केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असते. ज्यातून शेतकऱ्यांना चांगला फायदा होतो. आता कृषी विभागाने (Department of Agriculture) खतांच्या किमतीबाबत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.
शेतकऱ्यांना (farmers) योग्य किमती, उत्कृष्ट दर्जाचं खत उपलब्ध करून देण्यासाठी विभागस्तर, जिल्हास्तर व तालुकास्तरावर 45 भरारी पथके नाशिक विभागात स्थापन करण्यात आली आहेत. शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
शेतकऱ्यांना अनुदानित खते (fertilizers rates) जादा दराने विक्री केल्यास विक्रेते व कंपनी विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी दिली आहे.
खरीप हंगामामध्ये रासायनिक खतांचा (Chemical fertilizers) चांगला पुरवठा खत विक्री केंद्रापर्यंत करण्यात आला आहे. त्यामुळे शेतक-यांनी पेरणी किंवा लागवड केलेल्या क्षेत्रानूसार पीकवाढीच्या अवस्थेप्रमाणे खतांची योग्य मात्रा देणे गरजेचे आहे.
केंद्र शासनाने युरिया खताचा संतुलित वापर होण्याच्या दृष्टीने नॅनो युरिया (Nano urea) या विद्राव्य खताच्या ग्रेडचा नव्याने समावेश केला आहे. पीकवाढीच्या अवस्थेत वर खते देण्यासाठी शिफारस करण्यात आली आहे. नॅनो युरियाचा जास्तीत जास्त वापर करण्यात यावा.
24 सप्टेंबरपर्यंत 'या' लोकांच्या धनात होणार प्रचंड वाढ; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
अनुदानित खतांची विक्री ई-पॉस मशिनद्वारे (E-POS machine) करणे खत विक्रेत्यांना बंधनकारक आहे. रासायनिक खताच्या गोणीवरील छापील किंमतीपेक्षा जास्त किमतीने विक्री करणे हा देखील गुन्हा आहे. त्यामुळे यावर नियंत्रण ठेवले जाणार आहे.
महत्वाचे म्हणजे याबाबत गुण नियंत्रण कक्षाकडे तक्रारी आल्यास संबंधित रासायनिक खत (fertilizers) विक्रीचा परवाना अत्यावश्यक वस्तू कायदा १९५५ व खत नियंत्रण आदेश १९८५ मधील तरतुदीनुसार कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल, असे सर्व रासायनिक खत परवानाधारक किरकोळ व घाऊक खत विक्रेते यांना सूचना देण्यात आल्या आहे.
एलआयसीने लॉन्च केली नवीन पॉलिसी योजना; आयुष्यभर पेन्शनचा मिळणार 'इतका' लाभ
नियंत्रण कक्ष व भरारी पथकाचे भ्रमणध्वनी क्रमांक
नाशिक ८२०८६२८१६८
जळगाव ८२०८५६१९८६
धुळे ८४६८९०९६४१
नंदुरबार ९५०३९३८२५३
महत्वाच्या बातम्या
केंद्र सरकारने आखली नवीन योजना; आता घरगुती गॅस मिळणार फक्त 600 रुपयांमध्ये
हृदयविकाराचा झटका साधारणपर्यंत किती वेळा येऊ शकतो? जाणून घ्या सविस्तर
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोयाबीन दरात होणार 1 हजार रुपयांनी वाढ
Published on: 07 September 2022, 12:32 IST