शेतात जास्त पाणी साचल्यामुळे पिके सडतात, तसेच पावसाच्या वातावरणामुळे पिकांवर कीड (Pests on crops) होण्याची शक्यता अधिक वाढते. त्यामुळे अशावेळी तुम्ही तुमच्या पिकाचा बचाव कसा केला पाहिजे याविषयी आपण जाणून घेणार आहोत.
सततच्या पावसामुळे भाजीपाला आणि कडधान्य पिकांवर (crops) आणखी वाईट परिणाम झाला आहे. त्यामुळे अशावेळी शेतकऱ्यांनी योग्य पीक व्यवस्थापनाचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे.
देशातील अनेक राज्यांमध्ये सतत पाऊस पडत आहे. आसाम, कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये हजारो एकर पिकांचे नुकसान झाले आहे. याशिवाय इतर राज्यातही पाऊस झाल्याने शेतात पाणी साचत आहे. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे.
Use Fertilizers: शेतकरी मित्रांनो खते वापरताना 'या' गोष्टींची काळजी घ्या; अन्यथा होईल मोठे नुकसान
पिकांना असे वाचवा
ज्याठिकाणी पिके लावली आहेत, त्याठिकाणी पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था चांगली करा. पाणी साचले नाही तर पिके कुजण्याची शक्यता कमी होते आणि रोग देखील होणार नाहीत. रोगाचा प्रादुर्भाव (Outbreak of disease) कमी झाला की शेतकऱ्यांच्या उत्पादनातही वाढ दिसेल.
सपाट जमिनीवर शेती करू नका
सपाट जमीन असल्याने शेतात पाणी तुंबण्याची शक्यता वाढते. अशावेळी पिकांचे नुकसान होते. त्यामुळे उत्पादनातही घट होते. असा त्रास टाळण्यासाठी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना शेतात उंच बेड्स (Raised beds) करून शेती न करण्याचा सल्ला दिला आहे. या प्रयोगाने शेतात पाणी साचत नाही.
शेतकरी मित्रांनो 'या' जातीच्या देशी कोंबड्या पाळून मिळवा बंपर नफा; जाणून घ्या
शेतातील बंधारे काढून नाले बनवा
अनेक दिवस सतत पाऊस (rain) पडत राहिल्यास पिकांचे नुकसान होण्याची शक्यता खूप वाढते. अशा परिस्थितीत शेतकरी शेतातील बंधारे काढून अनेक ठिकाणी नाले बनवून पाणी बाजूला साचवू शकतात. सर्व पाणी बाहेर पडेल, त्यामुळे शेतात पाणी साचणार नाही आणि मुसळधार पाऊस झाला तरी पिके वाचू शकतात.
महत्वाच्या बातम्या
शेतकऱ्यांनो आता आपला शेतमाल दुसऱ्या राज्यातही विका! वाहतुकीसाठी मिळणार 3 लाखांचे अनुदान
ई-पीक पाहणीच्या नवीन अॅपवरुन वेळीच प्रक्रिया करा; अन्यथा होईल मोठे नुकसान
Horoscope: 'या' 5 राशीच्या लोकांना मिळणार प्रचंड यश; वाचा आजचे राशीभविष्य
Published on: 19 August 2022, 11:19 IST