतीमध्ये जास्त उत्पादनासाठी अनेक खतांचा अती वापर करतात. मात्र यामुळे जमिनीचा पोत खराब होतो आणि याचा परिणाम शेतकरी घेत असलेल्या पिकांवर होत असताना पाहायला मिळतो. या होणाऱ्या नुकसानिवर पर्याय कोणता? याविषयी आपण सविस्तर माहिती घेऊया.

Updated on 07 September, 2022 3:55 PM IST

शेतकरी शेतीमध्ये (agriculture) जास्त उत्पादनासाठी अनेक खतांचा अती वापर करतात. मात्र यामुळे जमिनीचा पोत खराब होतो आणि याचा परिणाम शेतकरी घेत असलेल्या पिकांवर होत असताना पाहायला मिळतो. या होणाऱ्या नुकसानिवर पर्याय कोणता? याविषयी आपण सविस्तर माहिती घेऊया.

याला पर्याय म्हणून नॅनो युरियासारख्या (Nano urea) नॅनो खतांचा वापर वाढविण्यास सरकार आग्रह करत आहे. तज्ञांनी केलेल्या वेगवेगळ्या प्रयोगांनुसार, नॅनो युरियाचा वापर वाढल्यामुळे युरियाचा वापर कमी होऊन उत्पादनात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

नॅनो युरिया चाचणी सफल

नॅनो युरियाच्या मूल्यमापनासाठी आयसीएआर आणि राज्य कृषी विद्यापीठांच्या (Agricultural University) संशोधन संस्थांद्वारे नॅनो युरियाच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. या चाचण्यांद्वारे पीक उत्पादकता, खतांच्या डोसमध्ये कपात, शेतकर्‍यांचा नफा अशा विविध पैलूंवर लक्ष देण्यात आले आहे.

हृदयविकाराचा झटका साधारणपर्यंत किती वेळा येऊ शकतो? जाणून घ्या सविस्तर

सरकारने म्हणण्यानुसार, वेगवेगळ्या ठिकाणी आणि कृषी-हवामान झोनमध्ये नॅनो युरिया-लिक्विडच्या (Nano Urea-Liquid) वापराच्या परिणामांवरून असे लक्षात आले की, तांदूळ, गहू, मका, टोमॅटो, काकडी आणि सिमला मिरची यांसारख्या पिकांच्या वाढीच्या टप्प्यावर नॅनो युरिया फायदेशीर ठरत असून उत्पादनात देखील वाढ होते.

केंद्र सरकारने आखली नवीन योजना; आता घरगुती गॅस मिळणार फक्त 600 रुपयांमध्ये

नॅनो युरियाच्या वापराने उत्पादनात वाढ

नॅनो युरियाबाबत (urea) केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. संपूर्ण चाचणीनंतरच देशात नॅनो युरियाचा वापर सुरू करण्यात आल्याचे केंद्राने म्हटले आहे. त्यामुळे खतांचा वापर कमी होऊन उत्पादनात वाढ होत असल्याचे सांगितले आहे.

केंद्रीय खते समितीने (Central Fertilizer Committee) डेटाच्या आधारे आणि जैवतंत्रज्ञान विभागाशी (Department Biotechnology) सल्लामसलत केल्यानंतर याची शिफारस केली आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने देखील या संदर्भात डेटा आणि योग्य विचाराच्या आधारे शिफारस केली आहे.

महत्वाच्या बातम्या 
Ganesh Visarjan 2022: लाडक्या बाप्पाचे विसर्जन करताना 'हे' 12 नियम लक्षात ठेवा
शेतकरी मित्रांनो पुढील 2 महिन्यात करा 'या' पाच पिकांची लागवड; मागणी असणार जादा
शेतकऱ्यांनो काळजी करू नका; खते जादा दराने विक्री केल्यास विक्रेत्यांविरोधात होणार कारवाई

English Summary: Report submitted Central Government nano urea
Published on: 07 September 2022, 03:49 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)