Agriculture Processing

महाराष्ट्रामध्ये कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. विशेषता नाशिक जिल्ह्यात कांदा लागवड मोठ्या प्रमाणात होते. कांदा पिकाचे सगळ्यात मोठी कमजोरी असेल तर ती म्हणजे कांद्याच्या बाबतीत कायम असलेली भावाची अनियमितता ही होय. एवढेच नाही तर कांदा ही वस्तू नाशवंत असल्यामुळे त्याची जास्त काळ साठवणूक करणे देखील शक्य होत नाही. त्यामुळे शेतकरी मिळेल त्या भावाने कांदा विक्री करणे पसंत करतात.

Updated on 03 August, 2022 2:27 PM IST

महाराष्ट्रामध्ये कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. विशेषता नाशिक जिल्ह्यात कांदा लागवड मोठ्या प्रमाणात होते. कांदा पिकाचे सगळ्यात मोठी कमजोरी असेल तर ती म्हणजे कांद्याच्या बाबतीत कायम असलेली भावाची अनियमितता  ही होय. एवढेच नाही तर कांदा ही वस्तू नाशवंत असल्यामुळे  त्याची जास्त काळ साठवणूक करणे देखील शक्य होत नाही. त्यामुळे शेतकरी मिळेल त्या भावाने कांदा विक्री करणे पसंत करतात.

परंतु यामुळे शेतकरी राजाला प्रचंड प्रमाणात आर्थिक फटका बसतो. परंतु  जर कांद्याच्या बाबतीत थोडा हटके विचार केला आणि कांदावर प्रक्रिया करून त्यांचा कार्यकाळ जर वाढवला तर नक्कीच त्याचे बाजारमूल्य देखील वाढेल व जास्तीत जास्त नफा मिळवता येईल.

नक्की वाचा:शेतकऱ्यांनो पावसाळ्यात करा या फळपिकाची लागवड आणि कमवा आयुष्यभर भरघोस नफा! जाणून घ्या...

कांद्यावर करा डिहायड्रेशन प्रक्रिया                                                     

 डीहायड्रेशन हा शब्द आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. जर आपण या शब्दाचा मराठीमध्ये अर्थ पाहिला तर तो होतो वाळवणे, याचा अर्थ कांद्याचे डीहायड्रेशन  म्हणजे कांद्याला वाळवणे हे सरळ सरळ आपल्याला लक्षात येईल. परंतु कांद्याला वाळवावे कसे हा एक मोठा प्रश्न आहे.

तर त्यासाठी कांद्याचे बारीक तुकडे करावे लागतात व त्यांना उन्हामध्ये किंवा डीहायड्रेशन यंत्राचा वापर करून कांदा वाळवला जातो. त्यानंतर कांद्याचे जे बारीक तुकडे वाळवले जातात ते तुकडे किंवा त्या तुकड्यांची पावडर तयार करून बाजारात जर विकली तर नक्कीच खूप नफा मिळतो.

कांद्याच्या डीहायड्रेशन प्रक्रियेत करावी लागणारी भांडवली गुंतवणूक

 कांद्याचे डीहायड्रेशन प्रक्रियेसाठी जर तुम्हाला युनिट स्थापन करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला एक लाख पन्नास हजार ते पाच लाखांपर्यंत भांडवल गुंतवणूक करणे आवश्यक आहे.

 यासाठी लागणारा कच्चामाल

 कांद्याच्या डीहायड्रेशन प्रक्रियेसाठी कांदा हाच मुख्य कच्चामाल असल्यामुळे हा प्रक्रिया उद्योग कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या परिसरात किंवा कांदा खरेदी विक्री केंद्र किंवा मार्केटच्या ठिकाणी आहेत, अशा ठिकाणी सुरू केला तर वाहतूक खर्च कमी होतो.

जर तुम्हाला जास्तीत जास्त कांदा लागत असेल तर तुम्ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांसोबत या संबंधीचा करार करू शकतात किंवा तालुका बाजार समितीतून जे शेतकरी कांदा विक्रीला असतात त्यांच्याकडून कांदा विकत घेऊ शकतात.

नक्की वाचा:Bater Rearing: अरे वा! अवघ्या 35 दिवसात मोठी कमाई; शेतकरी मित्रांनो 'या' लहान पक्षांचे करा पालन

 या प्रक्रियेसाठी लागणारी यंत्रसामग्री

 तुम्हाला अगदी छोट्या प्रमाणात हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला कांद्याचे तुकडे करण्यासाठी एक कटिंग मशीन, कांदा वाळवण्यासाठी ड्रायर मशीन तसेच वाळवलेल्या कांद्यापासून जर तुम्हाला पावडर तयार करायचे असेल तर ग्राइंडर मशीनची आवश्यकता भासते.

तसेच तुम्ही जो काही माल तयार कराल त्याच्या पॅकिंग करण्यासाठी तुम्हाला पॅकेजिंग मशिनची देखील आवश्यकता भासते. या पॅकेजिंग मशिन मध्ये तुम्ही ऑटोमॅटिक मशीन चा वापर करून उत्पादन क्षमता वाढवू शकतात.

 या यंत्रसामग्रीची किंमत

 सोलर ड्रायर घेण्यासाठी तुम्हाला 65000 हजार रुपये पासून मिळू शकते तर ग्राइंडर मशीन साठी आठ हजार रुपये व पॅकेजिंग मशीन साठी एक हजार 500 रुपये एवढा खर्च येतो.

यासाठी लागणारे मनुष्यबळ हे जास्त नसून अवघ्या दोन किंवा पाच माणसांना घेऊन तुम्ही हा उद्योग सुरू करू शकतात.

 तयार मालाची विक्री कशी आणि कुठे कराल?

 तुम्ही कांद्यावर प्रक्रिया करून जो काही माल तयार कराल तो तुम्ही मसाले उत्पादक कंपन्यांना विकू शकतात. तसेच हॉटेल्समध्ये सुद्धा या उत्पादनांचा वापर दिवसेंदिवस वाढत असून बरीचशी हॉटेल्स आणि रेस्टोरन्टन्सला तुम्ही नियमितपणे तुमचा माल पुरवू शकतात. जे कंपन्या वेफर्स तयार करतात अशा कंपन्यांना कांदा पावडरची आवश्यकता भासते. अशा वेफर्स तयार करणाऱ्या कंपन्यांसोबत देखील तुम्ही करार करू शकतात.

नक्की वाचा:Crop Care:पिकांवर 'ही'लक्षणे दिसताच व्हा सावधान,त्यानुसार करा पोषक घटकांचे नियोजन,तरच होईल फायदा

English Summary: onion dehydration process is so profitable bussiness idea for farmer
Published on: 03 August 2022, 02:25 IST