महाराष्ट्रमध्ये भुईमुगाची लागवड प्रामुख्याने रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात केली जाते. डिसेंबर ते जानेवारी महिन्यात थंडीचे प्रमाण जास्त असल्यामुळे महाराष्ट्रातल्या बऱ्याच भागात भुईमुगाची पेरणी फेब्रुवारी महिन्यात करावी लागते.
कारण भुईमूग उगवण्याच्या वेळी जमिनीचे तापमान 18 पेक्षा जास्त असणे जरुरीचे असते. तापमान 13 अंश सेंटीग्रेड च्या खाली गेल्यास भुईमुगाची वाढ खुंटते. पीक फुलोऱ्यात असताना तापमान 20 ते 24 अंश सेंटिग्रेड च्या दरम्यान आणि शेंगा तयार होण्याच्या कालावधीमध्ये 24 ते 27 अंश सेंटिग्रेड तापमान आवश्यक असते. त्यामुळेच या ठिकाणी मे महिन्यापर्यंत पाण्याची सोय चांगली आहे अशा ठिकाणी हे पीक घेणे शेतकऱ्यांना परवडते. महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमध्ये मार्चच्या शेवटपर्यंत पाण्याची कमतरता भासत नाही. त्यामुळे भुईमूग लवकर पेरून म्हणजे नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याच्या कालावधीत पेरून पाणी कमी होण्यापूर्वी काढणी करण्याला तापमानाच्या मर्यादा निर्माण होतात. यावर मात करण्यासाठी पारदर्शक प्लॅस्टिक आच्छादनाचा वापर करून भुईमुगाची पेरणी नोव्हेंबर मध्ये आणि काढणी मार्चअखेरपर्यंत करणे शक्य झाले आहे.
प्लास्टिक आच्छादनाचे फायदे
1- जमिनीच्या आतील तापमान पाच अंश ते 8 अंश सेंटीग्रेड ने वाढते. भुईमुगाची उगवण सुमारे सात ते आठ दिवस लवकर होते.
2- जमिनीतून उष्णतेमुळे होणारे बाष्पीभवन रोखले जाते त्यामुळे पिकास पाणी कमी लागते आणि पाण्याची बचत होते.
3- पिकांना उपयुक्त जिवाणू मध्ये जमिनीत वाढ होते व त्यांचे कार्यक्षमता सुधारते.
4- जमिनीतील उपयुक्त जिवाणूंची वाढ झाल्यामुळे भुईमुगाची नत्र स्थिरीकरणाचे क्षमता वाढते. तसेच इतर आवश्यक स्फुरद, पालाश इत्यादी घटकांची उपलब्धता देखील वाढते.
5- मुळांची वाढ जोमदार होते आणि मुळाचा एकूण विस्तार वाढतो.
6- पिकाची वाढ जोमदार झाल्याने फुले लवकर आणि जास्त प्रमाणात येतात त्यामुळे शेंगाचे प्रमाण वाढून शेंगा भरण्यास जास्त कालावधी मिळतो.
7- काही आऱ्या उशिरा येतात त्यामुळे त्या कमकुवत असतात त्यामुळे जमिनीत गेलेल्या आर्यांमध्ये दाणे चांगले पोचले जातात आणि सर्व शेंगा जवळजवळ एकाच वेळी तयार होतात.
8- शेंगा मधील तेल आणि प्रथिनांचे प्रमाण वाढते.
9- भुईमूग साधारण आठ ते दहा दिवस लवकर काढणीस तयार होतो.
10- भुईमुगाची वाढ जोमदार झाल्यामुळे रोगांचे प्रमाण कमी होते व शेंगाचे उत्पादन वाढते.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:अतिशय महत्त्वाचे! खार जमीन असेल तर या पद्धतीने शक्य आहे खार जमीन सुधारणा, वाचा सविस्त
Published on: 26 April 2022, 09:38 IST