Agripedia

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. नांदेड जिल्ह्यातील नांदुसा गावामध्ये अतिवृष्टीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यावेळी नांदेड, हिंगोली भेटीदरम्यान एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली.

Updated on 10 August, 2022 1:48 PM IST

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. नांदेड जिल्ह्यातील नांदुसा गावामध्ये अतिवृष्टीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे (farmers) नुकसान झाले. यावेळी नांदेड, हिंगोली भेटीदरम्यान एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली.

विशेष म्हणजे एकनाथ शिंदेंनी ज्या शेतकर्‍यांची भेट घेण्याचं राहिलं होतं त्यांच्याशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला. सरकार शेतकरी आणि कष्टकरी जनतेचे नेते असून येत्या मंत्रिमंडळ बैठकीत ठोस निर्णय घेऊन अपेक्षेपेक्षा जास्त मदत केली जाणार, असे आश्‍वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले.

Grain Storage: धान्याची साठवणूक करताना 'या' गोष्टींची काळजी घ्या; अन्यथा होईल मोठे नुकसान

नांदेड (nanded) तालुक्यातील नांदुसा गावचे सरपंच भास्कर जानकवडे यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला. त्यावेळी गावातील इतर शेतकरी देखील उपस्थित होते. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांसाठी सरकार सर्वतोपरी मदत करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हंटले आहे.

'या' राशीच्या लोकांना करियरबाबद मिळणार आनंदाची बातमी; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

"तुमचं शेत पाहणं राहून गेलं पण तुम्ही कोणतीही काळजी करु नका, पंचनामे झाले का? आम्ही लवकरच मदत जाहीर करणार आहोत, अपेक्षेपेक्षा जास्त मदतीची घोषणा हे सरकार करेल", असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 
Multi Layer Farming: शेतकरी मित्रांनो मल्टी लेयर फार्मिंगमधून घ्या लाखोंची कमाई; व्हाल मालामाल
Bird Flue: कुक्कुटपालकांसाठी आनंदाची बातमी; शास्त्रज्ञांनी लाँच केली बर्ड फ्लूची पहिली लस
Agricultural Business: ऐकलं व्हयं! सर्पगंधा लागवडीतून शेतकरी घेतोय लाखोंमध्ये उत्पन्न; जाणून घ्या...

English Summary: Chief Ministe Eknath Shinde gave a word to the flood affected farmers
Published on: 10 August 2022, 01:43 IST