बटाट्यासारखा दिसणारा रताळा भारतासह जगभरात आवडीचा आहे. उपवास असला की याची मागणी वाढत असली तरी आता उपवास नसला तरी याच्या मागणीत वाढ होताना दिसून येत आहे. सध्या रताळे निर्यातदारांच्या यादीत जगभरात भारत सहाव्या क्रमांकावर आहे, शेतकरी ज्या प्रकारे याच्या लागवडीसाठी आग्रही आहेत, तो दिवस दूर नाही. जेव्हा आपण चीनला मागे टाकून निर्यातदारांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर जाऊ शकतो.
रताळ्याची लागवड करताना सिंचनाची खूप काळजी घ्यावी लागते. तुम्ही उन्हाळ्यात त्याची रोपे लावली असतील, तर लावणीनंतर लगेच पाणी देऊ नये. आठवड्यातून एकदाच पाणी देण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही पावसाळ्यात रताळ्याची लागवड केली असेल, तर त्याला सिंचनाची गरज भासणार नाही.
शेतकऱ्यांना हा एक चांगला पर्याय आहे, रताळ्याचे पिकात तुम्ही तुमच्या शेतात नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशिअमचा वापर करावा. जर तुमची माती जास्त आम्लयुक्त असेल, तर तुम्ही मॅग्नेशियम सल्फेट, झिंक सल्फेट आणि बोरॉन वापरावे. रताळ्याबद्दल बोलायचे झाले, तर यात शेतकरी जास्त नफा मिळवतो. याला बाराही महिने चांगला दर असतो.
विजेचे रोहित्र वाहतुकीची जबाबदारी महावितरणचीच, शेतकऱ्यांची होतेय फसवणूक
एका हेक्टरमध्ये सुमारे 25 टन रताळ्याचे उत्पादन होते. 10 रुपये किलोने जरी रताळी विक्रीस ठेवली, तरी शेतकऱ्याला एक एकरातून किमान 1.25 लाख रुपये मिळतील. यामुळे याची शेती फायदेशीर आहे. दरम्यान, आज भारतातून (India) जगभरात अनेक वस्तूंची निर्यात होत आहे.
देशभरात राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा होतोय, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व
असे असताना मात्र जर तुम्ही रताळ्याची शेती केली, तर तुम्हाला याचा खूप फायदा होऊ शकतो. यामुळे शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा होत आहे. भारतातील अनेक राज्यांमध्ये याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जात असून शेतकरी या पिकातून मोठा नफाही कमावत आहेत.
महत्वाच्या बातम्या;
गायरान जमीन खासगी वापरासाठी, कृषिमंत्री अब्दुल सत्तार पुन्हा अडचणीत
सरकार म्हणतंय खतांचा पुरेसा साठा, मात्र युरियासाठी शेतकऱ्यांवर भटकंतीची वेळ
आता सोयाबीनपासून बनवले गुलाबजाम आणि पनीर, शेतकरी बनला लखपती..
Published on: 26 December 2022, 12:17 IST