Agripedia

शेतकरी शेतामध्ये विविध प्रकारची पिके लावतो. पीक लागवडीपासून तर उत्पादन हातात येईपर्यंत विविध टप्प्यांवर शेतकऱ्यांना शेतीसाठी खर्च करायला लागतो. पिकांच्या एकूण खर्चाचा विचार केला तर सगळ्यात जास्त खर्च हा कीटकनाशक फवारणी यामुळे येतो.

Updated on 09 July, 2022 1:23 PM IST

शेतकरी शेतामध्ये विविध प्रकारची पिके लावतो. पीक लागवडीपासून तर उत्पादन  हातात येईपर्यंत विविध टप्प्यांवर शेतकऱ्यांना शेतीसाठी खर्च करायला लागतो. पिकांच्या एकूण खर्चाचा विचार केला तर सगळ्यात जास्त खर्च हा कीटकनाशक फवारणी यामुळे येतो.

आपल्याला माहित आहेच कि पिकांवर विविध प्रकारचा कीटकांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्यांचे वेळीच नियंत्रण करणे गरजेचे असते.

जर प्रादुर्भाव वाढला तर पीक हातातून जाण्याचा धोका संभवतो. त्यामुळे फवारणीचा मार्ग शेतकरी अवलंबतात. विविध प्रकारच्या कीटकनाशक फवारणी यांचा खर्च हा अफाट स्वरूपाचा असतो  आणि इतके करून देखील कीटकांचे नियंत्रण पूर्णपणे होईलच याची शाश्वती नसते.

त्यामुळे एकात्मिक कीड व्यवस्थापन खूप गरजेचे असते. या लेखामध्ये आपण अशाच एका ट्रॅपविषयी माहिती घेणार आहोत , जो प्रकाश सापळा, चिकट सापळा आणि कामगंध सापळा यांचे संयुक्तरीत्या काम करतो.

नक्की वाचा:एकदंरीत रासायनिक अन्नद्रव्यांच्या बाबतीत फक्त भारतातच एवढा मोठ्या प्रमाणावर गोंधळ चालु आहे, असं का?

 इको पेस्ट ट्रॅप - ठरेल एक वरदान

 इको पेस्ट ट्रॅप हा पांढरी माशी, तुडतुडे, फळमाशी, फुलकिडे, पंख असलेला मावा तसेच नाग आळी व इतर बारीक उडणारे कीटक यांच्या प्रभावी नियंत्रणासाठी खूप फायदेशीर आहे. या किटकांचा शिवाय मीज माशी, खोडकिडीची माशी, कंदमाशी यांचाही प्रभावीपणे नियंत्रण करते.

या सापळा मध्ये ठराविक प्रकाश तीव्रतेचा आणि एक स्वयंचलित लाईट इन्स्टॉल केलेला असून तो अंधार पडल्यावर प्रकाशित होऊन रात्री पिकांवर फिरणारे विविध प्रकारचे  पतंग उदाहरणच घ्यायचे झाले तर गुलाबी बोंड अळीचा पतंग,

अमेरिकन बोंड आळीचा पतंग, टिपक्यांची बोंड आळी पतंग, फळ पोखरणारी अळीचा पतंग, शेंडे पोखरणाऱ्या अळीचा पतंग आणि पिकाची पाने गुंडाळणाऱ्या अळीचा पतंग इत्यादी उडणारे कीटक या प्रकाशामुळे आकर्षक होऊन या ट्रॅपला चिकटतात.

नक्की वाचा:शेतकऱ्यांसाठी खूषखबर,आता शेतकऱ्यांना किटकनाशके फवारणी करण्याची गरज नाही

इको पेस्ट ट्रॅपचे फायदे

1- हे प्रकाश सापळे पिकातील नुकसानकारक कीटकांचे प्रभावीपणे नियंत्रण करण्यासाठी खूप फायदेशीर आहेत.

2- हंगाम सुरू होण्याच्या आधी या प्रकाश सापळ्यांचा वापर केल्यास पीक लागवड क्षेत्रातील पिकांवर प्रादुर्भाव करू शकणाऱ्या किडींचा अनुमान लावण्यास मदत होते.

3- इको पेस्ट ट्रॅप हे मित्र कीटकांना सुरक्षित असून पर्यावरणाला देखील अनुकूल आहेत.

4- हे ट्रॅप जाड प्लास्टिक पासून बनवले असल्यामुळे टिकाऊ देखील आहेत. ही ट्रॅप वापरल्याने कमीत कमी वेळात आणि हानीकारक कीटकांचा बंदोबस्त करता येतो.

 पीकामध्ये इको-पेस्ट ट्रॅप कसे लावावेत?

 हे प्रकाश सापळे बांधावर लावावेत. एका एकर साठी चार ते सहा इको -पेस्ट ट्रॅप लावणे गरजेचे आहे. हे लावताना पिकापासून एक फूट उंच लावाव्यात.

 इको पेस्ट ट्रॅपची उपयोगिता

या सापळ्यामुळे नर व मादी दोघेही प्रकाशाच्या दिशेने आकर्षित होतात. त्यामुळे त्यांच्या मिलनाला अडथळा निर्माण होऊन किटकांची येणारी नवीन पिढी ला प्रतिबंध होतो.

या सापळ्याची रचना अशाप्रकारे करण्यात आली आहे की, मित्र कीटक आकर्षित जरी झाले तरी त्यांना काही हानी पोहोचत नाही. हे सापळे बॅटरीवर, सेलवर कार्यान्वित होतात.

इको पेस्ट ट्रॅपच्या वापराने कीटकांच्या नियंत्रणासाठी वापरण्यात येणाऱ्या रासायनिक कीटकनाशकांचा खर्च कमी होतो. यामुळे नक्कीच उत्पादन खर्चात देखील बचत होते.

नक्की वाचा:भाजीपाला पिकवण्यासाठी उत्तम असतो पावसाळा, सुरुवातीला भाज्यांची करा लागवड

English Summary: eco pest trap is so effective to integrated management for insect on crop
Published on: 09 July 2022, 01:23 IST