Agripedia

सध्या पावसाळी हंगाम सुरू आहे. काही शेतकऱ्यांनी पावसाळी हंगाम म्हणजेच खरीप हंगामातील पिकांची पेरणीची कामे आता उरकून घेतली आहेत, तर काही शेतकरी आणखी पिकांचे व्यवस्थापन करत आहेत. महत्वाचे म्हणजे काही खरीप हंगामातील पिकांची 31 जुलैपर्यंत लागवड करता येते.

Updated on 26 July, 2022 5:01 PM IST

सध्या पावसाळी हंगाम सुरू आहे. काही शेतकऱ्यांनी पावसाळी हंगाम म्हणजेच खरीप हंगामातील पिकांची पेरणीची कामे आता उरकून घेतली आहेत, तर काही शेतकरी आणखी पिकांचे व्यवस्थापन करत आहेत. महत्वाचे म्हणजे काही खरीप हंगामातील पिकांची 31 जुलैपर्यंत लागवड करता येते.

यामध्ये तीळ या पिकाचा (Sesame Crop) देखील समावेश आहे. तज्ञांच्या मते, तीळ या पिकाची जुलैच्या शेवटापर्यंत लागवड (Sesame Farming) करता येते. हे एक प्रमुख तेलबिया पीक आहे. तीळ या पिकाला खरीप हंगामातील एक मुख्य पीक म्हणून ओळखले जाते. तिळाचे तेल बाजारात चांगल्या दराने विक्री होते. अशा परिस्थितीत तिळाची शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.

तीळ पिकाला बारामाही मागणी असल्याने शेतकऱ्यांचा अधिक फायदा होतो. तिळाची लागवड आपल्या राज्यात मोठ्या प्रमाणात केली जाते. याशिवाय याची शेती राजस्थान, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, गुजरात, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि तेलंगणा या राज्यात देखील केली जाते. खरीप हंगामात जुलै अखेरपर्यंत तिळाची लागवड करता येते.

एफआरपीची रक्कम थकीत ठेवल्याप्रकरणी 5 कारखान्यांवर जप्तीच्या कारवाईचे आदेश

https://marathi.krishijagran.com/news/order-confiscation-action-against-5-factories-arrears-frp-amount/

एक हेक्टर शेतात 5 ते 6 किलो बियाणे पुरेसे असते. तीळ पेरण्यापूर्वी शेत तयार करावे. यासाठी शेतीची पूर्व मशागत चांगल्या पद्धतीने करावी लागते. नांगरणी केल्यानंतर तीळ पेरणीसाठी शेत जमीन सपाट करावी लागते. तिळाची पेरणी 30-45 सें.मी. ओळ ते ओळ आणि 15 सें.मी. रोप ते रोप अंतर ठेवले जाते. पेरणीपूर्वी शेतातील ओलाव्याची काळजी घ्यावी. शेतात ओलावा नसल्यास पेरणी करू नये.

मातीचे pH मूल्य 5-8 च्या दरम्यान असावे. येथे हे लक्षात ठेवले पाहिजे की बियाण्याचा आकार लहान असल्यास वाळू, राख किंवा कोरड्या हलक्या चिकणमाती मध्ये बियाणे मिसळून पेरले पाहिजे. तीळ लागवडीसाठी उच्च तापमानाची आवश्यकता असते. तीळ पीक 25 ते 35 अंश तापमानात झपाट्याने वाढते. तापमान 40 अंशांच्या वर गेल्यास गरम वाऱ्यांमुळे तिळातील तेलाचे प्रमाण कमी होते. तसेच तापमान 15 अंशांपेक्षा कमी झाले तरी तीळ पिकाला फटका बसतो.

आता कांदा काढणी मशील ठरतेय फायदेशीर, शाहू अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची कमाल

तीळाचे पीक 90 दिवसात उत्पादन देण्यास तयार होत असते. तिळाच्या काही प्रजाती प्रसिद्ध आहेत. तिळाच्या प्रगत जातींमध्ये, टा-78, शेखर, प्रगती, तरुण, आरटी 351 इत्यादी जाती प्रमुख आहेत. या जाती सुमारे 90 दिवसांत उत्पादन देण्यास तयार होत असतात. या तीळ शेतीतून शेतकरी चांगले उत्पादन काढू शकतो.

महत्वाच्या बातम्या;
सर्वात लहान शेळी आणि सर्वात जास्त पैसे मिळवून देणारी शेळी, शेतकऱ्यांना होणार फायदा
१४ चा उतारा बसला आणि १० चा बसला तरी समान बाजारभाव का? कष्टकरी ऊस उत्पादकांवर होतोय अन्याय
रामराजे नाईक निंबाळकर भाजपमध्ये जाणार? सातारा जिल्ह्यातील आमदाराच्या वक्तव्याने खळबळ

English Summary: heavy! Farmer friends, farm crop become millionaire in 3 months
Published on: 26 July 2022, 05:01 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)