Agriculture Processing

महाराष्ट्रामध्ये डाळिंबाची लागवड प्रामुख्याने सोलापूर, पुणे, अहमदनगर, नाशिक, सांगली, वाशीम जिल्ह्यामध्ये होते. डाळींबाला सर्व हंगामात फुले येतात. त्यामुळे याचा कोणताही बहार धरता येतो. यामुळे डाळींब हे फळ बाजारात वर्षभर उपलब्ध असते.

Updated on 04 May, 2022 12:14 PM IST

महाराष्ट्रामध्ये डाळिंबाची लागवड प्रामुख्याने सोलापूर, पुणे, अहमदनगर, नाशिक, सांगली, वाशीम जिल्ह्यामध्ये होते. डाळींबाला सर्व हंगामात फुले येतात. त्यामुळे याचा कोणताही बहार धरता येतो. यामुळे डाळींब हे फळ बाजारात वर्षभर उपलब्ध असते. डाळींब हे एक बहुगुणी फळ आहे. डाळिंबमध्ये अ, सी, के जीवनसत्वे, फायबर, पोटॅशिअम, कॅल्शिअम, लोह, फॉलीक ऍसिड मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे.

डाळिंब आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी ठरते. डाळिंबामध्ये अॅंटिऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे डाळिंब खाण्यामुळे तुमचे फ्री रेडिकल्सपासून संरक्षण होते, डाळिंबामुळे तुमची प्रतिकार शक्ती वाढते, डाळिंब खाण्यामुळे हिमोग्लोबिन वाढते तसेच डाळींबाच्या दाण्यामुळे कोर्टिसोल या स्ट्रेस हॉर्मोन्सवर नियंत्रण राहते. ज्यामुळे तुमचा रक्तदाब नियंत्रित राहतो, मेटाबॉलिझम नियंत्रित राहण्यास मदत होते, शरीराचा दाह कमी होतो, स्मरणशक्ती वाढते. त्याच्या पौष्टिक आणि औषधी गुणधर्मांसाठी ग्राहकांचे पसंती लाभते.

कृषिप्रधान देशाचा कणा "शेतकरी"

डाळिंबाचे उत्पादन जास्त झाल्यामुळे बाजारात डाळिंबाची आवक वाढते त्यामुळे उत्पादकाला भाव फारच कमी मिळतो. याशिवाय आकाराने लहान, खाण्या योग्य अशा फळांना फारच कमी किंमतीत विक्री करावी लागते. त्यामुळे शेतकर्‍यांचे फारच नुकसान होते. अशा फळांना बाजारात टिकण्यापेक्षा त्यापासून प्रक्रिया युक्त पदार्थ तयार केल्यास निशिचतच फायदा होतो. कापणीनंतर डाळिंबाची नफा टिकवून ठेवण्यासाठी व्यवस्थापन आणि मूल्यवर्धन महत्त्वाची भूमिका बजावते.

देशांतर्गत तसेच निर्यात व्यापारासाठी बाजारपेठेचा विस्तार त्याचप्रमाणे मूल्यवर्धनासाठी डाळिंबावर प्रक्रिया करणे फायद्याचे ठरते. मूल्यवर्धनासाठी डाळिंबावर प्रक्रिया करण्यासाठी फळांपासून (दाणे )अरिल वेगळे करणे आवश्यक आहे. हि प्रक्रिया स्वहस्ते केले तर ते खूप कंटाळवाणे आणि वेळ घेणारी आहे. यांत्रिकी यंत्रे आणि हाताची साधने हे फळांपासून अरिल वेगळेकरण्यासाठी विकसित केले गेले आहेत. नंतर विभक्त arils विविध मूल्यवर्धित उत्पादनांवर पुढील प्रक्रिया करण्यासाठी वापरले जातात.

कमीत कमी प्रक्रिया केलेले डाळिंब अरिल

कमीत कमी प्रक्रिया केलेल्या आणि "खाण्यास तयार" ताज्या आरील्सचे व्यावसायिकीकरण हा चांगला पर्याय आहे. कमीत कमी प्रक्रियेत सामान्यतः कमी तापमान, pH नियमन आणि प्रतिजैविक घटक म्हणून सुरक्षित (GRAS) रसायने म्हणून ओळखल्या जाणार्‍या खाद्यपदार्थांचा वापर करून ताज्या काढलेल्या अरिल्सचे नुकसान कमी करण्यासाठी विविध माध्यमांचा वापर केला जातो. कमीतकमी प्रक्रियेमध्ये प्राथमिक इनोकुलम भार कमी करण्यासाठी सॅनिटायझिंग एजंट्ससह धुणे, pH बदल, अँटिऑक्सिडंट एजंट्सचा वापर, तापमान नियंत्रण आणि इतर, फळांची अंशतः उच्च नाशवंतता नियंत्रित करणे समाविष्ट आहे.

दुसरीकडे, कमीत कमी प्रक्रिया केलेल्या डाळिंबाच्या एरिल्सच्या पॅकेजिंगसाठी निवडकपणे पारगम्य पॉलिमेरिक फिल्म्सचा वापर सुधारित वातावरण निर्मितीसाठी केला जातो, ज्यामुळे श्वसन क्रिया कमी होते आणि अनेक दूषित सूक्ष्मजीवांच्या कृतीसाठी प्रतिकूल परिस्थिती टिकवून ठेवते. कमीत कमी प्रक्रिया केलेले एरिल 15 दिवसांसाठी रेफ्रिजरेटेड परिस्थितीत साठवले जाऊ शकतात.

डाळिंबाचा रस

डाळिंब फोडून बियायुक्त गर हाताने काढावा किंवा यंत्राच्या साह्याने डाळिंब दाणे वेगळे करून घ्यावेत नंतर उपकरणात घालून रस वेगळा करावा. हा रस ८०ते८२डी. सें. तपमानास २५ते३० मिनिटे तापवून लगेच थंड करवा. नंतर रात्रभर रस भांड्यात तसाच ठेवून वरच्या बाजूचा रस सकाळी वेगळा करून घ्यावा. खाली राहिलेला चोथा टाकून द्यावा.

वेगळा केलेला रस आणखी एकदा गाळणीतून गाळून स्वच्छ बाटल्यामध्ये भरावा. हा रस जास्त दिवस टिकविण्यासाठी या बाटल्या बंद करून उकळत्या पाण्यात २५ते३० मिनिटे बुडवून थंड कराव्यात किंवा बाटल्या बंद करण्यापूर्वी रसात ०.०६ टक्‍के सोडियमबेंझॉइट मिसळून बाटल्या बंद केल्यास हा रस पुष्कळ दिवस टिकविता येतो.

आता 'या' कारणामुळे बिअरचे दर वाढणार...

डाळिंब जॅम

डाळिंबापासून जॅम बनवण्यासाठी डाळिंबाच्या १किलो गरात १ किलो साखर, ४ ग्रॅम सायट्रीक ऍसिड, ४ ग्रॅम पेक्टीन व खाद्य रंग टाकावे. नंतर हे मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवावे. स्टीलची भांडी जॅम करताना वापरावीत. स्टीलच्या पळीने सतत हलवावे याने गर करपत नाही व जॅम चांगल्या प्रतीचा तयार होतो. मिश्रणाचा ६८ते७० डिग्री ब्रिक्स आल्यास जॅम तयार झाला असे समजावे व तयार झालेला जॅम कोरड्या व निर्जंतुक केलेल्या रुंदतोंडाच्या बरण्यात भरावे. अशा प्रकारे तयार केलेल्या जॅमची एक वर्षापर्यंत सुरक्षितरीत्या साठवण करता येते.

डाळिंब जेली

डाळिंबापासून जेली तयार करण्याकरीता डाळिंबाचे दाणे काढून त्याचा रस काढावा. काढलेला रस पातळ सुती कापडाने गाळून घ्यावा. ५०टक्के फळाचा रस पाण्यात एकजीव करून १५ते२० मिनिटे गरम करावा. गाळलेल्या रसात समप्रमाणात साखर, ०.७ टक्के सायट्रीक ऍसिड व पेक्टीन टाकून उकळी येई पर्यंत शिजवावे. यावेळी मिश्रणाचे तापमान साधारणपणे ११०अंशसे. ठेवावे. तयार जेलीमध्ये एकूण घन पदार्थाचे प्रमाण ७० डिग्री ब्रिक्स असते. जेली गरम असतानाच निर्जंतुक बाटल्यांमध्ये भरावी.

डाळिंबाचा स्क्वॅश

डाळिंबाचा रस काढून तो पातळ सुतीकापडाने गाळून घ्यावा. डाळिंब स्क्वॅश तयार करण्यासाठी २५टक्‍के डाळिंबाचा रस, ४५टक्‍के साखर व २ टक्‍के सायट्रिक ऍसिड यानुसार पदार्थाचे प्रमाण वापरावेत. पातेल्यात१.५०ली. पाणी घ्यावे यामध्ये ३०ग्रॅम सायट्रिक ऍसिड आणि १.३०किलो साखर टाकून पूर्ण विरघळून घ्यावे. हे द्रावण पातळ सुती कापडातून गाळून घ्यावे आणि त्यात डाळिंबाचा रस टाकून एकजीव करावा. हे मिश्रण मंद आचेवर गरम करून घ्यावे. थोडावेळ थंड होण्यासाठी ठेवावे.

आता वाटीत थोडाथोडा स्क्वॅश घेऊन एकामध्ये ३ ग्रॅम सोडियम बेंझॉइट व दुसर्‍यामध्ये ५ ग्रॅम खाण्याचा रंग टाकून ते चमच्याने पूर्ण विरघळून घ्यावे. दोन्ही विरघळलेले पदार्थ स्क्वॅशमध्ये टाकून ते चमच्याने एक जीव करावेत. निर्जंतुकीकरण करून घेतलेल्या स्क्वॅशच्या बाटल्यामध्ये हा स्क्वॅश भरून त्यांना ताबडतोब झाकणे बसवून हवाबंद कराव्यात. स्क्वॅशच्या बाटल्या थंड व कोरड्या हवामानात ठेवून त्यांची साठवण करावी. हा स्क्वॅश वापरताना एकास तीन भाग पाणी घेऊन चांगले हलवून एकजीव करावा व नंतर तो पिण्यासाठी वापरावा.

शेतकऱ्यांचे प्रश्न निकाली लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही; राजू शेट्टींचा थेट केंद्र सरकारला इशारा

डाळिंब अनारदाना

अनारदानाचा उपयोग मुख्यतः चिवडा, फ्रुटसॅलेड, चटणी, आमटी व पानमसाला इत्यादीमध्ये केला जातो. त्यामुळे अन्नाची चव सुधारते व अन्न स्वादिष्ट, रुचकर व पौष्टीक बनते. रशियन जातीच्या आंबट डाळिंबा पासून हा पदार्थ बनवितात. आंबट चवअसलेल्या डाळिंब दाणे सुकवून तयार केलेल्या पदार्थास ‘अनारदाना’ असे म्हणतात.हा अनारदाना आयुर्वेदामध्ये औषधी म्हणून पचनासाठी व पोटाच्याविकारासाठी उपचार म्हणून वापरला जातो.

अनारदाना बनविण्यासाठी डाळिंबाचे दाणे वाळविले जातात. डाळिंबाच्या दाण्यांना ट्रे ड्रायरमध्ये सुकवण्यात येते. अनारदाणा वाळवून प्लॅस्टिकच्या पिशवीत पॅकिंग करावे व मोठ्या बाजारपेठेत पाठवावे. मोठ्या बाजारपेठेत अनारदाण्याला बरीच मागणीअसते.

सालीपासून पावडर

डाळिंब फळाच्या सालीमध्ये औषधी गुणधर्म असतात. अनारदाणा, ज्यूस, स्कॅशनिर्मितीतील शिल्लक सालीचा उपयोग पावडर तयार करण्यासाठी होऊ शकतो. सालीस वाळवून पावडर बनवता येते. साल उन्हामध्ये अथवा ड्रायरमध्ये वाळवून घ्यावी. नंतर त्याची दळण यंत्राच्या साहाय्याने पावडर तयार करून चाळणीने चाळून घ्यावे. चाळून घेतलेली पावडर हवाबंद पिशव्यांत पॅक करून लेबल लावावी.

डाळिंब बियाणे तेल

डाळिंब हे संयुग्मित फॅटी ऍसिड असलेले सुमारे सहा वनस्पती स्त्रोतांपैकी एक आहे. संयुग्मित फॅटी ऍसिड महत्वाचे आहेत कारण ते संश्लेषणाच्या अनेक बिंदूंवर इकोसॅनॉइड चयापचय प्रतिबंधित करतात त्यामुळे हे लक्षणीय नैसर्गिक दाहक-विरोधी एजंट बनवते डाळिंबाच्या बियांच्या तेलामध्ये इतर महत्त्वाची संयुगे जसे गॅमा -टोकोफेरॉल, व्हिटॅमिन ईचा एक दुर्मिळ आणि शक्तिशाली प्रकार आणि फायटोस्टेरॉल: बीटा-सिटोस्टेरॉल, स्टिग्मास्टरॉल आणि कॅम्पेस्टेरॉल आदी सापडतात ,हे हृदयाच्या आरोग्याशी जोडलेले रोग, कर्करोग आणि आर्थेरोस्क्लेरोसिसपासून संरक्षण देखील देते.

IT RETURNS : आयटी रिटर्न डिव्हिजन मध्ये बदल

डाळिंबाचे जैव-रंग

डाळिंबाच्या सालीमध्ये मोठ्या प्रमाणात टॅनिन व सुमारे 19% पेलेटीरिन असते . डाळिंबाच्या सालीतील मुख्य रंगद्रव्य ग्रॅनाटोनिन आहे जे एन-मिथाइल ग्रॅनाटोनिन या अल्कलॉइड स्वरूपात असते. हे कंपाऊंड बायोकलरसाठी जबाबदार आहे जे डाळिंबाच्या सालीमध्ये असते.

कु .सोनाली सिद्धार्थ सावंत,
साहाय्यक प्राध्यापिका,
तंत्रज्ञान अधिविभाग (अन्नतंत्रज्ञानविभाग),
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर. 

English Summary: Pomegranate fruit processing and benefits
Published on: 04 May 2022, 12:09 IST