Agripedia

शेतकरी चांगल्या उत्पादनासाठी नवनवीन खतांचा वापर करत असतात. कडुलिंब खताविषयी आपण पाहिले तर, या खतामधूनही शेतकरी चांगले उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करत असतात. कडुलिंब म्हणजेच निम केक खताबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Updated on 08 September, 2022 1:07 PM IST

शेतकरी चांगल्या उत्पादनासाठी नवनवीन खतांचा वापर करत असतात. कडुलिंब खताविषयी (Neem Fertilizer) आपण पाहिले तर, या खतामधूनही शेतकरी चांगले उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करत असतात. कडुलिंब म्हणजेच निम केक खताबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.

नीम केक खताविषयी

निंबोळी खत पिकाच्या चांगल्या वाढीसाठी वापरले जाते. ज्याप्रमाणे फळे आणि फुलांमध्ये बिया (Seeds flowers) आढळतात, त्याचप्रमाणे कडुलिंबातही बिया असतात. या बियांपासून निंबोळी खत तयार केले जाते. कडुलिंबाचा केक कडुलिंबाच्या बियापासून काढलेला तेलाचा अवशेष आहे.

शेतकऱ्यांनो शेतीच्या बांधावर निवडुंगाची लागवड करून मिळवा लाखों रुपयांचा नफा

याचा उपयोग कडुलिंबाच्या (neem) दाण्यांसोबत चांगला दळल्यानंतर केला जातो. त्यात नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम असते. इतकेच नाही तर कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, जस्त, तांबे, लोह, मॅंगनीज यांसारखे इतर पोषक घटकही त्यात योग्य प्रमाणात आढळतात. अनेक गुणांमुळे शेतकरी त्याचा उपयोग बागायती आणि फुलशेतीसाठी करत आहेत.

रासायनिक खतापेक्षा कमी किमतीत कडुलिंब खत बाजारात उपलब्ध आहे. पिकामध्ये त्याचा वापर केल्याने चंपा, तेलबिया, थ्रिप्स, पांढरी माशी इत्यादी मऊ त्वचा असलेल्या किडी मरण्यास फायदा होतो.

'या' दोन राशीच्या लोकांना मिळणार करियरमध्ये संधी, पैसाही मिळणार चांगला

निंबोळी खताचे फायदे

1) या खताचा शेतात वापर केल्यास जमिनीची सुपीकता वाढते.
2) यामुळे पिकातील सुमारे 50 टक्के हानिकारक रोग दूर होतात.
3) रासायनिक औषधे आणि कीटकनाशकांचा वापर खूपच कमी आहे.
4) कडुलिंब हे पिकापासून चांगले उत्पादन घेण्यासाठी योग्य खत आहे.

निंबोळी खताची किंमत

भारतीय बाजारपेठेत निंबोळी खताची (Nimboli fertilizer) किंमत उर्वरित खतांच्या तुलनेत शेतकरी बांधवांसाठी अत्यंत कमी दरात आहे. त्याच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर सध्या बाजारात 50 किलो निंबोळी खताच्या पोत्याची किंमत 900 रुपयांपर्यंत आहे. हा खत पिकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरत आहे.

महत्वाच्या बातम्या 
तुम्हालाही आर्थिक तणाव जाणवत आहे? तर महत्वाच्या टिप्स करा फॉलो
सोयाबीनला मिळतोय कवडीमोल दर; आजही विकला जातोय 'या' दराने
सरकारच्या 'या' योजनेत फक्त 240 रुपये गुंतवा; मिळणार 50 लाखांचा नफा

English Summary: Farmer use fertilizer good yield Earnings millions
Published on: 08 September 2022, 01:00 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)