Agriculture Processing

गोवऱ्याचा वापर सरपण म्हणून उपयोग केला जातो. तसेच खत म्हणून मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. असे असताना आता येथील जय संतोषी माँ गोशाळेच्या वतीने जर्मनी व मलेशिआ येथे गाईच्या शेणाच्या एक लाख गोवऱ्या पाठवण्याचे काम सुरु झाले आहे.

Updated on 01 June, 2022 4:46 PM IST

सोलापूर, देशातील कोणत्या गोष्टीला परदेशात मागणी येईल सांगता येत नाही, आपल्याकडे गाईच्या शेणाच्या गोवऱ्याचा वापर सरपण म्हणून उपयोग केला जातो. तसेच खत म्हणून मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. असे असताना आता येथील जय संतोषी माँ गोशाळेच्या वतीने जर्मनी व मलेशिआ येथे गाईच्या शेणाच्या एक लाख गोवऱ्या पाठवण्याचे काम सुरु झाले आहे. यामुळे यामधून चांगले पैसे मिळणार आहेत.

शिवपुरीच्या अध्यात्मिक अग्नीहोत्र केंद्राकडून जगातील अनेक देशात अग्नीहोत्र परंपरा चालवली जाते. त्यासाठी गाईच्या शेणाच्या गोवऱ्या आवश्यक असतात. अग्नीहोत्र प्राचीन यज्ञ परंपरा आहे. त्या परंपरेच्या प्रचारासाठी शिवपुरीचे अध्यात्मीक केंद्र काम करते. यासाठी अनेकजण काम करतात. यामधून अनेकांना रोजगार देखील मिळाला आहे. आता जय संतोषी माँ गोशाळेला एक लाख गोवऱ्या पाठवण्याची ऑर्डर मिळाली आहे. यामुळे ते कामाला लागले आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून ही गोशाळा सातत्याने गोवऱ्या निर्मितीचे काम करत आहे. परदेशात मागणी आहेच पण स्थानिक पातळीवर देखील या गोवऱ्यांची विक्री मोठया प्रमाणात केली जाते. यामुळे हा व्यवसाय देखील फायदेशीर आहे. अनेकजण यातून रोजगार निर्मिती करत आहेत. तसेच अनेक वेगवेगळ्या वस्तू बनवत आहेत.

म्हैस फक्त त्यालाच दूध काढून देते!! मग काय कपाळावर बाशिंग आणि नवरदेव काढतोय म्हशीचं दूध

येथील कामगारांनी गोवऱ्याची निर्मिती व्यवस्थित केली आहे. व्यवस्थित पॅकिंग देखील करण्यात आली आहे. गोवऱ्या तयार केल्यानंतर या गोवऱ्या पूर्णपणे वाळवल्या जातात. त्यामध्ये थोडीही ओल ठेवली जात नाही. त्यामुळे या गोवऱ्या अनेक महिने खराब होत नाहीत. यामुळे याला मागणी वाढते. तसेच अनेकांच्या पसंतीस ते उतरत आहेत.

याचे पॅकिंग दहाच्या बंडलमध्ये करण्यात येते. त्यानंतर पॉलिथिन पॅकींग करून ते कार्टन पॅक करण्यात येतात. कंटेनरने हा माल शिपिंगने जर्मनी व मलेशियात पाठवला जात आहे. स्थानिक बाजारात गोवऱ्या चाळीस रुपयाला २५ नग याप्रमाणे विक्री केल्या जातात. तर विदेशात दहा रुपयाला एक याप्रमाणे त्याची किंमत मिळते. यामुळे परदेशातून याला चांगला भाव मिळत आहे. शिवाय मागणी देखील एकदम जास्त मिळते.

घरात बसुन बांधावरची परिस्थिती कळेल का? जलजीवन मिशनबाबत धक्कादायक वास्तव आले समोर

या शिवाय ही गोशाळा गोफीनाईल, गोमुत्र अर्क, जीवामृत, दंत मंजन, पेन किलर बाम यासारखी अनेक उत्पादने तयार करते. यामुळे या पद्धतीने अनेक शेतकरी देखील चार पैसे कमवत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना जोडव्यवसाय म्हणून याकडे लक्ष दिल्यास हे फायदेशीर आहे.

महत्वाच्या बातम्या;
तीन महिन्यातील सर्वांधिक रुग्णांची नोंद! महाराष्ट्रात कोरोना वेगाने पसरतोय
शेतकऱ्यांनो कृषिपंपावर लक्ष ठेवा!! एका रात्रीतून 10 कृषिपंप चोरीला
मान्सूनच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी दुष्काळात तेरावा महिना; भांडवल खर्चात होणार वाढ

English Summary: Indian gourds arrive Germany, orders millions, price gourd staggering
Published on: 01 June 2022, 04:46 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)