सध्या कपाशी लागवड झाल्यानंतर हा कालावधी कपाशीच्या वाढीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. जर आपण एकंदरीत कपाशी लागवडीचा विचार केला तर आता कपाशी लागवड होऊन जवळ जवळ एक ते दोन महिन्याच्या आतला कालावधी उलटला आहे. परंतु नेमक्या याच वेळेला कपाशी पिकावर विविध प्रकारच्या रसशोषक किटकांचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात होतो. जसे की मावा,तुडतुडे, पांढरी माशी यासारखे रसशोषक कीटकांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे कपाशीची वाढ मंदावते. जर आपण यांचा वेळीच बंदोबस्त केला नाही तर याचा प्रादुर्भाव वाढून खूप मोठा आर्थिक फटका कपाशी उत्पादकांना बसू शकतो.
बहुतांशी शेतकरी कपाशी पिकावरील रसशोषक किडींचा नायनाट करण्यासाठी इमिडाक्लोप्रिड यासारख्या घटकांचा परत-परत वापर करतात.
परंतु परत परत जर वापर केला तर या रसायनाच्या विरोधात कीटकांच्या शरीरात प्रतिकारशक्ती तयार होते व सहसा फवारणीचा फायदा मिळत नाही. त्यामुळे आपण काही छोटेसे महत्वपूर्ण उपायांची माहिती या लेखात घेऊ.
नक्की वाचा:कपाशीवरील गुलाबी बोंड अळीच्या संदर्भात जागरूक राहून आवश्यकतेनुसार करा उपाययोजना
रसशोषक किडींचे व्यवस्थापन
1- सगळ्यात अगोदर आपण जेव्हा शेतात निरीक्षण करतो तेव्हा ज्या कपाशीच्या पाने, बोंडे किंवा पात्यांवर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव झालेले असते ते जमा करून नष्ट करून टाकावेत.
तसेच पांढरी माशी ही रसशोषक कीटकांपैकी खूप नुकसानदायक असून या माशीच्या नियंत्रणासाठी पिवळे चिकट सापळ्यांचा वापर कपाशीच्या शेतामध्ये केला तर खूप फायदा मिळतो कारण पांढरी माशी हि पिवळ्या रंगाला खूप आकर्षित होते. तसेच पुढे काही दिवसांनी गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते
त्यामुळे गुलाबी बोंड अळीग्रस्त जर काही डोमकळ्या दिसल्या तर त्या अळीसहित नष्ट कराव्यात. तसेच कामगंध सापळ्यांचा वापर केला तर खूप फायदा मिळतो. त्यासाठी एका हेक्टरमध्ये चार ते पाच कामगंध सापळे लावावेत.
तसेच कपाशी लागवड केलेल्या क्षेत्रांमध्ये 25 पक्षी थांबे हेक्टरी किंवा एकरी आठ किंवा दहा उभारावेत. त्यामुळे त्यावर बसणारे पक्षी शेतातील अळ्या वेचून खातात त्यामुळे देखील प्रादुर्भाव नियंत्रणात राहतो.
2- दुसऱ्या महत्वाच्या गोष्टी म्हणजे वापर रासायनिक खतांचा वापर करतो तेव्हा तो करत असताना जास्तीच्या नत्रयुक्त खतांचा वापर करणे टाळावे.
लागवड करत असताना दोन ओळींमध्ये व दोन रोपांमध्ये अंतर हे शिफारसीनुसार ठेवावे. तसेच कपाशीमध्ये मित्र कीटकांचे संवर्धन व्हावे यासाठी मूग,
चवळी, उडीद यासारखे कडधान्यांची आंतरपीक म्हणून लागवड करावी. किंवा कपाशीच्या शेता सभोवती झेंडूच्या फुलांची लागवड केली तर खुप उत्तम ठरते. ही लागवड करताना जास्त न करता एक ओळ कडेने लावावे.
Published on: 06 August 2022, 01:33 IST