Agripedia

रेशीम उद्योग राज्यात चांगलाच जोर धरू लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी राज्यातील पुणे विभागातील बारा जिल्ह्यांमध्ये 2 हजार 640 एकरांवर तुतीची लागवड होत आहे. यामधून सध्या चांगले पैसे मिळत असल्याने शेतकरी याकडे वळू लागले आहेत.

Updated on 11 July, 2022 1:02 PM IST

शेतकरी आपल्याला दोन पैसे मिळावेत यासाठी शेतीसोबतच जोडधंदा करत असतो. सरकारकडून देखील शेतकऱ्यांना यासाठी अनेक योजना आणि अनुदान दिले जाते. यामुळे यामध्ये वाढ होते. सध्या रेशीम उद्योग राज्यात चांगलाच जोर धरू लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी राज्यातील पुणे विभागातील बारा जिल्ह्यांमध्ये 2 हजार 640 एकरांवर तुतीची लागवड होत आहे. यामधून सध्या चांगले पैसे मिळत असल्याने शेतकरी याकडे वळू लागले आहेत.

सध्या राज्य शासनाच्या रेशीम संचालनालयाच्या वतीने शेतकर्‍यांना तुती लागवडीबरोबरच कीटक संगोपनगृह उभारण्यासाठी प्रोत्साहनात्मक योजना राबविण्यात येत आहेत. याचा देखील शेतकऱ्यांना फायदा होत आहे. यामध्ये मनरेगा आणि सिल्क समग्र योजना-2 या दोन योजनांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये एकरी तीन वर्षांसाठी शेतकर्‍यांना 3 लाख 39 हजार 782 रुपयांचे अनुदान देण्यात येते.

दरम्यान, गेल्या वर्षीच्या तुलनेत ही लागवड दुप्पट असून, यामुळे रेशीम उद्योग वाढण्यास सहकार्य मिळणार आहे. सध्या एक किलो रेशमाला किमान 660 किलो भाव मिळत आहे. याचा मुख्य बाजार हा कर्नाटकमध्ये आहे. कर्नाटकमधील रामनगर बाजारपेठेत सर्वाधिक भाव मिळत आहे. याठिकाणी देशभरातून रेशीम विकायला येतो. यामधून शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळत आहेत.

RBI गव्हर्नरांचे महागाईबाबत मोठे वक्तव्य, म्हणाले, काही दिवस महागाई..

तसेच राज्यात बारामती, जालना, जयसिंगपूर या शहरांत असलेल्या कृषी उत्पन्न बाजारपेठेतही गेल्या काही वर्षापासून शेतकर्‍यांकडून चांगल्या भावात रेशीम विकत घेतले जात आहे. काही व्यापारी शेतातच याची खरेदी करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना जास्त ताण घ्यावा लागत नाही. अनेक गृहिणी, वृद्ध हे देखील या उद्योगात काम करत आहेत. यामध्ये जास्त श्रमाचे काम नाही.

शेतकऱ्यांनो भातशेतीत सोडा मासे, आधुनिक तंत्रामुळे शेतकरी कमवत आहेत लाखो रुपये..

या उद्योगासाठी एकरी किमान पाच ते साडेपाच हजार रोपांची लागवड करावी लागते. सध्या रेशीमला भावदेखील चांगला मिळत आहे. यामुळे हा एक फायदेशीर व्यवसाय आहे. अनेकांनी यामधून चांगले पैसे देखील कमवले आहेत. यामुळे शेतकऱ्यांपुढे हा एक चांगला पर्याय उपलब्ध आहे.

महत्वाच्या बातम्या;
जनधन खातेदारांसाठी आनंदाची बातमी! मोदी सरकार देणार 3 हजार रुपये
या गोष्टी कधीही चहासोबत खाऊ नका, आरोग्यासाठी आहे खूपच धोकादायक
काय सांगता! शाळांमध्ये रविवार ऐवजी शुक्रवारी सुट्टी

English Summary: Growing silk industry in the state, subsidy of over Rs 3 lakh to farmers
Published on: 11 July 2022, 01:02 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)