शेतकरी शेतीमध्ये चांगल्या उत्पादनासाठी अनेक खतांचा (fertilizers) वापर करतात. मात्र योग्य खतांचा वापर करणे हे देखील तितकेच गरजेचे असते. अन्यथा पिकांचे नुकसान होऊ शकते.
शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये सेंद्रिय खतांचा (organic fertilizers) केला पाहिजे. असा सल्ला कृषीतज्ञांकडून शेतकऱ्यांना नेहमी दिला जातो. सेंद्रिय खतांचा वापर केल्याने उत्पादन बंपर होते. अनेक शेतकरी (farmers) सेंद्रिय शेतीतूनही भरघोस उत्पन्न मिळवत आहेत. शेतकरी येत्या रब्बी हंगामासाठी खालील सेंद्रिय खतांचा वापर करू शकतात, ज्यामधून भरघोस उत्पादन होईल.
मेष राशीने अनोळखी व्यक्तींपासून सावध राहा; जाणून घ्या संपूर्ण राशीचे राशीभविष्य
1) शेणखत
शेतकऱ्यांनो शेतीसोबतच (agriculture) शेणखत तुमच्या जनावरांच्या विष्ठेची समस्या दूर करते. हे पूर्णपणे सेंद्रिय आहे आणि त्यात कोणतेही हानिकारक रसायने नाहीत. त्यात सूक्ष्म आणि मॅक्रो पोषक घटक असतात, तसेच सूक्ष्म जीव देखील असतात जे मातीचे गुणधर्म वाढवतात. कांदे, गाजर, मुळा, सलगम आणि पार्सनिप्स यांसारख्या मूळ पिकांसाठी ते फायदेशीर आहे.
शेतकऱ्यांनो पिकांच्या पेरणीपूर्वी हे एक काम करा; खर्चामध्ये मोठी बचत होईल
2) गांडुळ खत
महत्वाचे म्हणजे गांडूळ हा शेतकर्यांचा मित्र मानला जातो. कारण गांडुळ पिकातील सर्व हानिकारक कीटक काढून टाकते आणि शेताची खत क्षमता वाढवते. त्याला वर्मी कंपोस्ट असेही म्हंटले जाते.
3) कंपोस्ट खत
शेतकऱ्यांनो कंपोस्ट खत (Compost fertilizer) हे येत्या रब्बी हंगामासाठी अत्यंत फायदेशीर खत ठरू शकते. पिकांचे अवशेष, उसाची कोरडी पाने आणि हळद एकत्र करून ते तयार केले जाते. त्याचा शेतात वापर केल्यास बंपर उत्पादन मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते. या तीन सेंद्रिय खतांचा वापर केल्यास नक्कीच भरघोस उत्पादन मिळेल.
महत्वाच्या बातम्या
शासकीय धान खरेदी विक्रीसाठी 41 ठिकाणी नोंदणी केंद्र; शेतकऱ्यांना होणार फायदा
लम्पी प्रादुर्भाव! जनावरांच्या गोठ्यातील स्वच्छता तसेच धूर फवारणीची जनजागृती आता शिक्षकांवर
शेतकऱ्यांनो मसूर मिश्र शेतीची करा लागवड; 110 दिवसात मिळेल भरघोस उत्पन्न
Published on: 12 October 2022, 02:11 IST