अनेक लोक (sugar level) शरीरातील साखरेची पातळी वाढू नये म्हणून नेहमीच सावध असतात. यापैकी अनेकजण काही खाताना योग्य प्रमाणात खातात किंवा अनेकजण काही खाणे टाळतात ज्यामुळे कोणतीही समस्या सुरु होऊ नये.
परंतु आपण आजकाल पाहिले तर कमी वयात मधुमेहाचा त्रास (Suffering from diabetes) उद्भवणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे अनेकांना विविध प्रकारच्या आरोग्याच्या समस्या सुरू झाल्या आहेत.
मधुमेहाचे प्रमाण (Diabetes prevalence) वाढण्यापाठीमागे काही कारणेही आहेत. यातील पहिले कारण म्हणजे चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि शारीरिक हालचालींचा अभाव या असू शकतात. अशा परिस्थितीत लोक औषध खातातच असे नाही तर घरगुती उपायही करतात. शरीरातील साखरेची पातळी कमी करू करण्यासाठी घरगुती उपायांबद्दल जाणून घेऊया...
मधुमेह नियंत्रित करण्यासाठी घरगुती उपाय
1) मधुमेहाच्या रुग्णांसाठी गुळवेल (gulvel) हा सर्वात उत्तम पर्याय आहे. रक्तातील साखर कमी करण्यासाठी फायद्याचे असणारे हायपरग्लायसेमिकचे गुणधर्म गुळवेलमध्ये आढळतात. आणि या पानांचा रस शरीरासाठी फायदेशीर असतो.
2) मोरिंगाची पाने मधुमेहाच्या रुग्णांसाठी इन्सुलिनचे काम करत असतात. यात अँटी-डायबेटिकचे (Anti-diabetic) गुणधर्म असतात. जे मधुमेही रुग्णांसाठी आरोग्यदायी असल्याचे सिद्ध होऊ शकते.
Crop Management: पिकांमधील अन्नद्रव्यांची कमतरता वेळीच ओळखा; मिळेल भरघोस उत्पन्न
3) कडुलिंबाची पाने (Neem leaves) मधुमेहाच्या रुग्णांसाठी साखर नियंत्रित ठेवण्याचे काम करतात. हे शरीरासाठी फायदेशीर असल्याने अनेकवेळा डॉक्टरही त्याचा वापर करण्याचा सल्ला देतात.
4) आयुर्वेदातील अनेक आजारांच्या उपचारातही अश्वगंधा फायदेशीर आहे. अश्वगंधाची मुळे आणि पानेही या आजारासाठी खूप फायदेशीर आहेत. त्यामुळे घरगुती उपायांसाठी तुम्ही याचा वापर करु शकता.
महत्वाच्या बातम्या
Planting Bananas: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता रोहयोअंतर्गत होणार 'या' पिकाची लागवड; अनुदानाचा मिळणार लाभ
Weather Update: विदर्भात विजांच्या कडकडाटासह धो-धो बरसणार पाऊस; 'या' भागांना यलो अलर्ट जारी
Government Scheme: 'या' योजनेत फक्त एकदा गुंतवणूक करा आणि मिळवा दुप्पट नफा
Published on: 13 August 2022, 04:57 IST