Agripedia

आतापर्यंत मनगेरा अर्थात रोजगार हमी योजनेअंतर्गत (Rojgar Hami Yojana) आंबा, लिंबू, मोसंबी या फळपिकांची लागवड केली जात होती.

Updated on 13 August, 2022 3:50 PM IST

आतापर्यंत मनगेरा अर्थात रोजगार हमी योजनेअंतर्गत (Rojgar Hami Yojana) आंबा, लिंबू, मोसंबी या फळपिकांची लागवड केली जात होती. आता यामध्ये या वर्षापासून केळीचाही (Banana) समावेश असणार आहे.

रोजगार हमी योजनेअंतर्गत (Rojgar Hami Yojana) शेतकरी शेतात, शेताच्या बांधावर फळबाग लागवड करू शकणार असून या याेजनेमुळे जळगाव जिल्ह्यात (Jalgaon District) केळीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता वर्तविली आहे.

Groundnut Crop: भुईमूग पिकावरील किडीचे करा असे नियंत्रण; मिळेल भरघोस उत्पन्न

शासनाने केळीला फळाचा दर्जा (Fruit quality) दिला असून केळीचा समावेश फळबाग याेजनेत केला आहे. फळबाग याेजनेसाठी राेजगार हमी याेजनेचे मंजुरीचे दर वाढवून आता २५६ रूपये करण्यात आले आहेत.

E Crop Inspection: 'ई पीक पाहणी' प्रक्रियेत होणार मोठा बदल; नवीन ॲप लॉन्च

फळबागाच्या प्रकारानुसार हेक्टरी खर्च (cost per hectare) आणि दर निश्चित करणारे आदेश १० ऑगस्ट राेजी शासनाकडून काढण्यात आले आहेत. केळीचे उत्पादन घेताना जो खर्च होत होता त्यावर अंकूश येणार आहे. फळपिकांसाठी या योजनेतून अनुदान दिले जाते.

महत्वाच्या बातम्या 
Weather Update: विदर्भात विजांच्या कडकडाटासह धो-धो बरसणार पाऊस; 'या' भागांना यलो अलर्ट जारी
Government Scheme: 'या' योजनेत फक्त एकदा गुंतवणूक करा आणि मिळवा दुप्पट नफा
Pm Kisan Yojana: शेतकरी मित्रांनो 'या' गोष्टी त्वरित करा; अन्यथा पीएम किसान योजनेचे पैसे मिळणार नाहीत

English Summary: Good news farmers crop cultivated under Rohyo Benefit grant
Published on: 13 August 2022, 03:44 IST