Agriculture Processing

शेतकरी चांगल्या उत्पादनासाठी नवनवीन पिकांची शेती करीत असतात. आज आपण अशाच एका झाडाविषयी माहिती जाणून घेणार आहोत, ज्यातून शेतकरी लाखों रुपये कमवू शकतात.

Updated on 09 December, 2022 3:48 PM IST

शेतकरी चांगल्या उत्पादनासाठी नवनवीन पिकांची शेती (agriculture) करीत असतात. आज आपण अशाच एका झाडाविषयी माहिती जाणून घेणार आहोत, ज्यातून शेतकरी लाखों रुपये कमवू शकतात.

आपण महोगनी लागवडीविषयी बोलत आहोत. या लागवडीमध्ये शेतकऱ्यांना फक्त थोडा संयम बाळगण्याची गरज आहे. यानंतर शेतकरी करोडपती होऊ शकतात.

माहितीनुसार 200 फूट उंचीपर्यंत हे झाड वाढते. वाढलेल्या या झाडाच्या बिया, साल, लाकूड आणि पाने बाजारात चांगल्या दरात विकली जातात. यामधून शेतकऱ्यांना चांगला फायदा होऊ शकतो.

कापसाला 12 हजार रुपयांचा हमीभाव द्या; शेतकऱ्यांची मागणी

महोगनी लाकडाचा फायदा

महोगनी 12 वर्षांत विकसित होते. याच्या काड्या लवकर खराब होत नाहीत. ते जहाजे, दागदागिने, फर्निचर, प्लायवुड, सजावट आणि शिल्पे तयार करण्यासाठी वापरले जातात. तसेच या झाडाची साल आणि पानांमध्ये औषधी गुणधर्म आहेत. याचा उपयोग औषधे बनवण्यासाठी होतो.

आनंदाची बातमी! सौर पंप खरेदीवर शेतकऱ्यांना मिळणार 90% अनुदान

महोगनी शेतीतून होणार इतकी कमाई

महोगनी बियाणे बाजारात एक हजार रुपये किलोपर्यंत विकले जाते. त्याचे लाकूड मोठ्या प्रमाणात 2000 ते 2200 रुपये प्रति घनफूट विकत घेतले जाते. ही एक औषधी वनस्पती असल्याने याच्या बिया औषधे बनविण्यासाठी देखील वापरल्या जातात.

अशा परिस्थितीत शेतकरी याच्या महोगनी लागवडीतून कोट्यवधींचा नफा कमवू शकतात. माहितीनुसार एक हेक्टरमध्ये शेती करून शेतकरी 70 लाख ते एक कोटी रुपये सहज कमवू शकतो.

महत्वाच्या बातम्या 
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत करा गुंतवणूक; मिळतोय सर्वाधिक व्याजदर, वाचा सविस्तर
डोळ्यांवरील ताण कमी करण्यासाठी या घरगुती उपायांचा करा वापर; जाणून घ्या
मिश्र मत्स्यपालन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर; होईल लाखों रुपयांचे कमाई

English Summary: What Farmers earn lakhs rupees selling bark wood leaves tree
Published on: 31 October 2022, 11:31 IST