Agripedia

भारतीय जेवण त्याच्या अप्रतिम चवीमुळे जगभर प्रसिद्ध आहे. भारतीय खाद्यपदार्थांमध्ये अनेक प्रकारचे घटक वापरले जातात. त्यातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे लसूण. लसूण यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत.

Updated on 19 April, 2022 12:56 PM IST

भारतीय जेवण त्याच्या अप्रतिम चवीमुळे जगभर प्रसिद्ध आहे. भारतीय खाद्यपदार्थांमध्ये अनेक प्रकारचे घटक वापरले जातात. त्यातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे लसूण. लसूण यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. राष्ट्रीय लसूण दिवस दरवर्षी 19 एप्रिल रोजी साजरा केला जातो.

लसूण बद्दल मनोरंजक तथ्य

१. अनेक दिवसांपासून लसणाचा सर्वाधिक वापर केला जात आहे.
२. जगभरात लसणाच्या ३०० हून अधिक जाती आढळतात.
३. लसणाची लागवड प्रथम चीनमध्ये झाली आणि नंतर चीनने त्याची लागवड जगभर पसरवली.

महत्त्वाच्या बातम्या :
४६ कारखान्यांची धुराडी बंद; शिल्लक ऊसाचे काय?
शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ; आता खतांचे भाव गगनाला भिडले

लसणाचे फायदे Benefits of Garlic

१. लसूण ही कांद्याच्या कुळातील वनस्पती आहे. तिला असणारा उग्र वास हा तिच्यातील गंधकामुळे येतो. या गंधकामुळेच तिला औषधी गुणधर्म प्राप्त झाले आहेत.

२. जगभर लसणाचा उपयोग मसाल्यातील पदार्थ, चटण्या, सॉस, लोणच्यांमध्ये आणि औषधी म्हणून करतात.

३. सकाळी रिकाम्या पोटी लसणाचे सेवन केल्याने व्यक्तीला अनेक आजारांपासून मुक्ती मिळते.

४. विशेषत: याच्या सेवनाने हृदयाशी संबंधित आजार दूर होतात.

५. लसूण किडनीच्या संसर्गापासून बचाव करतो.

६. सर्दी आणि खोकल्यासाठी लसूण वरदानापेक्षा कमी नाही. सर्दी-खोकला झाल्यास लसूण हलके भाजून खावे.

७. लसूण हाडे मजबूत बनवतो.

८. मधुमेहाच्या रुग्णांसाठी लसूण खूप फायदेशीर आहे.

महत्त्वाच्या बातम्या :
आनंदाची बातमी : आता सोने तारण ठेवून मिळणार शेतीसाठी कर्ज
Onion Rate : कांद्याला निच्चांकी भाव, शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी

English Summary: National Garlic day Benefits of Garlic
Published on: 19 April 2022, 12:47 IST