कपाशी पीक म्हटले म्हणजे गुलाबी बोंड आळी ही कपाशी पिकाची कर्दनकाळच आहे. एकदा का जर कपाशीवर गुलाबी बोंड आळीचा प्रादुर्भाव झाला तर विचार करू शकत नाहीइतक्या प्रमाणात कपाशी पिकाच्या उत्पादनात घट होण्याचा संभव असतो.
.तसे गुलाबी बोंड आळीच्या प्रादुर्भावाचे कारणांचा विचार केला तरयामध्ये विविध कारणे आढळून येतात.जर एकंदरीत गुलाबी बोंड आळीच्या जीवनक्रमाचा विचार केला तर त्या दृष्टीनेकपाशी पिकाची पूर्वहंगामी लागवड आणि कपाशीचे फरदड घेणेही कारणे प्रामुख्याने गुलाबी बोंड आळीचा प्रादुर्भाव वाढीस कारणीभूत आहेत. कपाशीचे फरदड घेतल्याने या किडी साठी खाद्याची उपलब्धता वर्षभर होत राहते. त्यामुळे या अळीचा प्रादुर्भाव वाढतच राहतो. त्यामुळेगुलाबी बोंड आळी चा प्रसार व प्रादुर्भाव थांबवायचा असेल तरमागील कपाशी पिकांचे अवशेष व्यवस्थित नष्ट करणेव कपाशी पिकाची पूर्वहंगामी लागवड टाळणे या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत.जर कपाशी पिकाच्या लागवडी बाबत विचार केला तर ती जून महिन्यामध्येजेव्हा 80 ते 100 मिलिमीटर पाऊस पडेल तेव्हाच करावी असे तज्ञांचे मत आहे.
गुलाबी बोंड आळीचा प्रादुर्भाव आणि क्रम
हंगाम संपल्यानंतर कपाशी पिकावर असणाऱ्या शेवटच्या पिढीतील गुलाबी बोंड अळ्या या प्रादुर्भावग्रस्त बोंडे, तसेच कपाशी उपटल्यानंतर उपलब्ध असलेली कपाशीचे पऱ्हाट्या किंवा मातीमध्ये सुप्तावस्थेत जातात. जर गुलाबी बोंड आळी चा पुढील प्रसार थांबवायचा असेल तर ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता असते. यामध्ये पूर्वहंगामी कापसाची पेरणी करणे टाळावे. कारण लवकर कपाशी लागवड केल्यानंतर त्या कपाशीला लवकर फुले आणि पात्या येतात. त्यामुळे पाऊस पडल्याबरोबर सुप्तावस्थेतून बाहेर पडणारे गुलाबी बोंड अळीचे पतंग अशा पूर्वहंगामी पिकांच्या पात्याआणि फुलांवर आपली अंडी देतात.आणि इतर क्षेत्रांमध्ये जर कपाशीचे लवकर लागवड केलेली नसेल तर पूर्वहंगामी कपाशीची लागवड केलेले पिक आळीला बळी पडू शकते.
गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून काय करावे?
पेरणी जून महिन्यामध्ये जर केली तर या अळीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.जमीन तयार करताना तिची खोल नांगरट करावी व चांगली मशागत करून घ्यावी त्यामुळेमाती मध्ये लपलेले या अळीचे कोश आणिसूट अवस्थेतील अळ्या वर येतात व उन्हाळ्यातील उन्हामुळे मरतात.त्यामुळे कपाशी लागवड आधी नागरटी करणे खूप महत्त्वाचे आहे. पिकांची फेरपालट करणे खूप महत्त्वाचे आहे कारण कपाशी हेच पीक गुलाबी बोंड आळीचे खाद्यान्न असल्यामुळे जर पिकांची फेरपालट केली तर त्याला खाद्य उपलब्ध न झाल्याने तिचा जीवनचक्र खंडित होण्यास मदत होते.
महत्वाच्या बातम्या
Published on: 12 May 2022, 10:50 IST