महाराष्ट्रात आणि मुख्यता पश्चिम महाराष्ट्रात उसाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर उसाचे कारखाने देखील आहेत. यामुळे शेतकऱ्यांना चार पैसे मिळतात. असे असले तरी सध्या मोठ्या प्रमाणावर खर्च वाढला आहे. यामुळे उसाचे उत्पादन वाढणे गरजेचे आहे. आता मात्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता उसाची एक नवीन जात विकसित झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना दुप्पट उत्पन्न मिळणार आहे.
उसाच्या अनेक प्रकारच्या वेगळ्या जाती आहेत. यामध्ये को 86032 ही जात शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेली जात आहे. सध्या शेतकरी आणि साखर कारखान्यांमध्ये ही जात मोठ्या प्रमाणात वापरली जाते. उसाच्या नवनवीन बियाण्यांच्या संदर्भात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये कायमच वेगवेगळे प्रयोग घेतले जातात. या प्रयोगांचा फायदा शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात होत असतो.
त्यातच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची काही उत्पादने आहेत, ती शेतकऱ्यांना खूप फायद्याची ठरत असल्यामुळे शेतकरी देखील या व्हीएसआयच्या अर्थात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून उपयुक्त उत्पादन ते घेतात. याच पार्श्वभूमीवर व्हीएसआय कडून नवीन ऊसाच्या जाती चा शोध लावण्यात आला असूनजवळ जवळ मागच्या सात वर्षापासून साखर कारखान्यांच्या चर्चेत ही जात आहे. यामुळे ती कधी शेतकऱ्यांना मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पांढऱ्या वांग्यातून लाखोंची कमाई, शाळा भरल्या की मागणी हमखास..
ही जात म्हणजे 'को व्हीएसआय 18121 होय. या जातीच्या चाचणी आता अंतिम टप्प्यात आले असून लागवडीसाठी 2024 पर्यंत व्हीएसआयकडून या जातीची शिफारस करण्यात येणार असल्याची शक्यता असल्याचे माहिती देण्यात आली. यामुळे ही जात शेतकऱ्यांना लवकर उपलब्ध झाली तर याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनी आपल्या शेतकरी नेत्याला दिली नवी कोरी फॉर्च्युनर भेट, राजू शेट्टींवर शेतकऱ्यांचे प्रेम अजूनही कायम
शेतकऱ्यांनो लक्ष द्या! मान्सून महाराष्ट्रावर रुसला, जोरदार सुरुवातीनंतर घेतला ब्रेक..
सर्वसामान्यांना झटका! गॅस कंपन्यांनी गॅस कनेक्शनबाबत घेतला मोठा निर्णय
Published on: 16 June 2022, 11:25 IST